Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने लग्नामध्ये केली भन्नाट एंट्री, पाहून नवरदेव सुद्धा झाले खुश

ह्या नवरीने लग्नामध्ये केली भन्नाट एंट्री, पाहून नवरदेव सुद्धा झाले खुश

म्हणता म्हणता एप्रिल संपून मे महिना सुरु झाला आहे. आता सुरू होणारा वैशाख वणवा आपलं आयुष्य अजून गरमा गरम करणार हे नक्की. आधीच उन्हाने काहिली होत असताना मे महिना काहीसा अजून जास्त कठीण जाईल असंच वाटतंय. अर्थात या काळात सगळंच काही वाईट होतं असं नाही. याच काळात मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही असतात. आपल्याही डोक्यावर ऑफिसच्या कामाचं ओझं कमी असतं आणि या सगळ्यामुळे गावी जाण्याचा बेतही होऊन जातो.

त्यात कोणाचं लग्न वगैरे असेल तर दुग्धशर्करा योग होय. कारण आधीच सुट्टी आणि त्यात त्याची मजा घेताना लग्न समारंभ म्हणजे आनंद दुप्पट होणारच ! त्यात हल्लीची लग्न ही केवळ लग्नविधी पर्यंत मर्यादित न राहता, त्यांना खऱ्या अर्थाने एखाद्या समारंभाच रूप असतं. मग अगदी नवरा नवरीच्या एन्ट्री पासून ते अगदी रिसेप्शन संपेपर्यंत हे सगळं चालतं. त्यात अर्थातच डिजेवाले बाबू महत्वाची भूमिका बजावतात. कारण लग्नात आणि त्याआधीच्या हळदीत डीजे नसेल तर बहुधा चालतच नाही. त्यात गेल्या काही काळापासून नवरा नवरीने लग्न मंडपात अगदी दणक्यात एन्ट्री घेण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मग कधी नवरीने एकटीने एन्ट्री घेणं असो वा नवजोडप्याने एकत्र एन्ट्री घेणं असो हे चालूच असतं. त्यातही काही जण मग अगदी सिनेमातल्या सारखी एन्ट्री घ्यायला जातात.

काही जण तशी एन्ट्री घेतही नाहीत. पण हे सगळं असलं तरी या सगळ्या प्रकारावर भारतीय सिनेमाचा म्हणून एक पगडा असलेला दिसून येतो. त्यामुळे अगदी हिरो हिरोईन सारखी एन्ट्री घेतली नाही तरी निदान त्यांच्या गाण्यांवर तरी एन्ट्री घेतलीच जाते. त्यातही काही गाणी ही अतिशय लोकप्रिय आहेत. आमची टीम बऱ्याच काळापासून लग्नातील वायरल व्हिडियोज विषयी लिहिते आहे. त्यातील निरीक्षणातूनच हे मत मांडलं गेलं आहे. आणि या सगळ्यांत एक गाणं तर अतिशय प्रसिद्ध आहे. ‘मेरे सैय्यां सुपरस्टार’ हे ते गाणं होय. त्यानंतर काला चष्मा हे गाणं येतं. अनेकवेळा यातील एक तरी गाणं वाजताना आपण पाहतोच. आता आज आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो काही महिन्यांपूर्वीचा असावा. अगदी वर्ष ही झालं नसेल. पण या काळात या व्हिडियोने कित्येक लाख व्ह्यूज मिळवले आहेत. या व्हिडियोत आपल्याला हे गाणं ऐकायला ही मिळतं आणि यावर एक नवराई डान्स ही करताना दिसते. खरं तर लग्न म्हंटलं की भरजरी वस्त्र ही आलीच. त्यात नवरीचे पोशाख हे जेवढे भरजरी दिसतात तेवढेच वजनदार ही असतात. त्यामुळे हे पोशाख घालून डान्स करणं म्हणजे एक दिव्यच असतं. पण ते दिव्य ही आपली ताई अगदी मनापासून पार पाडते. त्यासाठी तिचं कौतुक करायला हवं.

तसेच अजून एका गोष्टीसाठी तिचं कौतुक करावंसं वाटतं ते म्हणजे पोशाख आणि डान्स सांभाळता सांभाळता ती गाणं म्हणायला विसरत नाही. तीच लिपसिंक चालूच असतं. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. पण आपण नसेल पाहिला तर एकदा जरूर बघा. यात आपल्याला या नवराईचा मस्त असा डान्स ही दिसतो आणि हे सुप्रसिद्ध गाणं ही ऐकायला मिळतं. अर्थात केवळ आपल्याला व्हिडियो बघायला सांगून आमची टीम गप्प बसणार नाही. तेव्हा हा लेख संपल्यावर थोडं खाली जा. तिथे तुम्हाला हा व्हिडियो शेअर केलेला दिसून येईल. या गाण्याचा आणि या ताईंच्या डान्सचा आनंद घ्या. असो.

तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख !आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.