लावणी ही एकमेव अशी गोष्ट आहे, जिच्या ढोलकीची थाप आपल्या कानावर आली की आपले पावले आपोआप त्या दिशेने वळू लागतात. जशी महाराष्ट्रात कीर्तन,प्रवाचनाची परंपरा आहे, तशीच महाराष्ट्राच्या मनात खोलवर रुजून बसलेली कला म्हणजे तमाशा आणि त्यातील लावणी. तुम्ही गावाकडच्या कोणत्याही जत्रेत जा, तिथे तुम्हाला तमाशा दिसेल आणि तमाशात जलद गतीत नाचणारी, लोकांना फेटे, टोप्या उडवायला मजबूर करणारी एक ललना दिसेल. खांद्यावरून मागे सोडलेल्या नऊवारी लुगड्याचा पदर दोन्ही हातांत डोक्यामागे शिडासारखा धरून केले जाणारे पदन्यास ही लावणीची खास वैशिष्ट्ये आहेत. डफ-तुणतुण्याच्या साथीने गाजणारी शाहिरी लावणी असो वा तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीची बैठकीची लावणी असो… मराठी माणूस कायमच लावणीच्या प्रेमात राहिलेला आहे. नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणारी फडाची लावणी पहिली नसेल, असा एकही खेडूत तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.
दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला, उगवली शुक्राची चांदणी, मला लागली कुणाची उचकी, छबिदार छबी मी तोऱ्यात उभी, बाई मी पतंग उडवीत होते पासून तर आजच्या वाजले की बारा अशा एकूनएक लावण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले. थेट खेड्यात जाऊन नाही पण टीव्हीवर शहरी लोकांनीही या लावण्यांचा आस्वाद घेतला. या रावजी तुम्ही बसा भावजी, ही लावणी तर मराठी माणसालाच नाही तर भारतातील कला क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. ज्यांना लावणी हा प्रकार कळत नाही, तेसुद्धा या लावणीचा आनंद घेऊ शकतात.
खरंतर मनोरंजन म्हणून सहज निर्माण झालेला लावणी हा प्रकार आज मराठी सिनेमा ते बॉलिवूड ते फॉरेनपर्यंत प्रवास करत आहे. परदेशात लावणी नेऊन पोहोचवणारे कलावंत याच मराठी मातीने दिले. ढोलकीचा ताल…घुंगरांचे बोल आणि सौंदर्याची नजाकत असणाऱ्या लावणीच्या प्रेमात फॉरेनचे लोकही पडले. असाच एक फॉरेनचा व्हिडिओ आमच्या टिमकडे आला. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत परदेशी मुलींनी लावणीवर डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स इतका अफलातून होता की, खास मराठी लावणी करणाऱ्या एखाद्या महिलेने प्रशिक्षण दिले आहे, असे वाटावे. भारी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रसिद्ध झालेली वाजले की बारा या लावणीवर य फॉरेनच्या पोरी नाचत होत्या.
सेम हावभाव, सेम डान्स स्टेप, सेम वेशभूषा… जणू काही स्टेजवर एका लावणी नृत्यांगना नाचत होती, इतकं हुबेहूब नृत्य. या पोरींनी एवढा हुबेहूब डान्स कसा केला, यापेक्षा जास्त मोठं कोडं आम्हाला पडलं ते वेगळंच होतं. फॉरेनमध्ये खण-चोळी, नऊवारी साडी आणि इतर दागिने कसे मिळाले, त्यांना नऊवारी साडी घायलाचे कुणी शिकवले. एवढं सगळं घालून डान्स करणे, म्हणजे भले मुश्किल काम… तेही या पोरींनी सहज करून दाखवले.
आपल्याला दुसऱ्या संस्कृतीचे कपडे घातले तरी एकदम अस्वस्थ वाटते, मात्र रोज जीन्स, वनपीस मध्ये वावरणाऱ्या पोरी अंगभर कपडे नेसतात आणि ते घालून नाचतात, म्हणजे त्यांच्या कष्टाची आणि त्यांना सादर केलेल्या कलेची दाद द्यायलाच हवी. या कलेचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा.
हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :