Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीचा स्वतःच्याच हळदीतला अतरंगी डान्स होत आहे वायरल, बघा हा व्हिडीओ

ह्या नवरीचा स्वतःच्याच हळदीतला अतरंगी डान्स होत आहे वायरल, बघा हा व्हिडीओ

लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन आणि दोन कुटुंबांची सोयरीक सुद्धा. वाचायला सोप्पं असलं तरी, लग्न जुळवणं, त्याची पूर्वतयारी करणं आणि खुद्द लग्नाच्या दिवशीची धावपळ म्हणजे एकूणच धामधूम. त्यात खर्च किती होतो याला हिशोबच नाही. पण म्हणून सगळ्या गोष्टी टेन्शनवाल्या असतात, असं नाही. आपण मागील काही लेखांत पाहिलं असेलच. नवरा किंवा नवरी आपल्याच लग्नात कशी दमदार एन्ट्री घेतात ते. त्याआधीही धमाल असतेच. खासकरून हळदीच्या दिवशी. हळदीचा दिवस म्हणजे हमखास मजेमजेचा दिवस. अनेक मित्र तर केवळ बिनधास्त पि’ता येईल म्हणून येतात. पण त्याव्यतिरिक्त आकर्षण असतं ते डी. जे.च आणि नाचण्याचं. लोकं अगदी धमाल करतात. पण आमंत्रितांनी येऊन मजा केली हे ठीक. पण खुद्द नवरीच अगदी बावरी होऊन नाचत असेल तर?

होय. एक भन्नाट व्हिडियो आमच्या टीमच्या हाती लागला आहे. यात एक ताई आपल्या स्वतःच्या हळदीत अशी काही नाचते आहे की काय विचारु नका. व्हिडियोची सुरुवातच होते ती मुळी ताईच्या डान्सचे. हात वर उंचावून, झोके देत ताई मस्त नाचत असते. पण या नाचात ती एवढी गुंग झालेली असते की आजूबाजूला असणाऱ्या मुली मात्र अगदी दडपणाखाली नाचल्यासारख्या वाटतात. ताई नाचता नाचता ताईची एक फाईट बसेल की काय असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. पण ताईचं तर ठरलेलं असतं. मस्त एन्जॉय करायचं. बरोबर पण आहे. लग्न एकदाच होतं, म्हंटल्यावर मजा करून घ्यायला हवीच. हाच व्हिडियो पुन्हा प्ले होत असल्याने ताईचा हा भन्नाट डान्स पुन्हा पाहता येतो. स्वतःच्या लग्नाचा तिला झालेला आनंद आपल्याला पुन्हा अनुभवता येतो. एकंदरच या व्हिडियोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला दिसतो.

हा व्हिडियो नवीन आहे की जुना हे सांगता येत नाही. पण ताईच लग्न तर झालं असणार. तेव्हा या भन्नाट डान्स करणाऱ्या ताईला मराठी गप्पाच्या टिमकडून, तिच्या पुढील सुखी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, एकदा नक्की बघून घ्या. आणि व्हिडीओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच आमची टीम विविध विषयांवर लेख लिहीत असते. ते वाचले नसतील तर आवर्जून वाचा. आपल्याला नक्की आवडतील. तसेच शेअर ही करा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.