Breaking News
Home / मनोरंजन / ह्या परदेशी तरुणींनी भारतीय गाण्यांवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या परदेशी तरुणींनी भारतीय गाण्यांवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

भारतात असलेल्या विविधतेचे अनेक रंग आपल्याला लोककलांमधून दिसून येतात. या लोककलांचा प्रभाव इतर कलांवरही आणि प्रत्येक कलाकारावर पडलेला दिसून येतो. मग ते कलाकार भारतीय असोत वा परदेशी कलाकार. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक कलाकार भारतीय लोककलांचं सादरीकरण करताना दिसून येतात. आज आपल्या टीमने अशाच काही कलाकारांचा उत्तम व्हिडियो पाहिला. त्यातील त्यांचा परफॉर्मन्स आवडलाच आणि त्यांच्याविषयी आपल्या वाचकांना वाचायला आवडेल असं वाटलं.

हा व्हिडियो आहे मारिया पन्ना या ग्रुपचा. या ग्रुपचं वैशिष्ठय असं की विविध भारतीय लोककलाप्रकारांचं सादरीकरण हा ग्रुप करत असतो. त्यात अगदी मराठमोळ्या लावणीचा ही समावेश होतो आणि अगदी राजस्थानी लोकनृत्यांचा ही समावेश दिसून येतो. यांचा एक व्हिडियो काही काळापूर्वी खूप लोकप्रिय ठरला होता. त्यावेळी या ग्रुपने ग्रीस देशातील एका आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता.

तेथे त्यांनी राजस्थानी गीतांवर अनेक नृत्य केली होती आणि ते ही केवळ तीन सदस्यांच्या जोरावर. याचं जे थोडक्यात चित्रीकरण झालं ते चित्रीकरण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो. सदर व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला तीन युवती एका रंगमंचावर दिसून येतात. एव्हाना गाण्याचे स्वर कानी पडायला सुरुवात झालेली असते. गाणं शांतपणे आणि हळुवार उलगडत असतं. त्यास शोभेल अशा स्टेप्स करत, या तिघी आपला परफॉर्मन्स पुढे नेत असतात. मग आपल्याला ‘घुमर’ गाण्याचे स्वर ऐकायला मिळतात आणि त्यावरील या मुलींचा छोटासा परफॉर्मन्स. मग येतं ते दुसरं गाणं. अर्थात हे गाणं मात्र आधीच्या गाण्यापेक्षा जास्त वेगवान असतं. तसेच हे गाणं अतिशय लोकप्रिय असल्याने आपण हे गाणं चट्कन ओळखतो. ‘निंबुडा निंबुडा’ हे गाणं आपल्या कानी पडतं आणि जुन्या आठवणी ताज्या होतात. अनेकांनी या गाण्यावर शालेय जीवनात निदान एखादा तरी डान्स होताना बघितला असेलच. या गाण्याच्या वेगाला आणि शब्दांना अनुसरून त्यांच्या स्टेप्स होत असतात. पुढे मग तिसरं गाणं आपल्या भेटीस येतं. पण यावेळी वेळ बदललेली असते. काहीशी रात्रीची वेळ असते आणि सोबतच आता तीन मुली रंगमंचावर नसतात. तर त्यातील एकच मुलगी आपल्याला दिसत असते. पण तीही अगदी धमाकेदार परफॉर्मन्स देते.

यावेळी ‘ढोल बाजे’ हे अगदी वेगवान आणि ऊर्जावान गाणं वाजत असतं. तीसुद्धा तेवढ्याच ऊर्जेने नाचत असते. तिच्या नृत्याने प्रेरित होऊन, समोरच्या मोकळ्या जागेत छोट्या छोट्या मुली तिच्या सारख्या स्टेप्स करायला बघत असतात. शेवटी तर अशी गिरकी घेते आणि खाली बसते की आपण नकळत आपल्या मनात तिचं कौतुक करतो. मग चौथं आणि शेवटचं गाणं अनुभवायला मिळतं. ‘मैं नाचू आज छम छम’ हे ते गाणं. यावेळी पुन्हा एकदा आपल्याला तिन्ही मुली दिसून येतात. या ही वेळी या तिघी एवढा उत्तम परफॉर्मन्स देतात की मजा येते. त्यांच्या स्टेप्स आवडून जातात. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास, आपल्याही पसंतीस उतरला असेलच.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार हे नक्की. आपल्या वाचकांना जे जे आवडतं त्या विषयी सातत्याने आपली टीम लिहीत असते. आपणही वाचक म्हणून आम्हाला सातत्याने सूचना करत असता, आमचं कौतुक करत असता आणि प्रोत्साहन देत असता. यातून नवनवीन विषय जसे सुचतात तसेच त्यांच्यावर लेखन करण्याची ऊर्जा ही मिळते. येत्या काळातही आपल्या टीममधील आणि वाचकांमधील स्नेह कायम राहील हे नक्की. आपला लोभ आमच्या टीमवर कायम असू द्या ही विनंती. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *