Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने लग्नमंडपामध्ये केलेली हि एंट्री पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या नवरीने लग्नमंडपामध्ये केलेली हि एंट्री पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

डान्सचे वायरल व्हिडियोज बघणं हे आपल्या सगळ्यांनाच आवडतं. खासकरून ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांना तर या व्हिडियोज मधून आपण आपल्या लग्नात कशी कशी मजा करायची याचे धडेच जणू मिळतात. खासकरून एखाद्या नववधू किंवा वराची मंडपात एन्ट्री घेतानाचे व्हिडियोज तर आपल्या सगळ्यांचं खूप आवडतात. त्याचमुळे हल्ली लग्नाच्या सुरुवातीला मस्त म्युझिक वर दणक्यात एन्ट्री घेणारे अनेक नववधु आणि वर दिसून येतात. त्यात ही जर ही नववधू वा वर सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर असतील तर अजून चार चांद लागलेच म्हणून समजा.

आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो बघितला जो एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या लग्नातील वायरल व्हिडियो आहे. ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे जीचं लग्न ठरलं होतं ती नववधू असून तिच्या मंडपातील एन्ट्री चा असा हा वायरल व्हिडियो आहे. या नववधूचं नाव रोहिणी भगत गुप्ता अस आहे. रोहिणी यांचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल आहे. तसेच पावणे दोन लाखांच्या आसपास असे सबस्क्रयबर्स त्यांच्या चॅनलला लाभले आहेत. याच कारण अर्थातच त्यांनी दिलेला उत्तम कंटेंट होय. मग ते व्लॉग्ज असोत, डान्स व्हिडियोज असोत वा शॉर्ट व्हिडियोज असोत. प्रत्येक माध्यमातून रोहिणी या आपली छाप सोडून जातात. त्यामुळे आपसूक त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. तर अशा या लोकप्रिय इन्फ्लुएन्सरचं लग्न म्हणजे चर्चा तर होणारच. त्याचंच प्रतीक म्हणजे हा व्हिडियो होय.

आजतागायत या व्हिडियोला जवळपास दोन कोटी लोकांनी पाहिलं आहे. यावरून आपल्याला या व्हिडियोची लोकप्रिय लक्षात यावी. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला रोहिणीजी आणि त्यांच्या सोबत असलेल्या करवल्या दिसून येतात. अगदी राजेशाही पद्ध्तीने हा व्हिडियो सुरू होतो आणि अगदी शेवटपर्यंत हा राजेशाही आब टिकुनही राहतो. यात अर्थातच रोहिणीजीं सकट प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा ठरतो. तसेच परफॉर्मन्सची सुरवात मराठी शब्दांनी झाल्याने आपण चट्कन या परफॉर्मन्सशी जोडले जातो. मग येतं ते आपलं आवडतं ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातलं ‘मैं दिवानी हो गयी’ हे गाणं. या गाण्यावर अगदी संयतपणे डान्स करत रोहिणीजी लग्नाच्या मंचाकडे जात असतात. तसेच त्यांच्या या परफॉर्मन्समध्ये नजाकत आणि ठेहराव ही दिसुन येतो. पुढे अर्थातच त्यांचे अहो म्हणजे पवन गुप्ता यांनाही आपल्याला बघायला मिळतं. रोहिणीजींच्या परफॉर्मन्स ने ते ही भारावून गेलेले असतात. मग यथावकाश हे दोघेही स्थानापन्न होतात आणि व्हिडियो संपतो. पण संपण्यागोदर मात्र या व्हिडियोने एक छान परफॉर्मन्स बघण्याची संधी आपल्याला दिलेली असते.

आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला हा व्हिडियो आवडला असेलच. नसेल बघितला तर जरूर बघा आणि रोहिणीजींच्या डान्सचा आनंद घ्या. तसेच या लेखाच्या निमित्ताने रोहिणीजी आणि पवनजी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या व्हिडियोजनी आपल्या चाहत्यांचे सतत मनोरंजन करत राहा.

तर मंडळी, हा होता आपल्या टीमने पाहिलेला आजच्या दिवसातला एक मस्त असा व्हिडियो. आपल्या टीमने यावर आधारित लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि यापुढेही लिहीत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.