Breaking News
Home / जरा हटके / अपघातामुळे शुद्ध हरपून जमिनीवर कोसळला होता तरुण, ऍम्ब्युलन्स यायलासुद्धा उशीर होता, बघा मग ह्या पोलीस अधिकाऱ्याने काय केले

अपघातामुळे शुद्ध हरपून जमिनीवर कोसळला होता तरुण, ऍम्ब्युलन्स यायलासुद्धा उशीर होता, बघा मग ह्या पोलीस अधिकाऱ्याने काय केले

क’रोना काळ सुरू झाल्यापासून आपल्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट तर आली आहे. आपल्या आजूबाजूला असणारे को’विड वॉ’रियर्स हे आपल्या खऱ्या आयुष्यातले सुपर हिरोज आहेत. कारण अनाहूतपणे आलेल्या करोना संकटाला अगदी जवळून पाहण्याचं, त्याच्याशी लढण्याचं अतिशय धैर्यशील काम ही मंडळी करत असतात. तसं तर त्याचं हे काम नेहमीच सुरू असतं. पण करोना काळात त्यांचं महत्व आपल्याला सर्वांगीण बाजूंनी पटलं आहे. या त्यांच्या कामामुळे असंख्य जी’व वाचले आहेत. या त्यांच्या अतुलनीय कामासाठी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !! या को’विड वॉ’रियर्स मधील महत्वाचा घटक म्हणजे पोलीस दल. लोकांनी बाहेर विनाकारण फिरू नये, मास्क घालू नये यासाठी विविध क्लुप्त्या करून पोलिसांनी आपला या कार्यातील वाटा उचलला आहे. पण आपल्याला तर माहिती आहेच, पोलीस म्हंटले की त्यांच्या कार्यकक्षा या सतत रुंदावत असतात. त्यांना सीमा नसते. समोर जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत डोकं पटापट चालवत पण शांतपणे आपलं काम करणं हे त्यांच्या कामातील आव्हान असतं.

पोलीस ही या आव्हानाला पेलण्यात यशस्वी होतात. त्यामुळे जसे कुणाचे नुकसान होण्यापासून वाचते, तसेच जीवही वाचतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समोर आलेला एक वायरल व्हिडियो. हा व्हिडियो आहे तेलंगणा येथील करीमनगर इथला. इथे रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक चालू असताना एका दुचाकीस्वाराची धडक लागून एक तरुण जागेवरच को’सळला. तो दुचाकीस्वार ही ज’खमी झाला पण निदान तो शुद्धीत होता. या तरुणाला मात्र जबर झटका लागला असं दिसून आलं. कारण या अ’पघाताने त्याचं हृदय बंद पडलं होतं. हे सगळं वेगाने घडलं. जवळच एक पोलीस अधिकारी कार्यरत होते. त्यांनी घडला प्रकार बघितला आणि चट्कन धाव घेतली. परिस्थिती किती गंभीर आहे हे समजायला त्यांना जरासा ही वेळ लागला नाही. ताबडतोब पाऊलं उचलली नाहीत तर हा जीवानिशी जाईल हे त्यांना ठाऊक होतं. पण पोलिसांना प्रथमोपचार करता यावेत म्हणून प्रशिक्षण दिलं जातं. त्या माहितीचा इथे त्यांनी फायदा करून घेतला. ते चट्कन गुडघ्यावर बसले. दोन्ही हातांनी त्यांनी या तरुणाला सी.पी.आर. देण्यास सुरवात केली. त्या तरुणाच्या डाव्या छातीवर काहीसा दाब देत त्याला सी. पी. आर. देणं चालू होतं. वेळ अतिशय कठीण होती. सेकंदन सेकंद महत्वाचा होता. मध्येच ते त्याचं डोकं हलवून बघत होते. त्याचे डोळे उघडे होते पण हालचाल होत नव्हती.

मधेच दुसऱ्या एका माणसाने या तरुणाच्या गालावर चापट मारून बघितल्या. काही हालचाल होते का हे पाहण्यासाठी. काही हालचाल होईना. इथे या पोलीस अधिकाऱ्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. अखेर त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. या निश्चल पडलेल्या तरुणाने हालचाल केली. त्याने डोकं हलवलं, तोंड हललं आणि त्याच्या खऱ्या अर्थाने जीवात जीव आला. सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अशक्य वाटणारी ही बाब या पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे, प्रसंगावधनामुळे आणि धीर न सोडल्याने शक्य होऊ शकली. काही सेकंदांचा हा थरार झाल्यावर मग हा तरुण आणि ज्याची धडक बसली त्यांना पुढील उपचारांसाठी हॉ’स्पिटलमध्ये नेण्यात आलं अशी बातमी कळते. या पूर्ण घटनेत ज्यांनी खरंच एका सुपर हिरो ची भूमिका निभावत एक जीव वाचवला त्यांचं नाव आहे कॉन्स्टेबल मोहम्मद खलील. त्यांच्या या शौर्याला आपल्या टीमचा मानाचा मुजरा. आपण दाखवलेल्या प्रसंगावधान आणि संयम यांचं आपल्या टीमला आणि आपल्या वाचकांना नक्कीच कौतुक आहे. यापुढेही आपण उत्तम काम करत आपल्या कारकिर्दीत वाटचाल करावी या आमच्या शुभेच्छा !!!

लेखाचा शेवट करण्याअगोदर आपल्या सगळ्या वाचकांचे मनापासून आभार. आपण आपल्या टीमने लिहिलेले लेख इतक्या मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता, आम्हाला प्रोत्साहन देत असता. त्यामुळे आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्यासाठी हुरूप येतो. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला सतत मिळत राहो ही इच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *