Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने साखरपुड्यामध्ये मंडपात ज्याप्रकारे एंट्री केली ते पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या नवरीने साखरपुड्यामध्ये मंडपात ज्याप्रकारे एंट्री केली ते पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आपला साखरपुडा आणि लग्नसोहळा कसा असावा याबाबतीत आपण सगळेच जण किती जागृत असतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण हे दोन सोहळे म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणांना बांधणारे दुवे असतात. त्यामुळे आपल्याला आवडतील अशा गोष्टी या सोहळ्यांत व्हाव्यात हे आपल्याला वाटणं साहजिक आहे. अर्थात आपल्या घरची मंडळी ही याची खबरदारी घेतातच. या आपल्याला आवडणाऱ्या गोष्टिंमध्ये गेल्या काही काळापासून एका गोष्टीची प्रामुख्याने भर पडलेली दिसून येते. ही गोष्ट म्हणजे या सोहळ्यांत आपल्या भावी पती किंवा पत्नीविषयी असलेलं प्रेम डान्स परफॉर्मन्स मधून व्यक्त करणे होय. हेच परफॉर्मन्स जेव्हा चित्रित केले जातात तेव्हा बहुतांश वेळेस या व्हिडियोजना सोशल मीडियावर शेअर ही केलं जातं. जर नवरा किंवा नवरीने केलेला डान्स उत्तम असेल तर मग हेच व्हिडियोज वायरल होताना आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत. यातील काही व्हिडियोजवर आपल्या टीमने वेळोवेळी लिखाण केलेलं आपण वाचलं ही असेल. आजचा हा लेख लिहिण्याचं कारणही असाच एक वायरल व्हिडियो आहे.

या व्हिडियोत आपल्याला एक नववधू तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी डान्स परफॉर्मन्स सादर करताना दिसून येते. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही नववधू आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी आणि सोबतच्या स्त्रिया मंडपात दाखल होत असतात. एंट्रीपासूनच डान्स परफॉर्मन्स सुरू होत असल्याने ही नववधू डान्स परफॉर्मन्स करायला सुरू करते. आजूबाजूला असणारे सगळे जण तिला प्रोत्साहन देण्यास सुरवात करतात. तिच्या डान्स स्टेप्स या मस्त असतातच. पण सोबतच तिचं तिच्या अहोंवर असणारं प्रेम ही दिसून येतं. अर्थात ते प्रेम देहबोलीतून, डोळ्यांतून व्यक्त होतं. त्याला शब्दांत व्यक्त करता येणं शक्य नाही. पण एक मात्र खरं की आपण हा व्हिडियो बघितला की या दोघांमध्ये असलेल्या प्रेमाची जाणीव होतेच. आमच्या टीमकडून तर या जोडीला खूप खूप शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा आहेतच. या व्हिडियोत आपल्याला दोन डान्सवर या ताईने केलेला परफॉर्मन्स बघायला मिळतो. ती उत्तम डान्सर आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे हा व्हिडियो तसा सवा तीन मिनिटांचा असला तरी आवर्जून बघावा असाच वाटतो.

आजतागायत ५५ लाख लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. तेव्हा आपण जर हा व्हिडियो पाहिला नसेल तर आवर्जून पहा. एक उत्तम डान्स परफॉर्मन्स बघायला मिळेलच. सोबतच या गोड जोडप्याचा यातील सहभाग ही सुखावून जाईल आणि आपला वेळ आनंदात व्यक्त होईल हे नक्की.

तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आज पाहिलेल्या एका वायरल व्हिडियो वरील लेख. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *