Breaking News
Home / मनोरंजन / ह्या निळा टीशर्ट वाल्या मुलाने केला जबरदस्त डान्स. स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या निळा टीशर्ट वाल्या मुलाने केला जबरदस्त डान्स. स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

कलाकार म्हणून आपण काम करावं असं कोणाला वाटत नाही? आपल्यापैकी प्रत्येकाला असं आवर्जून वाटत असतं. काही जणांना कलेची आवड म्हणून तर काहींना कलेच्या दुनियेचं आकर्षण म्हणून हे वाटत असतं. अर्थात कारण काहीही असलं तरी या चमचमत्या दुनियेविषयी आकर्षण हे सगळ्यांना असतं हे मात्र नक्की. त्यात आजच्या काळात माध्यमांची संख्या ही अगदी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक जण या वाटेवर आपला प्रवास सुरु करतात. त्यांच्या या प्रवासातील पहिलं ठिकाण हे बहुधा सोशल मीडिया हे असतं. अनेक जण अन्य मार्गांनी ही जातात. पण आपल्या आजूबाजूला जी उदाहरणं आपण हल्ली बघतो त्यातील बहुतेक जण हे त्यांची कला सोशल मीडियावर सादर करताना दिसतात.

अर्थातच सोशल मीडियाच प्रस्थ या काळात जास्त असल्याने प्रसिद्धीही लवकर मिळते. अगदी चट्कन ! पण अस असलं तरी ही प्रसिद्धी आणि मिळालेलं यश टिकवावं ही लागतं. काहींना ते जमतं आणि मग त्यांचा हा प्रवास अजून जोमाने सुरू राहतो. त्यात त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना प्रोत्साहन मिळत असेल तर हिंदीतल्या म्हणीप्रमाणे ‘सोने पे सुहागा’ म्हणावी अशी परिस्थिती तयार होते. आज आपल्या टीमच्या बघण्यात असाच एक उभारता सोशल मीडिया स्टार आला.

त्याच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली ती त्याच्याच एका डान्स व्हिडियो मुळे ! हा डान्स व्हिडियो जवळपास दोन वर्षे जुना आहे. एका घरातील समारंभातील हा व्हिडियो आहे. वर उल्लेख केलेला हा उभारता कलाकार उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. या व्हिडियोत तो आपल्याला ‘लेहेंगा’ या सुप्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसतो.त्याच्या डान्स स्टेप्स ही मस्त असतात. बरं जागा कमी असूनही मस्त स्टेप्स करत तो या डान्स मध्ये रंग भरतो. अर्थात तो एकटाच डान्स करत नसतो तर इतरांना ही डान्स करायला भाग पाडत असतो. किंबहुना बाकीचे ही अगदी आवडीने डान्स करत असतात. त्याच्या या डान्स स्टेप्स शिकण्याची इच्छा अगदी प्रत्येकात असल्याचं दिसून येतं. यात उपस्थित मुली, स्त्रिया, पुरुष असे सगळेच येतात. या सगळ्यांच्या पुढे, मध्यभागी उभा राहत आपला हा मित्र डान्स करत असतो आणि बाकीचे त्याला फॉलो करत असतात. त्याच्या प्रत्येक डान्स स्टेपनुसार प्रत्येक जण नाचण्याचा प्रयत्न करत असतात. महत्वाच म्हणजे हा कलाकार आणि हे सगळेच जण या डान्सची मजा घेत असतात. कोणत्याही कलाकारासाठी याहून आनंदाची दुसरी कोणती गोष्ट असावी.

हा उदयोन्मुख कलाकार ही आनंदी असतोच. हाच व्हिडियो बघून म्हंटलं या मुलाविषयी जाणून घेऊयात. तेव्हा लक्षात आलं की त्याच नाव विवेकरॉक्ज असं आहे. त्याचं मूळ नाव विवेक श्रीवास्तवा अस असल्याच कळून येतं. त्याने आणि त्यांच्या मित्राने सुरू केलेल्या चॅनेलचं नाव रॉक्ज टीम असल्याचं कळलं. जवळपास अडीच लाखांहुन जास्त सबसक्रायबर्स या चॅनेलने अगदी अल्पावधीत कमावले आहेत. अजून थोडी माहिती घेतली असता हे काम त्यांनी गेल्या काही वर्षांत केलं आहे अस दिसतं. त्यातही गेल्या दोन वर्षांत त्यांच्या सबसक्रायबर्स मध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. बरं सबसक्रायबर्स तर वाढलेच आहेत सोबतच अनेक सेलिब्रिटीजनी या मुलांचं कौतुक केलेलं आहे. तसेच अनेक प्रथितयश वृत्तपत्रांतून विवेक विषयी छापुनही आल्याचं दिसतं. त्यामुळे अगदी कमी काळातही या तरुण कलाकाराने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उत्तम प्रगती साधलेली दिसून येते.

तसेच त्यात सातत्य ही दिसून येते. सातत्य असले की यश हे मिळतेच. त्यामुळे येत्या काळातही विवेक आणि त्याची रॉक्ज टीमही उत्तमोत्तम कामगिरी करत राहील हे नक्की. विवेक आणि त्याच्या या टीमला आमच्या टीमकडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! वर उल्लेख केल्याप्रमाणे विवेकच्या डान्सचा व्हिडियो बघितला आणि या लेखाची कल्पना मनात आली. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *