लहान मुलं आणि त्यांचे वायरल व्हिडियोज हे काही आपल्याला नवीन नाहीत. किंबहुना त्यांचा निरागसपणा दाखवणारे व्हिडियोज काही क्षण का होईना आपल्याला आनंद देऊन जातात. तर काही वेळेस त्यांच्या हुशारीचं कौतुक वाटायला लावणारे व्हिडियोज ही असतात. मध्यंतरी काही व्हिडियोज असे ही आले होते ज्यात आईशी भांडणारी लहान मुलं आपल्याला दिसली।होती. त्याच प्रकारचा एक व्हिडियो काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. यात मात्र वडील आणि मुलगा यांच्यातलं लुटुपुटुचं भांडण आपल्याला अनुभवायला मिळतं. काही तरी वेगळं आहे म्हणून आपल्या टीमने त्यावर हा आजचा लेख लिहण्याचं ठरवलं. चला तर मग थोडंसं जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी. या व्हिडियोत आपल्याला एक चिमुकला आणि त्याचे आईवडील भेटतात. आई वडील कॅमेऱ्यामागून आवाजाच्या माध्यमातून भेटतात, तर हा लहान मुलगा कॅमेऱ्यासमोर असतो.
वडील आपल्या मुलाची मस्करी करत असतात. लहान असल्यामुळे तो त्याच्या वडिलांना कामाला जाऊ नका असं सांगत असावा. त्याचे वडील त्याला त्याबद्दलच चिडवत असतात. यात अजून गंमतीचा भाग असा की अगदीच लहान असल्याने हा लहान बाळ आपल्या वडिलांनी बोललेलं पुन्हा त्यांना ऐकवत असतो. त्यामुळे अजून गंमत वाटते. त्यात जवळच बसलेली आईसुद्धा मजा घेत असते. तेवढ्यात विषय येतो तो घरात थुंकल्याचा. या लहान बाळाच्या तोंडून थुंकी बाहेर पडली असावी. त्यावर वडील त्याला मस्करी मस्करीत जाब विचारत असतात. पण हे बाळराजे वडिलांची कमेंट्स कॉपी पेस्ट करून त्यांना ऐकवत असतात. एका क्षणाला हा छोटा थोडा गोंधळतो सुद्धा. काही नवीन मुद्दा मांडता येतो का याचा तो अंदाज घेत असतो. पण लहान वय यामुळे जास्त काही सुचत नाही. मग सुरू होते ती हालचाल.
बेडवर उड्या मार, खुर्ची सरकव. पण या संपूर्ण व्हिडियोत आपलं म्हणणं काही सोडत नाही. कॅमेऱ्यामागून त्याचे आईवडील मजा घेत असतात तर इंटरनेट वर आपण. मजा घेण्याचं कारण अर्थातच त्याचं अगदीच लहान वय.
आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत. तुम्ही नक्की पहा आणि आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. बरं, मंडळी आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले लेख आवडताहेत हे बघून आनंद वाटला. आपण जेव्हा हे लेख सोशल मीडियावर शेअर करता, कमेंट्स करता यावरून आम्हाला याचा अंदाज येतो. आपला हा आनंद टिकून राहील आणि वृद्धिंगत होत राहील यासाठी मराठी गप्पाची टीम नेहमीच कार्यरत राहील हे नक्की. आपणही आपल्या पाठिंबा कायम ठेवा. मराठी गप्पावर असाच लोभ असू दयावा. मनापासून धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :