आपली टीम सातत्याने लेखन करत असते हे आपण जाणताच. पण हे अस सतत लिखाण करून करून नाही म्हणायला मेंदू थकून जातो. मनाला एकदा शिणवटा आला की मग शरीर कितीही तंदरुस्त असलं तरी फरक पडत नाही. ते शेवटी मग निद्रादेवीच्या अधीन होतं आणि मग उठल्यावर आपल्याला जरा कुठे बरं वाटू लागतं. आपण सगळेच जण हे अनुभवत असतो. पण मंडळी, असा थकवा काही सांगून येत नाही. काही वेळा तर भर दिवसा असा थकवा येतो. आमच्या कामात तर हे होतंच. पण त्यावर एक सुंदर उपाय आमची टीम अंमलात आणते.
आम्ही शांत, संयमी गाणी ऐकणं पसंत करतो. त्यात अर्थातच भावगीतं आणि भक्तीगीतांचा समावेश असतो. भक्तीगीतांमध्ये तर अशी काही ताकद असते की विचारू नका. कारण ही गीत नुसती गुणगुणायला सुरुवात केली आणि एकदा ब्रम्हानंदी टाळी लागली की बरं वाटतं. मग कोणी तरी त्यातून जागं करून कामाची आठवण करून दिली की पुन्हा आपण आपल्या रहाटगाडग्याकडे येतो. पण त्या काही क्षणांनी आपल्याला पुन्हा एक नवीन ऊर्जा दिलेली असते. एक प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर आलेली असते. बरं ही प्रसन्नता केवळ मन थकल्या भागल्यावरच येते असं नाही. ही भक्तीगीत कधीही ऐका, बरंच वाटतं.
एवढंच कशाला नुसता टाळ मृदुंगाचा ताल कानावर पडला तरी बरं वाटतं. मध्यंतरी असंच झालं. आमची टीम नेहमीप्रमाणे काही तरी काम करत होती. एकदम कंटाळा आला नसला तरी आता लिखाण नको असंच वाटत होतं. जाऊ दे नंतर लिहू असाच सगळ्यांचा विचार झाला. मग काय सगळेच पेंगले. पण त्यातील एका मित्रामध्ये अजूनही थोडी ऊर्जा शिल्लक होती. तो म्हणाला मी नवीन विषय बघतो काही मिळतात का ते ! आम्ही म्हंटलं ठीक आहे. पुढच्या काहीच क्षणांत साहेबांना एक व्हिडियो दिसला. अगदी काही क्षणांचा असा हा व्हिडियो होता. एका मिनीटापेक्षा ही कमी वेळेचा हा व्हिडियो आहे. या व्हिडियोत आपल्याला काही कीर्तनकार मंडळी दिसून येतात. कीर्तनकार म्हंटलं की अभंग, देवाची स्तुती आणि ती करताना रंगलेली मंडळी असं एक चित्र कायम डोळ्यासमोर उभं राहतं. इथेही असंच काहीसं चित्र होतं. मुख्य कीर्तनकार बुवा स्वतःचा पोशाख सावरत तयारी करत होते. तर पलीकडे अनेक भक्तगण देवाच्या नामात गुंग झाले होते. पण या सगळ्यांमध्ये आमचं लक्ष वेधून घेतलं ते एका बाल कीर्तनकाराने !
वय अगदीच लहान असंल तरी या चिनुकल्याची ब्रम्हानंदी टाळी लागलेली होती. त्याच्या देहबोलीवरून ते कळत होतं. या व्हिडियोत हा बालकीर्तनकार आपल्याला मुख्य कीर्तनकारांच्या आसपास फिरताना दिसतो. अर्थात वर उल्लेख केल्याप्रमाणे तो तल्लीन झालेला असतो. त्याचा हा आनंद आपल्याला व्हिडियोतुन बघताना ही जाणवतो तर विचार करा खुद्द उपस्थित लोकांना हा आनंद किती पटीने जाणवला असेल. हा व्हिडियो तसा कमी वेळेचा असल्याने पटकन बघून झाला. पण आमच्या मनावरचं मळभ काही अंशी दूर करण्यात मात्र या व्हिडियोमुळे यश आलं. अर्थात ते पूर्ण दूर करण्यासाठी मग आम्ही भक्तीगीतं, भावगीतं आणि संथ, शांतपणाचा अनुभूती देणारी गाणी ऐकली. पण त्या सगळ्याची सुरुवात या व्हिडियो पासून झाली होती. तेव्हाच ठरवलं, आमच्या टीमला एवढा आनंद देणारा हा व्हिडियो आपल्या वाचकांना ही आनंद देईलच. तेव्हा त्यावर लेख लिहायलाच हवा. यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे.
आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :