Breaking News
Home / मनोरंजन / ह्या परदेशी जोडप्याने स्वतःच्या लग्नात भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या परदेशी जोडप्याने स्वतःच्या लग्नात भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्नाचे वायरल व्हिडियोज म्हंटले की काही व्हिडियोज अगदी डोळ्यासमोरून जात नाहीत. अनेक व्हिडियोज मध्ये असलेली साम्य अशावेळी चट्कन लक्षात येतात. मग ते नवरीने मेरे सैय्यां सुपरस्टार या गाण्यावर केलेला डान्स असो वा नवऱ्याने त्याच्या सुविद्य पत्नीसाठी सरप्राईज म्हणून केलेला डान्स असो. पण प्रत्येक गोष्टीत काही ना काही अपवाद असतात ना. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला ज्यात नवरा नवरी असे दोघेही एकत्र मस्त डान्स सादर करताना दिसतात.

हा व्हिडियो आहे जवळपास तीन वर्षांपूर्वीचा. यात आपल्याला जी नवरी मुलगी दिसून येते ती भारतीय असावी असं जाणवतं. तर नवरा मुलगा हा परदेशी आहे हे कळून येतं. या लग्नाच्या निमित्ताने दोन संस्कृती एकत्र येताना दिसून येतात. त्यांचं लग्न हे याचं द्योतक मानायला हवं. बरं, भारतीय लग्न म्हंटलं म्हणजे डान्स आलाच आणि त्यातही बॉलिवूडचं एक गाणं तर नक्की असणार. या दोन्ही गोष्टी या लग्नात दिसून येतात. त्यांनी निवडलेलं गाणं असतं – आर राजकुमार या चित्रपटातलं ‘सारी के फॉल सा मॅच किया रे’ ! शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या धमाल परफॉर्मन्स ने या गाण्याचा व्हिडियो ही गाजला होता. अशा या तडकत्या फडक्त्या गाण्यावर हे उत्साही नवरा नवरी डान्स करायला सुरुवात करतात.

व्हिडियोची सुरवातच एवढी मजेशीर असते की हा व्हिडियो मस्त मजेदार होणार याची चुणूक लागते. गाणं सुरू होतं तेव्हा नवराई पुढे असते आणि नवरोबा पाठीमागे. गाणं सुरू होताच नवरोबा असा काही मजेशीर हावभाव करत, लाजण्याचा अभिनय करत पुढे येतो की सगळे जण हसत सुटतात. त्यात कॅमेऱ्यामागून तर हस्यकल्लोळ ऐकायला येत असतो. याच आनंदात हा व्हिडियो पुढे सरकतो. त्यात हे जाणवतं की नवरदेव भारतीय नसले तरी त्यांचा उत्साह दांडगा असल्याने भारतीय स्टेप्स छान करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे काही स्टेप्स बघून आपण हसतो, काही स्टेप्स अगदी मस्त वाटतात पण दोन्ही वेळेस त्यांचं कौतुक वाटतं. सोबतीला वधू असतेच. तिचा भरजरी पोशाख सांभाळत डान्स करणं हे म्हणजे तारेवरची कसरत. पण हे सगळं करत ती अगदी आनंदाने यात सहभागी होते. तसेच या दोघांची केमिस्ट्री एवढी घट्ट असते की त्यामुळे त्यांनी एकत्रपणे केलेल्या स्टेप्स ही टाळ्या मिळवून जातात. नीट बघितलं तर लक्षात येतं, की दोन महिला मंचाच्या दुसऱ्या बाजूने हा परफॉर्मन्स समोरून बघायला खासकरून येतात.

यातील एका महिलेचं दर्शन व्हिडियोच्या शेवटी ही घडतं. होतं असं की या दोघांचा डान्स मस्तपणे पुढे जात जातो आणि उपस्थित त्याची मजा घेत असतात. जेव्हा हा डान्स संपतो तेव्हा नवरोबा नवराईचं तोंड गोड करतात. त्यांचं हे सेलिब्रेशन चालू असताना सगळे उपस्थित मात्र आपल्या जागेवरून उठून उभे राहिलेले असतात. सगळ्यांच्या डोळ्यात या जोडीविषयी कौतुक आणि प्रेम दिसून येत असतं. तेवढ्यात मघाशी सांगितलेल्या ताई येतात. त्यांना एवढा आनंद झालेला असतो की त्या थेट नवराईला उचलून घेतात. ती आपली फुलासारखी नाजूक असल्याने चट्कन उचलली जाते. बरं या ताईंचा उत्साह दांडगा. त्या नवरोबाला उचलायला जातात. साडे सहा फुटी नवरदेव कसला उचलला जातोय. सगळे हसतात. पण जाता जाता ही गंमत सुदधा बघता येते. खरं तर तीन मिनिटांचा हा व्हिडियो. पण मन प्रसन्न करून टाकतो. थकून माकून व्हिडियो बघत असाल तर ताण हलका होतोच होतो. तेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडियो बघाच.

सोबतच आपल्याला हा लेख कसा वाटला हे कळवायला विसरू नका. आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. आपण वाचकमंडळी नेहमीच आपल्या प्रतिक्रिया, सकारात्मक सूचना यातून आम्हाला प्रोत्साहन देत असता. हेच प्रोत्साहन आमच्यासाठी ऊर्जा म्हणून काम करतं. तेव्हा येत्या काळातही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहू द्या. आपला लोभ आमच्यावर कायम असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *