Breaking News
Home / मनोरंजन / ह्या परदेशी महिलांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेर भारतीय गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या परदेशी महिलांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेर भारतीय गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

भारताची एक देश म्हणून असलेली विविधतेतील एकता अनेक पाश्चिमात्य नागरिकांना नेहमीच खुणावत आली आहे. त्यातही आपल्याकडे भारतीय राहणीमानात जे अनेकविध पैलू त्यांना अनुभवायला मिळतात त्यामुळे त्यांना नवीन असे अनुभव घेतल्याचा आनंद मिळत असतो. यात मग खाण्यापिण्याच्या सवयी असोत वा आपल्याकडील कला, हे सगळेच त्यांना भुरळ पाडतात. या कलांमध्ये सगळ्यात जास्त जवळची वाटते ती नृत्यकला आणि त्यातही बॉलिवूड डान्स स्टाईल तर विशेष प्रसिद्ध असते. पण त्यातील काही जण असेही असतात जे बॉलिवूड सोबतच इतर नृत्य प्रकार सुद्धा अभ्यासतात.

असाच एक फिनिश (फिनलँड) डान्स ग्रुप आहे. ज्यांचं नाव ‘बॉलिवूड कमलीज’ अस असून त्या बॉलिवूड डान्स स्टाईल सोबतच राजस्थानी नृत्य प्रकारात माहीर आहेत. आज त्यांनी केलेला एक उत्तम डान्स व्हिडियो बघण्याचा योग आला आणि वेळ खूप आनंदात गेला. तसेच हा व्हिडियो पाहून त्यांच्याविषयी आपल्या वाचकांना कळावं अस वाटलं आणि म्हणून आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

 

बॉलिवूड कमलिज यांनी जवळपास चार वर्षांपूर्वी हेलसिंकी येथील एका रेल्वे स्टेशन बाहेर एका बॉलिवूड गाण्यावर डान्स परफॉर्मन्स दिला होता. हा त्यांचा डान्स प्रचंड गाजला. त्यांच्या या डान्स व्हिडियोला जवळपास पंधरा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरून या व्हिडियोच्या प्रसिद्धीची तुम्हाला कल्पना यावी. हा डान्स या ग्रुपच्या महत्वपुर्ण सदस्य असलेल्या Ilona Kolachana यांनी बसवला होता. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला तीन मुली एका स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या दिसतात. भारतीय पेहराव आणि एका विशिष्ट पोझिशन मध्ये त्या उभ्या असतात यावरून त्यांचा डान्स परफॉर्मन्स आहे हे कळून येत असत. त्या एकाजागी इतका वेळ स्थिर उभ्या असतात की अगदी बाहुल्या उभ्या केल्या आहेत असं वाटत असत. पण तेवढ्यात ‘प्रेम रतन धन पायो’ हे लोकप्रिय गाणं सुरू होतं. गाण्याची सुरुवात काहीशी हळुवार होते. त्या गाण्याच्या वेगानुसार त्यांच्या स्टेप्स ही अलगदपणे उलगडत जात असतात.

जणू काही एखादं कमळ उमलावं, अगदी त्यांच्या नावाप्रमाणेच. मग हे गाणं वेग पकडत आणि या मुलीसुद्धा त्यानुसार आपल्या स्टेप्स जलदगतीने करू लागतात. या सगळ्यातुन एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की या मुलींनी या गाण्यावर आणि एकंदर त्यांच्या नृत्य कौशल्यावर बरंच काम केलं आहे. कारण एक गोष्ट आपल्या नजरेत भरते ती म्हणजे त्यांच्या डान्स मध्ये असलेली सहजता आणि नजाकत. त्यांच्या डान्स मधली ही नजाकत खासकरून डोळ्यात भरते जेव्हा त्या स्वतः भोवती गिरकी मारत स्टेप करत असतात. कारण गिरक्या अगदी अलगदपणे करत त्यांचा डान्स होत असतो. एरवी परदेशी व्यक्ती डान्स करत असताना त्यांचा उत्साह एवढा ओसंडून वाहत असतो की या काही छोट्या छोट्या बाबी दुर्लक्षित राहू शकतात. पण या बाबतीत हा डान्स ग्रुप मात्र अगदी योग्य तेवढी ऊर्जा वापरून स्टेप्स करताना दिसतो. तीच बाब त्यांच्या हस्तमुद्रांबाबत असते. त्यात नेमकेपणाने हालचाली केलेल्या असतात आणि त्यामुळे एकंदर परफॉर्मन्स सुंदर होतो. कुठेही कमी वा जास्त अस काही वाटत नाही. तसेच वेळोवेळी प्रत्येक मुलीने डान्स फ्लोरच्या मध्यभागी येत डान्स केल्याने त्यांचं महत्व अधोरेखित होतं. तसेच प्रत्येकीचा डान्स हा नाही म्हंटला तरी काही अंशी लक्षात राहतो.

इथे आपण जसा हा व्हिडियो बघताना आनंद घेत असतो तसाच आनंद तेथील स्थानिक ही घेताना दिसतात. पाठीमागे रेल्वे स्टेशन असल्याने नागरिकांची वर्दळ ही असतेच. त्यातील काही नागरिक अगदी आवर्जून उभे राहून हा डान्स बघत असतात. एक स्त्री तर आपल्या तान्ह्या मुलाची बाबा गाडी घेऊन येत हा डान्स बघायला उभ्या राहतात. मुळातच भारतीय पोशाख हा परदेशात सहजपणे उठून दिसतो. त्यात बॉलिवूडच गाणं आणि त्यावर या मुलींनी केलेला सर्वोत्तम परफॉर्मन्स म्हंटल्यावर ही दाद तर मिळणारच ना. आपणही त्यांचा हा व्हिडियो पुन्हा एकदा आवर्जून बघतो. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला आवडला असणार हे नक्की.

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *