Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने लग्नामध्ये डान्स नाही तर असं काही केले जे पाहून सगळेच थक्क झाले, बघा व्हिडीओ

ह्या नवरीने लग्नामध्ये डान्स नाही तर असं काही केले जे पाहून सगळेच थक्क झाले, बघा व्हिडीओ

लग्न म्हणजे वधू, वर, विधी, वऱ्हाडी, वाजंत्री आणि हल्लीच्या काळात वायरल व्हिडियोज हे समीकरण झालेलं आहे. या समिकरणातील वायरल व्हिडियोज म्हणजे तुमच्या आणि आमच्या जिव्हाळ्याचा विषय. जुने , नवीन, कमी वेळेचे, जास्त वेळेचे, भारतीय, परदेशी असे कोणतेही वायरल व्हिडियोज असू देत. आपली टीम त्यावर अगदी आठवणीने लिहीत असतेच. तसेच तुम्हीही अगदी आनंदाने हे लेख वाचता, अभिप्राय कळवता आणि लेख शेअर ही करत असता. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद !! आजही आपली टीम असाच एक उत्तम लेख आपल्या भेटी साठी घेऊन आली आहे.

हा लेख आधारित आहे एका वायरल व्हिडियोवर. हा वायरल व्हिडियो आहे तामिळनाडू राज्यातील एका लग्नाचा. या लग्नात वधू वर, वऱ्हाडी, वाजंत्री असे सगळे जण उपस्थित होते. पण या सगळ्यांत चर्चा होती ती केवळ एकाच व्यक्तीची. ही व्यक्ती म्हणजे या लग्नात बोहल्यावर चढणारी वधू. तिचं नाव निशा असं आहे. तामिळनाडू येथील टूथुकुडी जिल्ह्यातील ही कन्यका.

महाविद्यालयीन जीवनात तिने मार्शल आर्टस् या खेळ प्रकाराचे प्रशिक्षण घेणे सुरू केले. तसेच हा स्वसंरक्षणासाठी वापरला जाणारा क्रीडा प्रकार सगळ्याच मुलींनी शिकावा असं तिचं ठाम मत बनलं. याविषयी जनजागृती व्हावी हे तिच्या मनाने घेतलं. अशा वेळी तिच्या स्वतःच्या लग्नात या खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवावे असं तिच्या मनाने घेतलं. अवघ्या २२ वर्षांची ही मुलगी. पण किती छान विचार. प्रथमतः तिला तिच्या या विचारांसाठी एक कडक सॅल्युट. तसेच तिच्या नवऱ्याचे ही कौतुक. कारण त्याने ही तिच्या या विचाराला पूर्ण पाठिंबा दिला. मग काय, त्यांचं लग्न जसं आटपलं, निशाने काही वेळाने मार्शल आर्टस् प्रकारांची प्रात्यक्षिकं दाखवण्यास सुरुवात केली. जवळपास अर्धा तास ती ही प्रात्याक्षिकं करत होती. यात सुरुल वाल विच्छू, आदीमुराई या मार्शल आर्ट्स प्रकारांचा समावेश असलेला दिसून येतो. उपस्थितांपर्यंत या विषयी ची जनजागृती करण्याचा तिचा हेतू सफल झालाच. सोबतच काही जणांनी तिच्या या सादरीकरणांचे व्हिडियो शूटिंग केलं. पुढे ते प्रचंड वायरल झालं आणि मार्शल आर्टस् विषयी जनजागृती व्हावी हा तिच्या मनातील हेतू मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याचं दिसून आलं. यासाठी तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

आपल्या टीमने ही यातील एक व्हिडियो बघितला. त्यात ही युवती अतिशय सहजतेने आपले सादरीकरण करताना दिसून येते. मग ते दांडपट्टा फिरवणं असो वा भाल्यांचे कर्तब असो. तिच्या हालचाली चपळ आणि सहज दिसून येतात. तिचं आपल्याला जसं कौतुक वाटतं, तसेच उपस्थितांना ही कौतुक वाटत असतं. खासकरून उपस्थित मुलींना तर तिचं सादरीकरण खूप आवडल्याचे दिसून येतं. त्या तिला प्रोत्साहन देत असतात. एकंदर व्हिडियो आहे काही सेकंदांचा, पण आनंद देऊन जातो. या लेखाच्या निमित्ताने निशा च्या या वेगळ्या विचारसरणीला आपल्या टीमचा सलाम. तसेच यापुढेही तिच्या हातून मार्शल आर्टस् बद्दल जनजागृती होत राहावी आणि त्यात तिला यश मिळावं ही सदिच्छा. तसेच तिच्या नव्या कोऱ्या संसार आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच. तसेच या विषयी आपल्या टीमने जे लेखन केलं आहे ते आपल्या पसंतीस उतरलं असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपण नेहमीच आपल्या टीमला पाठिंबा देत आलेले आहात. येत्या काळातही आपला हा लोभ आमच्या टीमप्रति कायम राहील हे नक्की. लेख वाचत राहा, शेअर करत राहा !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *