Breaking News
Home / मनोरंजन / ह्या पोलीस भाऊंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

ह्या पोलीस भाऊंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

आमची टीम सातत्याने विविध विषयांवर लिहीत असते. अस असलं तरी काही विषय हे नित्यनेमाने हाताळले जात असतात. कारण ते लोकप्रिय असतात. तर काही विषय हे लोकप्रिय असले तरी त्यांच्याविषयी तसं कमीच लिहिलं जातं. कारण, त्यांच्याविषयी वाच्यताच कमी होते. किंवा ते अभावानेच आपल्या समोर येत असतात. असाच एक विषय म्हणजे पोलिस आणि त्यांचं आपल्या आयुष्यातील विविध बाबींमधलं योगदान होय.

आमच्या टीमने आतापर्यंत जेव्हा जेव्हा या विषयावर लिहिलं आहे तेव्हा तेव्हा हा विषय लोकप्रिय ठरला आहे. कारण खरं पाहता पोलीस, त्यांची वर्दी, त्यांचं काम, त्यांची काम करण्याच्या विविध पध्दती, त्यातील गूढता ही सगळ्यांनाच आवडते. त्याविषयी जाणून घ्यायला कोणालाही आवडतं. कारण त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपल्याला थ्रिलर वाटत असतात. त्या गोष्टींचं आपल्याला आकर्षण असतं. आपल्याला ही असं जगता यावं ही मनोमन इच्छा असते. पण म्हणून त्यांच जीवन किती खडतर आहे याची ही आपल्याला जाणीव असतेच. किंबहुना हे अस जीवन स्वतः जगण्याचा विचार ही कठीण असतो. तर ते जगणं किती कठीण असेल. बरं, काम म्हणजे ठराविक काही आहे असं ही नाही. क्षणांत समोर काळ ही समोर उभा राहू शकतो. अनिश्चितता ही तर जणू राशीलाच लागलेली असते.

आता आज आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोच उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो चार ते पाच वर्षांपूर्वीचा आहे. व्हिडियो म्हणजे एका भाजी मंडईत घडलेली घटना आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला दोन पोलिस अधिकारी समोर उभे असलेले दिसून येतात. आजूबाजूला बरीच माणसं जमलेली असतात. तसेच बरेचसे फेरीवाले ही दिसून येतात. त्यावरून हा बाजारातील परिसर असावा असा अंदाज करू शकतो. तिथे पाणीही बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेलं असतं. या अशा सगळ्या गडबडीच्या ठिकाणी हे दोन्ही अधिकारी पायातील खाकी पॅन्ट फोल्ड करून उभे असतात. त्यातील एक अधिकारी हातात एक मोठा हँगर घेऊन तो वाकवत असतात. नक्की काय झालं असावं हा अंदाज काही वेळाने यायला लागतो. कारण ते त्या हॅंगरचा पुढचा वळलेला भाग तसाच ठेवतात. मग एका क्षणी, ते खाली बसतात. तेव्हा कॅमेऱ्या मागून एक आवाज येतो तो सांगतो की साहेब ‘पाण्यात तोंड इथून दिसतंय’. म्हणजेच एखादा प्राणी आणि त्यातही साप असावा हा आपला अंदाज जवळपास बरोबर ठरलेला असतो. किंबहुना तो किती बरोबर ठरतो हे काही वेळातच कळतं आणि धक्का बसतो. कारण हे पोलीस अधिकारी पाण्यात दडलेल्या सापाची शेपटी शोधत असतात. पण नंतर लक्षात येतं की ती त्यांच्या अगदी पायाजवळ असते.

एवढ्या पाणथळ जागेत आणि एवढ्या कोलाहलात जराशी चूक पण अंगाशी येऊ शकते. पण सुदैवाने हे पोलीस अधिकारी असं काही होऊ देत नाहीत. दुसरे अधिकारी गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करत असतात. बरोबर ही असतं. तो सापड्या इथे तिथे पळाला असता तर बराच गहजब होऊ शकला असता. अगदी तो कोणाला चावो न चावो, पण धक्काबुक्की होऊच शकते. मग चेंगराचेंगरी ही काही अशक्य नसते. पण या सगळ्या प्रकारात ही हे दोन्ही अधिकारी अगदी कौतुकास्पदरित्या सगळं शांतपणे हाताळतात. तसेच ज्यांच्या हातात साप असतो त्यांचं तर कौतुक करावे तेवढं थोडं आहे. कारण तो साप विषारी की बिनविषारी आहे हे माहीत नसताना ही ते सरळ सगळं प्रकरण हाताळतात. आमच्या टीमला पोलीस दलाविषयी आदर आहेच. आज हा व्हिडियो बघून तो अजून दुणावला आहे. आपल्याला ही हा व्हिडियो अंगावर शहारे आणणारा आणि तरीही अभिमान वाटायला लावणारा आहे हे नक्की. आमच्या टीमने सदर व्हिडियो या लेखाच्या खाली शेअर केलेला आहे. आपण हा व्हिडियो नक्की बघा. जेणेकरून त्यांनी अंगावर घेतलेला प्रसंग किती बाका होता ते आपल्याला ही जाणवेल..

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.