Breaking News
Home / मनोरंजन / ह्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ होत आहे वायरल, कला पाहून तुम्ही सुद्धा सलाम कराल

ह्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ होत आहे वायरल, कला पाहून तुम्ही सुद्धा सलाम कराल

सोशल मीडिया आपल्या आयुष्यात काही काळापासून सक्रिय आहे. पण इतर कोणत्याही नवीन शोधापेक्षा या नवं माध्यमाचा शोध आपल्या जगण्यास अतिशय गतीने विविध अंगाने स्पर्श करतो आहे. यात चांगले वाईट असे अनेक बदल होत आहेत. त्यांचे अनुक्रमे फायदे किंवा / आणि तोटे आपल्याला अनुभवास येत असतात. पण या नवं माध्यमाचा एक फायदा म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना त्यांच्यात सुप्त कलागुण आहेत याची जाण होती पण व्यक्त होण्याचं माध्यम नव्हतं त्यांनाही एक हक्काचं माध्यम मिळालं आहे. या माध्यमांतून पुढे येणाऱ्या बहुतांश कलाकारांचे व्हिडियोज वायरल होताना आपण पाहतोच. असाच एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या पाहण्यात आला.

या व्हिडियोच्या सुरुवातीस एक पोलीस अधिकारी बासरी घेऊन काही धून वाजवण्याच्या तयारीत आहेत असं दिसतं. आपली उत्सुकता ताणली जाते आणि आपला भ्रमनिरास होत नाही. बासरीतून निघणारी धून आपल्याला तल्लीन करते. आपण अगदी लक्षपूर्वक ऐकत असतो. हे पोलीस अधिकारीही अगदी तन्मयतेने आपली कला पेश करत असतात. हा व्हिडियो अवघ्या एक ते दीड मिनिटांचा. पण त्यातही या कलेचं कौतुक आपल्याला वाटतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतं, की शंकर मोरे असं या अधिकाऱ्यांचे नाव आहे. ते जसे उत्तम बासरी वादक आहेत तसेच संगीतप्रेमी आहेत असंही कळतं. तसेच केवळ गायन ही कलाच त्यांना प्रेरित करते असं नाही तर छायाचित्रण ही कलाही त्यांना मोहिनी घालते आणि मोकळ्या वेळेत ते या कलांचा आस्वाद घेतात. अर्थात पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्या व्यस्त वेळेची आपणास कल्पना यावी. या व्यस्त वेळापत्रकानंतर आपल्या आवडत्या कलेपायी ते वेळ देतात आणि त्याचं फळ म्हणजे त्यांनी प्राप्त केलेलं प्राविण्य हे सगळंच कौतुकास्पद.

खरं तर पोलिसांची प्रतिमा म्हणजे समोरच्या व्यक्तीस जरब बसवणारी. आपण एक वायरल व्हिडीओ पाहिला असेल ज्यात संपूर्ण जमाव एका बाजूस पळत जातो जेव्हा एक पोलीस अधिकारी मैदानातून पुढे जात असतो. पण याच प्रतिमेमुळे त्यांच्यातील कलाकार आपल्याला कधी कधी भेटतात. याचसोबत आपण सगळे पाहतो की पोलीस दलाचं काम किती जिकिरीचं असतं. आमच्याच टीमने यावर काही लेख लिहिले होते. त्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या महिलेस पोलिसांनी किती जिकरीने वाचवलं हे आपण वाचलं आहेच. एक चूक किंवा समोरच्या व्यक्तीचा गैरसमज आणि प्रणाशी खेळ असा तो प्रसंग, पण पोलीस दलाने संयम आणि धीर दाखवून केलेलं काम अगदी स्पृहणीय. तसेच आपले सण समारंभ आले की ड्युटी किती दिवस अणि कोणत्या परिस्थितीत असेल हे सांगू शकत नाही.

एवढंच कशाला आपल्या समोर करोना काळातील लॉक डाऊनच्या कालावधीचं उदाहरण समोर आहेच. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, त्यांना सामोरं जात आपले पोलीस जीवाची बाजी लावत असतात. त्यांच्या विषयी लिहावं तेवढं कमीच. शब्द कमी पडतील पण त्यांच्या त्यागाला वाक्यांमध्ये बांधणं कठीण. आपल्या पोलीस दलाविषयी आमच्या संपूर्ण टीमला सदैव आदर वाटत आला आहे, आजही आदर वाटतो आणि यापुढेही वाटत राहील. त्यामुळे या आदरात भर पडते जेव्हा आपण शंकर मोरे यांच्यासारखे अधिकारी आपलं काम करत, कला ही सोबत जपतात. शंकर मोरे साहेबांना मराठी गप्पाच्या टिमकडून त्यांच्या पोलीस दलातील आणि कलाकार म्हणूनही होणाऱ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *