खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी सोशल मीडिया नव्हता, त्या काळात एक बातमी खूप प्रसिद्ध झाली. आता असती तर व्हायरल झाली असती. शेवटी आजच्या आणि तेव्हाच्या जमान्यात खूप मोठी तफावत आहे. आता आपण ती बातमी काय होती, ते जाणून घेऊयात… स्वीडिश संगीतकार मॅग्नस बिर्गेर्सन यांना भारतीय संगीतवाद्यांनी भुरळ घातली असून ते वीणा, सतारीच्या प्रेमात पडले आहेत. वीणा, सतारवादनाची कला त्यांना अवगत असून त्यांनी आपल्या कार्यक्रमात भारतीय वाद्यांना महत्त्वाचे स्थान द्यायचे ठरवले आहे अशी ही बातमी होती.
आता याचे आश्चर्य वाटत नसले तरीपण त्या काळातील लोकांसाठी हे आश्चर्य होते. कारण आता आपल्याला एका क्षणात गुगल करून पश्चिमात्य संगीत शिकता येईल. त्यांचा डान्स शिकता येईल. मात्र त्या काळात परदेशी कलाकाराला भारतीय संगीताची भुरळ पडली, याचं कौतुक भारतीयांना फार मोठ्या प्रमाणात होतं. भारतीय शास्त्रीय संगीत व वादनकलेला प्राचीन परंपरा आहे. या गायनाचे व वादनकलेचे एक शास्त्र आहे. आधुनिक काळामध्ये शास्त्रीय संगीताचे महत्त्व तिळमात्रही कमी झालेले नाही.
भारतीय संगीताने विदेशी लोकांना भुरळ घातल्याचे बिर्गेर्सन हे काही पहिलेवहिले उदाहरण नाही. पूर्वीच्या काळी अनेक चिनी यात्रेकरू भारतात आले होते. त्यांनी आपल्या देशातल्या अनेक भागांमध्ये ज्ञानार्जनासाठी भ्रमंती केली. येथील जनजीवनाविषयी या चिनी यात्रेकरूंनी बारीकसारीक नोंदी आपल्या प्रवासवर्णनांमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये भारतातील संगीत, येथील वाद्ये यांबद्दलही त्यांनी मार्मिक निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यानंतर डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज हे विदेशी लोकही भारतात आले. त्या ओघात भारतीय शास्त्रीय संगीत व वादनकला अमेरिका, युरोप तसेच आफ्रिकी देशांत पोहोचण्यास मदत झाली. भारतीय परंपरेतील काही वाद्ये मुस्लिम संस्कृतीतूनही आली आहेत. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत व वादनकला ही विविध संस्कृती व परंपरा यांच्या मिलाफातून बहरली आहे हे मान्य करावेच लागेल….
पण आता तुम्ही म्हणाल की हे आज का सांगताय? आणि कशासाठी सांगताय? तर आता विषय खोल आहे भावांनो…. आपल्याला जसे त्यांच्या खाण्या -पिण्याचे कौतुक असते तसेच त्यांना आपल्या कलेचे, संगीताचे आणि संस्कृतीचे कौतुक आहे. आता आजच्या या व्हायरल व्हिडीओत एका परदेशी तरुणीने एकदम सुंदर असे मराठी गाणे म्हटले आहे. हे गाणे पाहून तुम्ही नक्कीच या तरुणीच्या प्रेमात पडाल. आईवर अनेक गाणी, गीते झाली पण मराठीत आईवर जेवढे साहित्य लिहिले गेले त्यातील एक म्हणजे सलील कुलकर्णी यांचे गीत. आता हे परदेशी मुलीने सुंदर पद्धतीने गायलेले गीत तुम्हीही पहा आणि आपली लोप पावत चाललेली संगीत संस्कृती जपण्यासाठी हे शेअर करा.
बघा व्हिडीओ :