Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीचा इतका सुंदर आवाज ऐकून तुम्हीही दंग राहाल, अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा व्हिडीओ

ह्या नवरीचा इतका सुंदर आवाज ऐकून तुम्हीही दंग राहाल, अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा व्हिडीओ

आपले वाचक आणि आपली टीम यांच्यात एक सामाईक आवड असेल तर ती आहे वायरल।व्हिडियोज ची आवड. आपल्या टीमला तर आता वायरल व्हिडियोज मधूनही उत्तमोत्तम व्हिडियोज शोधून काढत त्यावर लेख लिहिण्याची सवयच लागली आहे जणू. याच श्रेय अर्थातच जातं ते आपल्या वाचकांना. आपण जे प्रोत्साहन देता, ज्या सूचना करता त्यामुळे आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा उत्साह येतो. आजही त्याच उत्साहातून आपली टीम वायरल व्हिडियो बघत होती. त्यात एक वायरल व्हिडियो सापडला सुदधा. हा होता, नववधू तिच्या लग्नात डान्स करत असल्याचा व्हिडियो. म्हंटलं लिहुयात. पण नंतर असं लक्षात आलं, की या वहिनी जेवढ्या उत्तम डान्स करतात तेवढ्याच उत्तम गातात सुद्धा. आता त्यांच्या डान्स विषयी लिहायचं की गाण्याविषयी हे ठरेना. पण त्यांच्या सुरेल आवाजातली गाणी ऐकली आणि ठरलं की त्यांच्या गाण्याच्या वायरल व्हिडियोज विषयी लिहू. हे व्हिडियोज आपल्याला सिद्धेश सिंघ या युट्युब चॅनेल वरून दिसतात.

या वहिनींच्या याजमानांचे नाव सिद्धेश आहे. असं असलं तरी या संपूर्ण चॅनेल वर वहिनी अगदी छा गया आहेत असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कारण वर नमूद केलेलं आहेच. त्या गातात खूप सुंदर. या चॅनेल वरील त्यांचा पहिला व्हिडियो आहे तो आहे एक शॉर्ट व्हिडियो. तुझमें रब दिखता हैं हे गाणं त्या यात गाताना दिसून येतात. वैशिष्ठय असं की हा व्हिडियो त्यांच्या लग्नातील असून खुद्द सिद्धेश यांनी याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. या शॉर्ट व्हिडियोला जवळपास अडीच करोड हुन अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि त्याच पटीत पसंत ही केलेलं आहे. या व्हिडियोची खासियत अशी की जेव्हा ‘तुझमैं रब दिखता है’ म्हणत त्या सिद्धेशजींकडे बघतात तेव्हा त्या दोघांची दृष्ट काढावीशी वाटते. या नंतरचे व्हिडियोज ही अगदी उत्तम आहेत. त्यातही ‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटातील ‘हंसी बन गये’ हे गाणं तर अतिशय उत्तम. या व्हिडियोला ही जवळपास दहा लाख लोकांनी पाहिलं आहे. त्यापुढेही त्यांचे अनेक व्हिडियोज आहेत ज्यातून त्यांच्या सुरेल आवाजाचा अनुभव घेता येतो.

 

अंजली जी यांच्या गायकीला आणि नृत्य कौशल्याला आमच्या टीमचा सलाम. या दोहोंमध्ये त्यांनी नेहमीच उत्तम सादरीकरण केलेलं दिसून येतं. येत्या काळातही त्यांची ही कला बहरत जावो हीच सदिच्छा. तसेच या त्यांच्या प्रवासात त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या सिद्धेश यांचेही कौतुक आणि या गोड जोडप्याला त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! धन्यवाद !!

तसेच मंडळी आपणा सगळ्यांनाही यानिमित्ताने धन्यवाद. आपण नेहमीच आपल्या टीमचे लेख वाचत असता, शेअर करत असता आणि अगदी उपयुक्त सूचना ही करत असता. त्यातून आम्हाला नवनवीन गोष्टी शिकता येतात आणि त्यांचा अंतर्भाव करून नवीन लेख उत्तमरीत्या लिहिता येतात. येत्या काळातही आपल्या या उपयुक्त सूचना आणि प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे कळवत राहा. आपला आमच्या टीमशी असलेला स्नेह वाढत राहू दे ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.