Breaking News
Home / मनोरंजन / ह्या पो’लीस भाऊंची कला पाहून तुम्ही सुद्धा दं’ग व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या पो’लीस भाऊंची कला पाहून तुम्ही सुद्धा दं’ग व्हाल, बघा व्हिडीओ

आपली मराठी गप्पाची टीम आपल्या प्रत्येक लेखातून विविध विषयांवर लेखन करत असते. यातील काही विषयांवर लिहिताना आम्हालाही नवनवीन बाबी कळत जातात. यातून आमच्याही अनुभवात भर पडत जाते. आता आपल्या पोलीसांवरील लेखांचं उदाहरण घ्या ना. विविध वायरल व्हिडियोज वर आधारित असलेले लेख आपल्याला पोलिसांच्या आयुष्यातील विविध बाजू दाखवतात. मग ते स्वतःचं कर्तव्य बजावताना स्वतःचे प्राण धोक्यात घालणं असो वा पोलिसांतील दडलेले कलागुण असोत. मागील वेळेस म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आपल्या टीमने एक लेख लिहिला होता. त्यातून उत्तम बासरी वादन करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यांविषयी लेख लिहिला होता. त्याच्याच जोडीचा म्हणावा असा एक व्हिडियो आमच्या टीमने नुकताच पाहिला. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

हा व्हिडियो आहे काही वर्षांपूर्वीचा. त्यातही गणेशोत्सव काळातला. आपल्याला तर माहिती आहेच की गणेश विसर्जनाचा दिवस म्हणजे गणरायाची वाजतगाजत मिरवणूक आलीच. ही मिरवणूक साजिरी करायला मग बेंजो वाले, बँड वाले, ढोल ताशा पथकं आली. हा व्हिडियो ही यास अपवाद नाही. यातही एका गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक आपल्याला दिसून येते. मिरवणुकीच्या मध्यभागी विराजमान असतात ते खुद्द गणराज तर त्यांच्या पुढ्यात वादन करत असतात ते टिटवाळा बिट्स. व्हिडियो सुरू होतो, तेव्हा पूर्ण मिरवणूक दिसत असते. ओळखीचं गाणंही वाजत असतं. पण जस जसा कॅमेरा जवळ जाऊ लागतो तस तसा गाणंही बदलताना जाणवतं. हे बदललेलं गाणं असतं १९९३ साली आलेल्या अनारी चित्रपटातलं. ‘फुलो सा चेहरा तेरा’ हे या गाण्याचे बोल. वेंकटेश आणि करिष्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. एवढं सांगण्याचं कारण म्हणजे हे गाणं ज्या की बोर्ड वरून वाजत असतं ते त्या बँड मधला कोणीही वाजवत नसतो. तर आपले एक पोलीस दादा अगदी सहजतेने हे गाणं वाजवत असतात.

ज्या सहजतेने त्यांची बोटं त्या की बोर्ड वरून फिरतात त्यावरून त्यांना संगीत वाद्यांची असलेली आवड आणि वाद्य वाजवण्याची असलेली सवय लक्षात येते. तसेच त्यांच्या देहबोलीतून हे जाणवत असतं. कारण त्यात कुठलाही अवघडलेपणा नसतो. उलट अतिशय सहजतेने अगदी एका हाताने हे पोलीस दादा एकाग्र चित्ताने गाणं वाजवत असतात. हे चित्त भं’ग होतं जेव्हा गाडीवाला अचानक गाडी पुढे घेऊन जातो आणि त्यामुळे तंद्री तुटते. वाजवता वाजवता ते आपला नि’षेध नोंदवतात खरा. पण उपस्थित मात्र त्यांना गाणं वाजवत राहण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतात. तेव्हा असं लक्षात येतं की आजूबाजूला जमेलेल्यांना या दादांविषयी आणि त्यांच्या कलेविषयी किती उत्सुकता आहे. एव्हाना कॅमेरामन गर्दीतून बाहेर येत असतो. तो पाठी पाठी जात असताना ह्या दादांचं गाणं वाजवणं सुरू असतं. पण गर्दी तर वाढलेली असते हे नक्की. कारण एरवी वर्दीत वावरताना गर्दीला एकट्याने आवर घालणारे हे दादा, मनातून किती दर्दी आहेत ह्याचा प्रत्यत आपल्याला येत असतो.

उपस्थितांना त्यांचं जसं कौतुक वाटत असतं, तसंच कौतुक आपल्या टीमलाही वाटलं. आज ते दादा कुठे असतील ते माहिती नाही. पण त्यांच्यामुळे पोलीस दलातील आमच्या अधिकाऱ्यांची एक कलात्मक बाजू बघता आली, याचा आम्हाला आनंद आहे. आम्हाला खात्री आहे, तुम्ही ही या व्हिडियो वरील लेखाचा आनंद घेतला असेल. आपल्याला हा लेख आवडला असणारच आहे, तेव्हा हा लेख नक्की शेअर करा. अजिबात विसरू नका. तसेच आपली टीम दर दिवशी विविध विषय आपल्यासमोर मांडत असते. तेव्हा हे नवनवीन लेख आवर्जून वाचत राहा, जसे तुम्ही आजही वाचता आहात. आपल्या खंबीर आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *