गेल्या वर्षा दीड वर्षांपासून आपल्याला क’रोना नामक संकटाने असं काही घेरलं आहे की विचारता सोय नाही. प्रत्येक बाजूने कोंडी करून ठेवल्यासारखी परिस्थिती झाल्याचं वाटतं कधी कधी. पण त्याचवेळी काही अशा गोष्टी ही पाहायला मिळतात ज्यामुळे सकारात्मकता मिळते. खासकरून आपले को’विड योद्धे जेव्हा आपल्या कर्तव्यांपलीकडे जाऊन काम करतात तेव्हा उर अभिमानाने भरून येतो. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो याच पठडीतला. हा व्हिडियो बघून मनात समाधान वाटलं आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे याचं उदाहरण पाहता आलं. हा व्हिडियो आहे मध्य प्रदेश जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा. या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे अनुप सिंह ठाकूर. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा हे अधिकारी आपल्या गाडीतून उतरून एका ठिकाणी जाताना दिसतात.
आजूबाजूला गायी फिरत असताना दिसत असतात. गाड्यांची ये जा चालू असते. तेवढ्यात हे पोलीस अधिकारी एके ठिकाणी जाऊन थांबतात. तिथे एक व्यक्ती दुधीभोपळा विकताना दिसतो. त्याच्या देहबोलीवरून ही सदर व्यक्ती अं’ध असावी असं जाणवतं. हे पोलीस अधिकारी या माणसाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडियोत म्युझिक चालू असल्यामुळे या दोघांमधला संवाद काय होतो, ते चट्कन कळत नाही. पण मग हे पोलीस अधिकारी त्वरित आपल्या जवळील एक मास्क काढून या व्यक्तीला देतात. आपल्याला वाटतं आता याला मास्क घालायला लावून पुढे जातील, बाकीच्यांना मास्क घालायला सांगतील. पण तसं होत नाही. ते जागीच उभे राहतात. त्या व्यक्तीची विचारपूस करतात. मग आपल्या मागे उभ्या असलेल्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यास काही तरी सूचना देतात. पुढच्याच क्षणी हा कनिष्ठ अधिकारी त्यांचं पै’शाचं पाकीट घेऊन आलेला असतो. आपल्या पाकिटातून पै’से काढून ते या भाजी वि’कणाऱ्यास देतात आणि तिथून जायला सांगतात. तो ही आपली जागा सोडून जायला लागतो. पुढच्या काही क्षणांत इतर अधिकारी त्याच्या भाजीचा पसारा उचलून घेतात आणि हा व्हिडियो संपतो.
खरं तर पोलीस हे नेहमीच ऊन, वारा पाऊस आणि कोणत्याही संकटाची पर्वा न करता ही सदैव कार्यरत असतात. आपलं कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे त्यांचाविषयी कौतुक वाटतंच. त्यात असे व्हिडियोज पाहिलं की त्यांच्या विषयीचे हे कौतुक अजून दुणावतं. या व्हिडियोच्या निमित्ताने या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या या कृतीचे कौतुक करावे तेवढे थोडे असे वाटते. आमच्या टिमकडून त्यांना त्यांच्या या कृतीबद्दल मानाचा मुजरा. आपणही हा व्हिडियो पाहिल्यावर आपल्याला हा व्हिडियो आवडला असेल हे नक्की. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या टीमने लिहिलेले लेख आवडीने वाचता आणि शेअर ही करता. त्यामुळे नवनवीन विषयांवर लेख लिहिण्याची ऊर्जा आपल्या टीमला मिळते. तेव्हा यापुढेही आपला पाठींबा आपल्या टीमच्या पाठी राहू द्या. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :