Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या नवरीने सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आपला लग्नसोहळा हा एखाद्या सिनेमात दाखवतात त्याप्रमाणेच भव्यदिव्य स्वरूपात आणि आनंदात साजरा व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. काहींचा विवाह सोहळा हा असाच भव्यदिव्य होतो सुदधा. तसेच आनंद हा तर लग्न सोहळ्यांचा स्थायी भाव होय. या सोहळ्यातील संगीत, मेहेंदि यांच्यासारखे लक्षात राहतील असे अनेक मस्त मस्त कार्यक्रम असतातच. या कार्यक्रमांतील प्रमुख आकर्षण असतं ते नवरा किंवा नवरी यांनी केलेला डान्स होय. या क्षणांची प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतात. कारण ज्यांचं लग्न आहे त्यांना डान्स परफॉर्मन्स करताना बघणं हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. यासाठी विशेष तयारी ही केली जाते. पण सोबतच अजून एका गोष्टीची मात्र नक्की आवश्यकता असते. ही गोष्ट म्हणजे नवरा नवरीचा उत्साही सहभाग. नवरा नवरी यांत उत्साहाने सहभागी असले की या डान्सला चार चांद लागलेच म्हणून समजा. असं असेल तर मग हल्लीच्या काळात तर अनेक वेळेस या डान्स व्हिडियोजना वायरल व्हायला ही वेळ लागत नाही. आज आपल्या टीमने असाच एक खऱ्या अर्थाने वायरल व्हिडियो म्हणायला हवा असा डान्स व्हिडियो बघितला आहे. केवळ एका वर्षाच्या कालावधीत या व्हिडियोस जवळपास एक करोड हुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी.

हा व्हिडियो म्हणजे जोडप्याच्या मेहेंदी सोहळ्यातील नववधूने केलेला डान्स परफॉर्मन्स आहे असं कळून येतं. यातील नववधू यांचे नाव बरखा आणि त्यांच्या आहोंचे नाव मनीष असल्याचं कळतं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला बरखाजी आणि त्यांच्या आई कॅमेऱ्यासमोर दिसून येतात. पहिल्याच क्षणापासून या दोघींचा डान्स रंगत जातो. ही रंगत बरखाजी स्वतः शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. पहिलं गाणं संपल्यावर मग बरखाजींच्या बहिणी डान्स फ्लोअरवर येतात. त्याही या परफॉर्मन्स मध्ये सुंदर डान्स स्टेप्स करत स्वतःचं योगदान देतात. या मेहेंदी सोहळ्यातील हा परफॉर्मन्स ९०च्या दशकातील गाण्यांच्या थीमवर आधारित असतो. त्यामुळे जुनी पण आजही लक्षात राहतील अशी सगळीच गाणी ऐकायला मिळतात. तसेच त्यावरील संपूर्ण परफॉर्मन्स म्हणजे तर कमाल आणि धमाल होय. अर्थात या सगळ्या परफॉर्मन्सच्या शो स्टॉपर या बरखाजी स्वतः असतात. हे केवळ आमचं मत नाहीये, तर सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी हा परफॉर्मन्स बघितला आहे त्यांच्या कमेंट्स मधूनही तसच प्रतीत होतं. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, जोडीला उत्तम नृत्यकौशल्य आणि मस्त डान्स स्टेप्स यांमुळे बरखाजी प्रत्येक गाण्यावरील परफॉर्मन्स मध्ये स्वतःची छाप सोडून जातात.

या डान्स परफॉर्मन्सच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी प्रत्येक जण हा उत्साहित होऊन यात सहभाग घेत असतो. त्यामुळे होतं काय तर व्हिडियो चार सवा चार मिनिटांचा असला तरी पूर्ण वेळ आपण अगदी आनंदात असतो. कुठच्याही क्षणी कंटाळा आलाय अस वाटत नाही. त्यातील प्रत्येक क्षणाचा आपण मनमुराद आनंद घेत असतो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. यानिमित्ताने या गोड जोडप्याला आमच्या टीमतर्फे पुढील यशस्वी वाटचालीसाठ मनःपूर्वक शुभेच्छा आहेत. आपला संसार सुखाचा होवो ही सदिच्छा.

आपल्या टीम प्रमाणेच आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही आवडला असेलच. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख भेटीस घेऊन येत असते. येत्या काळातही यात खंड पडणार नाहीये याची आपण खात्री बाळगा. पण त्यासाठी फक्त एक करा. आपलं प्रोत्साहन जे आम्हाला आजपर्यंत मिळत आलं आहे. ते यापुढेही मिळत राहू दे. आपली टीम नेहमीच आपलं मनोरंजन करत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.