सध्या लग्नाचा काळ आहे आणि अनेक सेलिब्रिटीज लग्नबंधनात अडकत आहेत हे सध्या एक परवलीचं वाक्य झालं आहे. मराठी गप्पाच्या वाचकांना तर याबाबतीतच्या ताज्या बातम्यांची सवय झाली असेल. कारण आमची टीम अगदी नित्यनेमाने सेलिब्रिटींच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या बातम्या आपल्या पर्यंत पोहोचवत आलेली आहे. आज याच यादीत अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलेलं आहे.
या प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे शाश्वती पिंपळकर होय. बालक पालक या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री. आपण तिला अनेक मालिका आणि चित्रपटांतून अभिनय करताना पाहिलेलं आहेच. बालक पालक हा तिचा पहिला चित्रपट. पुढे तिने मधू इथे आणि चंद्र तिथे ह्या चित्रपटातून मुख्य व्यक्तिरेखा साकार केली होती. चित्रपटांमप्रमाणेच तिच्या मालिकांतील भूमिकाही गाजल्या. शेजारी शेजारी पक्के शेजारी, सिंधू, चाहूल या तिच्या मालिका गाजल्या. शेजारी शेजारी मधील विनोदी भूमिका तिने खुबीने रंगवली. तसेच सिंधू या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका रंगवताना तिने स्वतःचा पूर्ण अनुभव पणाला लावला. अशा या गुणी अभिनेत्रीने १७ डिसेंबर रोजी राजेंद्र करमरकर सोबत लग्न केलेलं आहे. त्याच्या आदल्याच दिवशी त्यांचा साखरपुडा ही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. राजेंद्र हा सुद्धा एक उत्तम कलाकार आहे. तो प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. तसेच त्याने इंटिरियर डिझायनर म्हणून शिक्षण पूर्ण केलेले आहे. दोघांचीही सामाईक आवड म्हणजे ढोल ताशा पथकातील वादन.
दोघांच्या या लग्नानिमित्त अनेक कलाकार तसेच चाहत्यांनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे. यात प्रामुख्याने नाव घ्यावेसे वाटते ते लोकप्रिय अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांचे. शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेत त्या दोघींच्या महत्वपूर्ण व्यक्तिरेखा होत्या. या समारंभास उपस्थित अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून या नवपरिणीत जोडीस शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी गप्पाच्या टीमकडूनही शाश्वती आणि राजेंद्र यांना पुढील एकत्र वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
वर आपण उल्लेख वाचलात तो सुलेखा तळवलकर यांचा. सुलेखाजींच्या अभिनय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आमच्या टीमने काही दिवसांपूवी घेतला होता. आपण वर दिलेल्या सर्च ऑप्शन चा वापर करून तो लेख वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला सुलेखा तळवलकर असं लिहून सर्च करायचं आहे. तसेच अनेक कलाकारांनी या काही महिन्यांत साखरपुडे आणि लग्न केलेली आहेत. त्यांचे लेख वाचण्यासाठी लग्न साखरपुडा असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. आपल्या बहुमूल्य वेळेसाठी धन्यवाद !