Breaking News
Home / जरा हटके / ह्या पट्ठ्याने घोड्यावर बसून अमेरिकेच्या रस्त्यांवर काढली लग्नाची वरात, बघा न्यूयार्कमधील भारतीय लग्नाची वरात

ह्या पट्ठ्याने घोड्यावर बसून अमेरिकेच्या रस्त्यांवर काढली लग्नाची वरात, बघा न्यूयार्कमधील भारतीय लग्नाची वरात

भारतीय लग्न म्हंटली की त्यातील काही खास गोष्टी असतातच. म्हणजे यादी काढायला गेली तर खंडीभर गोष्टी येतील. त्यात आपला देश एवढा मोठा की लग्नातही विविधता असतेच. पण काही बाबी मात्र समान असतात. त्यातील एक म्हणजे लग्नाची वरात. सहसा प्रत्येक लग्नसमारंभात वरात असणं हे अपेक्षितच असतं. सध्या को’विड मुळे वरात वगैरे काढत नसले तरी या वरातीची मजा काही औरच असते. या वरातीत अनेक प्रकारचे डान्सर्स ही बघायला मिळतात. ही सगळी मजा आपण अनेक वेळेस अनुभवली असेल. भलेही आताच्या काळात नसली तरिही. पण सोशल मीडिया नावाचं माध्यम आपल्याला भूतकाळात घेऊन जाण्याची ताकद ठेवतं. कित्येक वर्षांपूर्वीचे व्हिडियोज जे बघायला मिळतात आपल्याला. अशाच एका वरातीचा व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. त्याविषयी लिहिलं तर आपल्या वाचकांना आवडेल, असं वाटलं आणि हा लेख लिहिला जातो आहे.

हा व्हिडियो आहे एका भारतीय लग्नातील वरातीचा. पण यात खास बाब अशी की ही वरात भारतात नसते तर ती असते अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात. न्यू यॉर्क शहर हे आपल्यासाठी काही अगदीच नवीन नाही. टोलेजंग इमारती, तिथली टॅक्सी सेवा आणि बऱ्याच गोष्टींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. तेथील टोलेजंग इमारती या खरंच आभाळाशी स्पर्धा करतील अशा असतात. येथील राहणीमान हे गतिशील मानलं जातं. अशा या सदैव धावपळीच्या शहरात भर दिवसा एका भारतीय लग्नाच्या वरातीमुळे लक्ष वेधलं जाणारच. व्हिडियोची सुरवात होते तेव्हा आपल्याला नवरदेव घोड्यावर/घोडीवर बसलेला दिसतो. मस्त लाल रंगाची झुल पांघरलेला हा अश्व रुबाबदार दिसत असतो. त्यावर मांड टाकून बसलेला असतो तो नवरदेव. त्याचं फोटोसेशन चालू असतं. त्याच्या पुढे सगळी वरात असते. आपल्या कानावर ‘छम्मक छल्लो’ या गाजलेल्या गाण्याचे शब्द पडत असतात. वरात एव्हाना एका पुलाच्या टोकावर असते. हळूहळू करून ही वरात पुढे सरकू लागते.

वरात जसजशी पुढे सरकते, तस तशी आपल्याला या वरातीत कोण कोण आहेत याचा अंदाज यायला लागतो. भारतीय आणि अमेरिकन पाहुण्यांच्या मांदियाळीत ही वरात पुढे सरकत असते. यात मस्त नाचणारे काही जण असतात. तर कोटातल्या कोटात खांदे उडवणारे काही जण असतात. तर नवीन गाणं सुरू झाल्यावर मानेने डान्स करणारे काही जण असतात. काही जण गप्पा मारता मारता हाताने गाण्यांवर ताल धरत असतात. एक ना अनेक डान्सर्स आपल्याला या ही भारतीय वरातीत दिसून येतात. हा सगळा लवाजमा जवळच असलेल्या ग्रँड हयात मध्ये जात असतो. मधेच कॅमेरामन आपल्याला पुलाखाली जी वाहतूक चालू असते त्याचीही दृश्य दाखवतो. अपेक्षेप्रमाणे वर्दळ असते पण काही डोकी मात्र वर पुलावरून येत असलेल्या गाण्यांकडे लक्ष देत असतात. या वरातीचा सुरुवातीस ढोल वाजवणारे ही असतात त्यामुळे अस्सल भारतीय फिल येतो. पुढे ही वरात ग्रँड हयात येथे जाते आणि संपन्न पावते. व्हिडियो संपता संपता आपल्याला गजाननाचे दर्शन होतात आणि आपण नकळत नतमस्तक होतो !!

व्हिडियो संपतो खरा, पण तरीही आनंद देऊन जातो. कारण हा व्हिडियो मुद्दामहून बनवल्या सारखा वाटत नाही. त्यात जे काही घडतं ते जसच्या तसं आपल्याला दिसतं. मग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेले भाव टिपणं यांमुळे यात गंमत येते. हीच गंमत आपण हा व्हिडियो बघताना अनुभवली असेल अशी आशा आहे. आपल्याला या व्हिडियो वरील आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण सातत्याने आणि मोठ्या संख्येने आपल्या टीमचे लेख शेअर करत असता. यातून आपल्या टीमला समाधान मिळतच आणि नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा देखील मिळते. तसेच आपल्या प्रोत्साहनपर कमेंट्स आमच्या पाठीवर हलकेच थाप मारून जातात तेव्हा भारी वाटतं. आपला हा पाठिंबा येत्या काळातही आपल्या टीमच्या पाठिशी कायम राहील ही सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *