Breaking News
Home / मनोरंजन / ह्या पोलीस काकांनी केलेला डान्स होत आहे तुफान वायरल, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

ह्या पोलीस काकांनी केलेला डान्स होत आहे तुफान वायरल, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

वायरल व्हिडियोज आपल्या आयुष्यात मनोरंजनाचे एक नवीन साधन बनलं आहे. या साधनात दाररोज नवनवीन व्हिडियोजची भर पडत असते. पण तरीही काही व्हिडियोज असे असतात की ते बऱ्याच मोठ्या काळासाठी लक्षात राहतात. याचं प्रमुख कारण ते आपल्या हृदयाला भिडतात. त्याच्यापाठी असणारी गोष्ट आपल्याला भावते. एवढं सगळं आठवण्याचं कारण नुकताच वायरल झालेला एक व्हिडियो.

हा व्हिडियो आहे आपल्या पोलीस दलातील अमोल कांबळे यांचा. अमोल हे सन २००४ पासून पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या ते नाईक हवालदार या पदावर कार्यरत असल्याचं कळतं. पक्के मुंबईकर असणाऱ्या अमोल यांना लहानपणापासून डान्सची आवड होतीच. लहानपणी त्यांच्या मोठ्या भावंडांकडून डान्ससाठी त्यांना प्रेरणा मिळत गेली. पुढेही या डान्स क्षेत्रात येत कोरिओग्राफर होणं, हे त्यांचं ध्येय होतं. सोबतच पोलीस दलातील कामासाठी त्यांनी तयारी सुरू केली. नियतीच्या मनात होतं त्याप्रमाणे ते पोलीस दलात रुजू झाले आणि डान्स काहीसा पाठी पडला.

पण मूलतः डान्सची आवड असल्यामुळे अमोल यांच्या जीवनातील त्याचं महत्व कमी झालं नाही. किंबहुना जेव्हा टिक टॉक उदयास आलं आणि प्रसिद्धीस पोहोचलं, तेव्हा अमोल यांना डान्सर म्हणूनही लोकं ओळखायला लागली. मग टिक टॉक बंद झालं. पण इन्स्टाग्राम आणि युट्युब च्या माध्यमातून अमोल आपली कला सादर करत राहिले. यासाठी त्यांनी कामाशी मात्र कधी गल्लत केली नाही. आधी पोलीस म्हणून कर्तव्य आणि मग मोकळ्या वेळेत डान्स करणं त्यांनी पसंत केलं. पण जिथे सातत्य असतं, तिथे यश पाणी भरतच. अमोल यांच्या बाबतीत ही तसचं झालं. ते सोशल मीडियावर इतर डान्स कलाकारांसोबत डान्स करताना दिसतात. असेच ते आणि चिन्मय खेडेकर यांनी एकत्र येत डान्स करायचं ठरलं. त्यासाठी दोघांनी एक छोटंसं कथानक लिहिलं. हेच कथानक म्हणजे आपण पाहत असलेला वायरल व्हिडियो आहे. अर्थात त्यातही आपण केवळ अर्धा वायरल व्हिडियो बघतो.

त्या व्हिडियोच्या पहिल्या भागात अमोल हे आपलं कर्तव्य निभावताना दाखवले गेले आहेत. यात चिन्मय हे स्कुटरवरून जात असतात आणि मास्क घातलेला नसतो असं दाखवलं गेलंय. मग अर्थातच अमोल त्यांना अडवतात, मास्क घालायला सांगतात आणि निघून जायला सांगतात. मग थोडं पुढे गेल्यावर चिन्मय बघतात की पोलीस दादा थकले आहेत. त्यांना थोडं गंमतीदार वाटावं म्हणून मग हे पात्र त्यांना चिडवत चिडवत डान्स करायला भाग पाडतं. हा पहिला भाग आपल्या पैकी काहींनीच बघितला आहेच. पुढचा भाग आहे तो वायरल व्हिडियो जो सगळ्यांनी बघितला आहे आणि पसंत ही केला आहे. या व्हिडियोत अमोल आणि चिन्मय अतिशय उत्साहात ‘आया हैं राजा, लोगो रे लोगो….’ या गाण्यावर डान्स करताना दिसतात. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीयो. पण त्यात ही दोघांनी केलेल्या स्टेप्स छान वाटतात. त्यात नवनवीन स्टेप्स ही असतात आणि ऊर्जा ही कमालीची असते. जेव्हा एखादा डान्सर डान्स करतो, तेव्हा डान्सरची ऊर्जा नकळत बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये उतरते. आपणही यास अपवाद ठरत नाही.

बघा व्हिडीओ :

अमोल यांचा फुल पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स बघायला मिळतो आणि आपणही उत्साही होतो. त्यांचा हाच उत्साह त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये अनुभवायला मिळतो. अमोल यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक छान छान डान्स व्हिडियोज नवं माध्यमातून बघता येतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोवर्स ची संख्याही खूप उत्तम असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच येत्या काळातही ही फॉलोवर्स ची संख्या वाढत राहील आणि अमोल सुद्धा आपलं मनोरंजन करत राहतील हे नक्की. येत्या काळातही अमोल यांच्या कडून नवनवीन डान्स परफॉर्मन्सचं सादरीकरण होत राहावं आणि त्याची मजा आपल्याला घेता यावी ही इच्छा. तसेच यानिमित्ताने अमोल यांना आपल्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपल्याला हा वायरल व्हिडियो वरील लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या टीमने लिहिलेल्या प्रत्येक लेखाला आपण प्रोत्साहन देत असता. मग ते सकारात्मक कमेंट्स मधून असू देत किंवा अगदी मोठ्या प्रमाणावर लेख शेअर करणं असू देत. आपला पाठींबा आम्हाला सदैव लाभत आला आहे. येत्या काळातही आपला हा लोभ आपल्या टीमवर कायम राहू दे ही सदिच्छा. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा अमोल कांबळे ह्यांचे अजून काही डान्स व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *