Breaking News
Home / मनोरंजन / ह्या परदेशी जोडप्याने भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या परदेशी जोडप्याने भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

बॉलिवूडच्या गाण्यांची भुरळ पडली नाही अशी माणसं विरळ असावीत. अर्थात त्यात जुनी गाणी आवडणारी, नवीन गाणी आवडणारी आणि इतर प्रकार असू शकतात. पण सहसा आपल्या ओठांवर ही गाणी रुळून जातात. अगदी अलीकडच्या काळातील काही गाणी तर अगदी लग्नात सुद्धा वाजवली जातात आणि ते ही अगदी आठवणीने. यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात यावी. पण ही लोकप्रियता केवळ भारता पुरती मर्यादित नाहीये. अनेक परदेशी नागरिकांमध्ये बॉलिवूड, इथलं संगीत, त्यावर होणारा डान्स याविषयी आकर्षक असलेलं दिसून येतं. आपण अनेक वायरल व्हिडियोज ही बघितले असतीलच की ज्यात परदेशी पाहुणे किंवा परदेशस्थ भारतीय विविध समारंभात बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करताहेत. आज असाच एक व्हिडियो पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला. खरं तर परदेशी लोकं हिंदी गाण्यांवर नाचणार म्हणजे काहीसे अवघडून नाचतील असं वाटू शकतं. पण या व्हिडियोतून हा समज काही अंशी चुकीचा असल्याचं दिसून येतं.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक व्यक्ती एका मुलीला डान्स फ्लोअर वर कुठे उभं राहायचं हे सांगत असते. या मुलीने साडी परिधान केलेली असते. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ती मुलगी निश्चित जागी पाठमोरी उभी राहते. पुढच्या काहीच क्षणांत गाणं वाजायला सुरुवात होते – लंडन ठुमकदा हे क्वीन चित्रपटातलं गाणं. हे गाणं सुरू झाल्याबरोबर ही मुलगी डान्स करायला लागते. सुरुवातीला काहीशी बावरल्यासारखी वाटते. पण ती सहजतेने सावरून घेते स्वतःला. छान छान स्टेप्स करत तिचा डान्स पुढे सरकत असतो. तेवढ्यात आपल्याला व्हिडियोत उजव्या बाजूला काहीशी हालचाल दिसून येते. तर तिथे एक मुलगा या गाण्यात येण्याआधी डान्स फ्लोअरला नमस्कार करत असतो. काहीसं दडपण आणि काहीशी मजा असा हा क्षण. पुढच्या काहीच क्षणांत तो या मुलीसोबत नाचायला लागतो. तो आल्याने या परफॉर्मन्सची रंगत वाढत जाते हे नक्की. हे दोघेही अगदी जीव ओतून डान्स करत असतात. त्यामुळे प्रत्येक स्टेप्स मध्ये आनंदाचे रंग भरण्यात यशस्वी होत असतात.

पुढे या जोडीला अजून दोन जोड्या येऊन सामील होतात. बरं त्या ही सुंदर नाचत असतात. जणू काही एखाद्या चित्रपटातील सिन चालू आहे असं वाटावं. याचं अजून एक कारण म्हणजे त्यांच्या साध्या वाटणाऱ्या, पण लक्षात राहणाऱ्या स्टेप्स आणि त्या करत असताना त्यांनी जी मेहनत घेतली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. ही सहा जण त्या गाण्यातील प्रत्येक बिटची मजा घेत असतात. त्यामुळे एकामागोमाग एक सहभागी वाढले तरी डान्समध्ये गर्दी वाटत नाही. उलटपक्षी खूप मजा येते. तसेच त्यांनी ज्या उत्तमरीत्या हा डान्स केला त्याचं कौतुक ही वाटतं.

आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला आहे. आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल असं वाटलं आणि हा लेख लिहिण्यात आलेला आहे. या लेखात असलेल्या काही गोष्टी तुम्हाला उल्लेखनीय वाटतील. काहींमध्ये बदल करावा असे वाटेल आणि बरंच काही. तेव्हा आपल्या या प्रतिक्रिया, प्रोत्साहन आम्हाला कमेंट्स सेक्शन मधून कळविण्यास विसरू नका. त्यातून आम्हाला नवनवीन विषय हळण्याची ऊर्जा मिळते. येत्या काळातही आपण आपल्या टीमला असंच प्रोत्साहन देत राहाल हे नक्की. आपल्या टीमचा आणि आपला वाचक म्हणून असेलेला स्नेहसंबंध कायम वाढता राहू दे ही सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.