Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने स्वतःच्या हळदीमध्ये केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या नवरीने स्वतःच्या हळदीमध्ये केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्न सोहळा म्हणजे मजा मस्ती आणि धमाल. पण खुद्द लग्न सोहळा होण्याआधीही एक सोहळा असतोच जो आपल्या सगळ्यांना भावतो. हा असतो हळदीचा सोहळा. बघा नाव काढलं आणि चेहऱ्यावर हसू आलं की नाही. अर्थात प्रत्येकाच्या या सोहळ्याशी निगडित आठवणी या वेगवेगळ्या असतात. काहींच्या नाच गाण्याच्या, तर काहींच्या तर्र होण्याच्या असतात. असो. पण बहुतांश वेळा नवरा नवरीसाठी हा सोहळा म्हणजे मस्त गाण्यांवर डान्स करण्याची एक संधी असते. अशीच संधी एका नवऱ्या मुलीने साधली आणि अगदी मस्त डान्स केला. आज तिचाच तो वायरल डान्स पाहण्याचा योग आला आणि वाटलं की आपल्या वाचकांना या व्हिडियो विषयी जाणून घ्यायला आवडेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी. हा व्हिडियो आहे उत्तर भारतातील एका हळदी समारंभाचा. जिथे हा समारंभ होत असतो तिथे झाडून सगळी मंडळी हजर असतात. पूर्ण व्हिडियोभर त्यांची ये जा चालू असते.

पण या सगळ्या वर्दळीतही लग्न ठरलेल्या आपल्या ताईला डान्स करण्यास वेळ मिळतो. तसेच प्रोत्साहन ही मिळतं. मग काय ताई पण या संधीचा फायदा घेते. आजूबाजूची चिल्ली पिल्ली बाजूला करत ती डान्स करण्यासाठी जागा बनवते. मग सुरू होतो तिचा मस्त धमाल डान्स. बरं गाणं पण एकदम गजब लावलेलं असतं. ‘गजबन पानी ले चली’ हे ते प्रसिद्ध गाणं. आपल्याला सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांचं नाव ऐकून माहिती असेलच. त्यांनीही या गाण्यावर मस्त असा डान्स केलेला आहे. यावरून ह्या गाण्याची लोकप्रियता लक्षात यावी. बरं ही लग्न ठरलेली ताई सुदधा खरच मस्त नाचते. या गाण्याचा पूर्ण अर्थ कळत नाही. पण त्यातील काही शब्द कळतात. त्यामुळे त्यावर तिने केलेल्या स्टेप्सचा अर्थ लावण्यास मदत होते. जसे की आख्यां म्हणजे डोळे. त्यावेळी बरोबर डोळ्यांकडे निर्देश करणारी स्टेप केली जाते. तसेच पैंजण असा शब्द जिथे येतो तिथेही पायांची स्टेप केली जाते. अनं जिथे पाणी घेऊन जाण्याचे शब्द येतात तेव्हा केलेली स्टेप एकदम लयीत केली जाते. त्यामुळे तिच्या या डान्स परफॉर्मन्सला चार चांद लागतात हे नक्की.

तसेच तिचं कौतुक करावीशी बाब म्हणजे डान्स करण्यासाठी जागा कमी असूनही तिने त्या जागेचा केलेला छानसा वापर. यावरून असा अंदाज बांधता येतो की तिला एकतर हे गाणं खूप आवडत असावं आणि तिला डान्सची आवडही असावी. कारण अगदी कमी वेळेत एवढ्या छान स्टेप्स करणं तसं कठीण असतं. एकतर त्याला खूप तयारी पाहिजे किंवा आवड. असो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आणि या ताईंचा डान्स खूप आवडला. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर हा व्हिडियो आपल्याही पसंतीस उतरला असेल हे नक्की. आणि जर का नसेल बघितला तर एकदा नक्की बघा. काय माहीत, तुमच्या लग्नाच्या वेळी याची मदत होईल. गंमतीचा भाग सोडा पण डान्सने होणारी करमणूक करून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की बघा.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स द्वारे नक्की कळवा. कारण आपल्या कमेंट्स द्वारे जेव्हा प्रोत्साहनपर कमेंट्स वाचायला मिळतात तेव्हा एक नवीन हुरूप येतो. नवनव्या विषयांवर लेखन करण्यास आवश्यक ऊर्जा आपल्या कमेंट्स मधून मिळते. तसेच आपल्या सकारात्मक सूचना आपल्याला आवडणारे विषय, करावयाचे बदल सुचवत असतात. त्यांची मदत उत्तमोत्तम लेख लिहिताना होतो. तेव्हा आपला प्रतिसाद आमच्या टीमसाठी महत्त्वाचा आहे आणि राहील. तसेच लेख शेअर ही करत राहा. कारण आपण जो आनंद या लेखातून घेतलात तो बाकीच्यांना ही घेऊ द्यात. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.