Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने स्वतःच्याच हळदीमध्ये मैत्रिणीसोबत केला जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सवर नेटकरी झाले फिदा

ह्या नवरीने स्वतःच्याच हळदीमध्ये मैत्रिणीसोबत केला जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सवर नेटकरी झाले फिदा

लग्न सोहळा हा आनंद सोहळा असतो हे आपण सगळेच जण जाणतो. अगदी या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्यापासून ते हा सोहळा संपेपर्यंत आनंदाचं वातावरण असतं. अर्थात हे सगळं असलं तरी या लग्न समारंभात सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून प्रत्येक जण झटत असतो. त्यामुळे या सोहळ्याची जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती आणि स्वतः नवरा नवरी हे नाही म्हंटले तरी काही अंशी तणावाखाली असतात. पण हा सोहळा आनंद सोहळा असल्याने काही क्षण असेही येतात जिथे ही मंडळी आपल्यावरील ताण बाजूला सारत मस्त मजा करतात.

या सगळ्याची पहिली सुरुवात होते ते हळदी समारंभापासून ! आताच बघा, हळदी समारंभ हा शब्द वाचून आपल्यातले अनेक जण खुश झाले असतील. कारण हा समारंभ असतोच मुळात झकास ! मजामस्ती करायची तर ती हळदीच्या वेळी हे अनेकांचं ठरलेलं असतं. बरं त्यात घशाला पडलेली कोरड शांत करायला मिळाली की अनेक जण खुश असतात. अर्थात प्रत्येकासाठी हा आनंद नसतो. पण सगळ्यांचा आनंद हा डिजेची गाणी आणि त्यावर डान्स यात सामावलेला असतो. यात अर्थातच नवरा नवरी सुद्धा मागे नसतात. त्यांची हळद होत असते म्हणून आनंद असतोच. पण स्वतःच्या हळदीत नाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

आपण अनेक व्हिडियोज ही पाहतो नाही का की जिथे हळदी समारंभात नवरा आणि नवरी मस्त मजा करत नाचत असतात. काही काही नवरा नवरीला तर राहवत नसत. त्यांच्यात असला नसला सगळा जोर काढून ही मंडळी नाचत असतात. तर काही जण अगदी कोरिओग्राफ वगैरे करून गाण्यांचा आनंद घेत असतात. हे सगळं आपण पाहत असतोच. प्रत्येकाची या क्षणांची आनंद घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण एक गोष्ट मात्र कायम असते. ही गोष्ट म्हणजे आहे त्या क्षणांची आनंद लुटण्याची जबरदस्त इच्छा ! त्यातूनच मग मस्त असे लक्षात राहावे असे क्षण तयार होतात. त्यात हल्लीचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे हे क्षण आपल्या स्वतःला आनंद देतातच. पण शेअर केले असता, इतरांना ही आनंद देतात. अनेकवेळा जर या प्रसंगी फोटोग्राफर वगैरे नियुक्त केला असेल तर अजून बहार येते. कारण ही मंडळी चित्रित केलेल्या फोटो आणि व्हिडियोची एडिटिंग करून आधीच असलेली मजा दुप्पट करत असतात. या एडिटिंगची गंमत अशी की त्यात मूळ गाण्यासोबत इतर संगीत ही देता येत. इतकंच नव्हे तर मूळ व्हिडियो स्लो मोशन मध्येही बघता येतो. गेल्या काही काळात स्लो मोशन मधील व्हिडियोचं प्रमाण वाढलं आहे.

या स्लो मोशन प्रकाराने व्हिडियोजना एक मस्त इफेक्ट येतो हे नक्की. आता आपल्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो तसा नजीकच्या काळातला आहे. या व्हिडियोत आपल्याला नवराई आणि तिच्या करवल्या डान्स करताना दिसतात. त्या तिघी ज्या डान्स करत असलेलं गाणं आणि आपण ऐकत असलेलं संगीत यात फरक असावा असं वाटतं. म्हणजे आपण ऐकत असलेलं संबळ संगीत नंतर त्यात टाकलं असावं असा एक अंदाज करता येतो. अर्थात या संगीतामुळे या व्हिडियो ला चार चांद लागतात हे काही वेगळं सांगायला नको. तसेच वर चर्चिला गेलेला स्लो मोशन इफेक्ट् ही येथे बघायला मिळतो. छान वाटतं. आपल्या टीमने हा व्हिडियो पहिल्यांदा बघितला तेव्हाच आवडून गेला. म्हंटलं आजच्या लेखात याचा उल्लेख व्हायलाच हवा. पण केवळ उल्लेख करून भागतं होय. हल्लीचा जमाना व्हिडियोचा आहे. त्यामुळे आमच्या टीमने ही हा व्हिडियो आपल्या वाचकांसाठी या लेखाच्या शेवटी शेअर करायचं ठरवलं आहे. तेव्हा हा लेख संपल्यावर आपण या व्हिडियोचा आनंद जरूर घ्या. तसेच सालाबादप्रमाणे दाखल झालेल्या लग्नाच्या सिजनचा आनंद ही घेत राहा.

चला तर मंडळी, आता थांबायची वेळ झाली. हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.