आपले भाऊ बहीण म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात जवळची मंडळी. भलेही लहानपणापासून आपलं आणि त्यांचं पटलं असेल नसेल, पण आपल्या पालकांनंतर हीच मंडळी आपल्याला अगदी जवळची वाटतात. ही नातीच अशी गहिरी असतात बुवा. आज आपण अशाच दोन जिवलग बहिणींच्या डान्सचा व्हिडियो बघितला. व्हिडियो दोन वर्षांपूर्वीचा असला तरी बराच वायरल झालेला आहे. याच कारण या दोघींनी त्यात केलेला डान्स. अगदी कमाल. मग काय, आपल्या वाचकांना याविषयी माहिती मिळावी असं वाटलं आणि त्यातून हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.
हा व्हिडियो आहे वर उल्लेख केलेल्या पैकी एका बहिणीच्या लग्नातला. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला या दोघी जणी मंचकावर उपस्थित असलेल्या दिसतात. पुढे होणाऱ्या डान्स परफॉर्मन्स साठी त्या गाणं सुरू होण्याची वाट बघत असतात. जसं हे गाणं सूरु होतं तशा या दोघीही त्यांचं नृत्यकौशल्य दाखवायला सुरवात करतात.
पहिल्या अर्ध्या मिनिटांतच हा परफॉर्मन्स कमाल धमाल होणार याची आपल्याला खात्री पटलेली असते. कारण या पहिल्या तीस सेकंदात या दोघी ज्या स्टेप्स करतात त्या एखाद्या कोरिओग्राफरला शोभेल अशा असतात. त्यात त्यांचा सहजपणे डान्स करणं अगदी उठून दिसतं. गाणं तर जणू पाठ असल्यागत त्यांच्याकडून बोललं जातं असतं. त्यामुळे स्टेप्स करताना सुद्धा एकेक बिट व्यवस्थित पकडत त्यांचा डान्स चालू असतो. हाच सिलसिला पुढे पूर्ण व्हिडियोभर अनुभवता येतो. या व्हिडियोत आपण एकूण तीन गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स झालेले बघतो. पहिल्या दोन गाण्यांवर या दोन्ही बहिणी अगदी तुफान डान्स करतात. तिसऱ्या गाण्यावर जीचं लग्न आहे ती बहीण डान्स करताना आपल्याला दिसते. हे तिन्ही परफॉर्मन्स अगदी उत्तम होतात हे काही सांगायला नको. पहिलं गाणं हे ‘जानी तेरा ना’ हे सुनंदा शर्मा यांनी गायलेलं गाणं असतं. या गाण्यावर या दोघींच्या दोन स्टेप्स अगदी लक्षात राहण्यासारख्या असतात. एकामागोमाग होणाऱ्या या स्टेप्स आपण पहिल्यांदा २७ व्या सेकंदापासून ते ३४ व्या सेकंदपर्यंत बघू शकतो. पुढेही काही वेळा या स्टेप्स बघायला मिळतात. डान्स करताना एक प्रकारचा आत्मविश्वास आणि सोबतच लय असावी लागते. या स्टेप्स मधून ते अगदी पुरेपूर दिसून येतात.
पहिल्या गाण्यावरचा हा परफॉर्मन्स संपतो आणि मग वेळ असते ती दुसऱ्या गाण्याची. पण त्याचवेळेस एका बहिणीच्या पोषखातला एखादा मणी वगैरे खाली पडतो. त्यामुळे ती काही वेळ बाजूला जाते. पण तोपर्यंत जीचं लग्न आहे ती बहीण म्युझिक वर मस्त डान्स करत राहते. जेव्हा दुसरी बहीण तिला येऊन मिळते तेव्हा अगदी काहीच न झाल्यागत दोघीही डान्स करायला लागतात. त्यात कुठेही अवघडलेपण दिसून येत नाही. ज्यांना डान्सची अतिशय आवड आहे, सवय आहे आणि सोबतीला आत्मविश्वास सुदधा आहे तेच अशाप्रकारे डान्स परफॉर्मन्स देऊ शकतात. या दोघी बहिणी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हवं. अर्थात हा डान्सही जबरदस्त होतो हे काही वेगळं सांगायला नको. मग वेळ येते ती तिसऱ्या गाण्याची आणि यावेळी आपल्याला अनुभवायला मिळतो तो जीचं लग्न आहे त्या नवराईचा डान्स. ‘काय पो चे’ या सिनेमातील ‘शुभारंभ’ या गाण्यावर ही ताई डान्स करत असते. एव्हाना या दोघींच्या डान्सबद्दल आपली खात्री झाली असल्याने हा परफॉर्मन्स सुदधा उत्तम होणार याची जणू खात्री असते. आपला भ्रमनिरास होत नाही. हा परफॉर्मन्स ही ती अगदी जबरदस्त अशा पद्ध्तीने देते.
तसेच या गाण्याच्या वेगानुसार तिच्या स्टेप्सचा वेगही बदलतो. यावरून अगदी समजून उमजून हे डान्स परफॉर्मन्स बसवले गेले आहेत हे सिद्ध होतं. खरंच हा दोन वर्षांपूर्वीचा परफॉर्मन्स असला तरी आजही आपल्याला आवडून जाईल असाच आहे. आपण ही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला हे पटलं असेलच. जर का आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर हा व्हिडियो नक्की बघा आणि उत्तम डान्स परफॉर्मन्सचा आनंद घ्या.
तसेच बरं का मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्यास आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच वैविध्यपूर्ण विषय भेटीस घेउन येत असते. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत असता. आपला हाच प्रतिसाद आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. आपली टीमही यापुढे आपल्यासाठी उत्तमोत्तम लेख लिहीत राहील याची खात्री बाळगा. लवकरच नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले पण आपण न वाचलेले अन्य लेख वाचा. सगळे लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :