Breaking News
Home / मनोरंजन / ह्या परदेशी कपलने साखरपुड्यामध्ये भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या परदेशी कपलने साखरपुड्यामध्ये भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

बॉलिवूड म्हणजे आपल्या भारतीय लोकांच्या मनोरंजन विश्वातील एक महत्वाचा भाग. एक प्रकारे परदेशात आपली जी ओळख आहे, त्यातील काही भाग हा बॉलिवूड सिनेमे आणि संगीत यांनी व्यापला आहे. जगभरात सगळ्यांत जास्त सिनेमे बनवणारी ही फिल्म इंडस्ट्री, म्हंटल्यावर परदेशी लोकांनाही हिच्याविषयी आकर्षण वाटतं. अनेक परदेशी कलाकार आपल्या येथे येऊन बॉलिवूड मध्ये काम करताना आपण बघतोच. तसेच परदेशस्थ भारतीयांचं लग्न परदेशी व्यक्तीसोबत होत असताना ही त्यांच्या लग्नात ही गाणी डोकावतात. त्यांच्या मुळे त्या सोहळ्याची शोभा वाढते. पण म्हणून केवळ भारतीय नागरिक असलेल्या लग्नातच असं होतं का ? उत्तर आहे नाही. कारण अनेक परदेशी नागरिकांच्या लग्नात वा इतर सोहळ्यात ही, आपल्याला बॉलिवूड ची गाणी वाजलेली दिसून येतात. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला ज्यात एक परदेशी जोडपं भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसतं. हे गाणं असतं बिवी नंबर १ चित्रपटातलं ‘चुनरी चुनरी’ हे गाणं.

सुश्मिता सेन आणि सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे. या व्हिडियोमुळे त्याची पुन्हा एकदा खात्री पटते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला या जोडप्यातील मुलगी डान्स करताना दिसत असते. तिच्या सोबत असलेला मुलगा सुदधा डान्स करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याचा तो शेवटपर्यंत प्रयत्नच राहतो. एक मात्र खरं की त्याचे हावभाव, देहबोली यांच्यामूळे तो हशा पिकवण्यात मात्र अतिशय यशस्वी ठरतो. त्यालाही याची कल्पना असावी. कारण डान्स पेक्षाही मजा करण्यात त्याचा कल जास्त असतो. तर दुसरीकडे त्याची जोडीदार मात्र अगदी लक्षपूर्वक डान्स करत असते. डान्स करताना वापरल्या जाणाऱ्या स्टेप्स ही छान असतात. त्यात हे दोघे डान्स करत असताना तिच्या मैत्रिणींची एन्ट्री होते. मग काय, ही ताई तिच्या जोडीदाराला बाजूला उभं राहायला सांगते आणि मग सगळ्या जणी मिळून या परफॉर्मन्स ची धुरा हाती घेतात. अर्थात त्यातही हा दादा असतोच. पण या सगळया जणी मस्त मस्त स्टेप्स करत डान्स पुढे नेतात. मग पुन्हा हा दादा येतो. यावेळी या जोडीचा परफॉर्मन्स बघायला मिळतो.

केमिस्ट्री छान असते आणि सोबतच उपस्थितांकडून पाठिंबा ही मिळत असतो. परदेशी नागरिक आणि भारतीय डान्स स्टेप्स म्हणजे मनोरंजनाची हमखास हमी हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. त्यात जेव्हा हा डान्स संपायला येतो तेव्हा ही ताई तिच्या दादाल्याच्या गळ्यात अशी काही पडते की झोकूनच देते स्वतःला. तिला विश्वास असतो तिचा जोडीदार तिला झेलणार म्हणून. तो ही विश्वास सार्थ ठरवतो आणि तिला अलगद झेलतो.त्यामुळे एका गोड क्षणासकट हा व्हिडियो संपतो. बघायला गेलं तर जवळपास आठ वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो आहे. पण आजही त्यातून मिळणारं मनोरंजन आनंद देऊन जातं. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपणही या व्हिडियोचा नक्की आस्वाद घ्या.

सोबतच हा लेख कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स , सकारात्मक सूचना यांच्यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळते. ही ऊर्जा आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्यास प्रोत्साहन देते. त्यातुनच तुम्हाला आवडणारे लेख लिहिले जातात. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला येत्या काळातही मिळत राहू द्या. आपला आमच्या टीमवर असलेला लोभ कायम ठेवा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *