Breaking News
Home / मनोरंजन / ह्या परदेशी तरुणीने सर्वांसमोर भारतीय गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीही कौतुक कराल

ह्या परदेशी तरुणीने सर्वांसमोर भारतीय गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीही कौतुक कराल

हल्लीचं जग म्हणजे व्हिडियोमय जग झालं आहे. शॉर्टस, रिल्स, डॉक्युमेंटरी, फिल्म्स आणि अशा बऱ्याच माध्यमातून आपण आपलं मनोरंजन करून घेत असतो. पण त्यामुळे होतं काय की आपल्यावर अनेक निरर्थक बाबींचाही भडिमार होत असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला हे आवडत नाही, पण काही वेळेस नाईलाज असतो. पण…. जर तुम्ही आपल्या टीमच्या लेखांचे नियमित वाचक असलात तर मग काही हरकत नाही. कारण आपली टीम नियमितपणे विविध व्हिडियोज बघत असते आणि त्यातील उत्तमोत्तम व्हिडियोज शोधून त्यावर आपल्यासाठी म्हणून लेख लिहीत असते. आजचा हा लेखही अशाच एका उत्तम व्हिडियो वर आधारेलला आहे. चला तर मग अधिक वेळ न दवडता या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे एका परदेशी लग्नातला. यात आपल्याला एक परदेशी युवती दोन दोन भारतीय गाण्यांवर उत्तम असा डान्स करताना दिसते. आता आपल्यापैकी काहींचं म्हणणं असेल की परदेशी लोकांनी जरा काही भारतीय गोष्ट केली की आपल्याला आवडतेच.

पण खरं सांगायचं तर या परदेशी युवतीचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कदाचित तिने भारतीय नृत्याचा बारकाईने अभ्यास केलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तिच्या देहबोलीतून ज्या सहजपणे स्टेप्स केल्या जात असतात ते बघून जाणवतं की तिने अतिशय मेहनतीने भारतीय नृत्यप्रकाराची तालीम केलेली आहे. त्यातही ती डान्स करत असलेलं पहिलं गाणं म्हणजे ‘देवदास’ चित्रपटातलं ‘डोला रे डोला’ हे गाणं. या गाण्याची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. आपल्यापैकी अनेकांनी या गाण्यावर एखाद्या समारंभात डान्स केलेला असेल. इथे ही युवतीही तेच करत असते. तिच्या या प्रयत्नांना उपस्थितांकडून सतत प्रोत्साहन मिळत असतं. खासकरून जेव्हा ती गाण्यातील शब्दांवर गोल गोल गिरक्या घेते त्या क्षणांना अतिशय प्रेमाने दाद मिळते. आजूबाजूला अनेक जण तिच्या या डान्स विषयी अधूनमधून चर्चा करताना दिसत असतात. आणि जेव्हा तिचा पहिल्या गाण्यावरचा डान्स संपतो तेव्हा तर जवळपास एक मिनिटभर टाळ्यांचा कडकडाट सुरूच असतो.

लग्न समारंभ आहे की एखादा शो असा संभ्रम निर्माण व्हावा अशी अवस्था. पण खरंच ही तरुणी ज्या नजाकतीने नाचते त्यास तोड नाही. पण हा तर तिचा केवळ एक परफॉर्मन्स असतो. अजून दुसरा परफॉर्मन्स होणं बाकी असतं. त्यासाठी ती आपल्या दोन सख्यांना बोलावते. त्यांचंही टाळ्यांच्या गजरात आणि खेळीमेळीच्या वातावरणात स्वागत होतं. हे दुसरं गाणं असतं, ‘सोणी सोणी, आजा माही वे’. डान्स सुरू होण्यापूर्वी ही तरुणी हे गाणं उपस्थितांना समजावून सांगताना दिसते. यातून तिचा डान्स कडे अभ्यासूपणे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. हाच अभ्यासूपणा तिच्या डान्स मधूनही दिसून येतो. त्यामुळे तिच्यामानाने नॉन डान्सर्स असणाऱ्या दोघींना घेऊनही ही तरुणी मस्त डान्स करते. आधीच्या तुलनेने काहीसं वेगळं असलेलं हे गाणं ही तिच्या स्टेप्स मुळे लक्षात राहतं. तसेच मूळ गाण्यावरील स्टेप्स प्रमाणे तिने केलेल्या स्टेप्स सुद्धा लक्षात राहणाऱ्या असतात. हा परफॉर्मन्स संपतो तेव्हाही आधीप्रमाणे या तरुणीला आणि तिच्या दोन्ही सहकाऱ्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिलं जातं. मग फोटोसेशन सुरू होतं आणि या उत्तम नृत्यांगनेसोबत पहिल्यांदा फोटो घ्यायला नवरा नवरी पुढे सरसावतात. यातून त्यांच्या मनात तिच्याविषयी असलेलं कौतुक झळकत.

आपल्याही मनात तिच्याविषयी कौतुक असतंच. आम्हाला खात्री आहे की आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही या तरुणीचं कौतुक करावंसं वाटलं असणार. आपल्या मनातील कौतुक आपण आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये नमूद करू शकता. सोबतच आपल्या टीमने या तरुणीच्या अप्रतिम डान्स व्हिडियो विषयी लिहिलेला लेख आपल्याला कसा वाटला हे कळवायलाही विसरू नका. यानिमित्ताने एक बाब नमूद केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती म्हणजे आपलं आमच्या टीमवर असलेलं प्रेम. आपण सातत्याने मोठ्या प्रमाणावर आपल्या टीमचे लेख शेअर करत असता. कमेंट्स मधून प्रोत्साहन देत असता. त्यातून आपल्यासाठी नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा आम्हाला मिळते हे नमूद करायला हवं. तेव्हा आपला हा पाठिंबा यापुढेही आम्हाला मिळत राहू दे ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.