सध्या लहान मुलांचे विविध व्हिडियोज वायरल होत आहेत. अर्थात लहान मुलं कळत नकळत असं काही बोलून जातात की भल्याभल्यांची बोलती बंद होते. हे आधीही व्हायचं, पण सोशल मीडियाच्या उदयानंतर याचे व्हिडियोज सगळ्यांसमोर येत आहेत. हे पाहताना गंमत येते कधी कधी अचंबित व्हायला होतं की एवढं कसं काय बोलून जातात ही मुलं. सध्या वायरल होणाऱ्या लहान मुलांच्या गंमतीशीर व्हिडियोजच्या निमित्ताने, दोन लहान मुलींच्या दोन गंमतीशीर व्हिडियोजची यानिमित्ताने आठवण झाली.
पहिल्या व्हिडियो मध्ये एक चिमुकली बोलायला सुरुवात करते. ‘आता मी हिला काय केलं होतं काय’ असं अगदी एखाद्या मोठ्या महिलेच्या अविर्भावात म्हणते आणि व्हिडिओ सूरु होतो. तिला कोणीतरी काही बोलल्याने ती चिडलेली असते. तिच्या बोलण्याची तऱ्हा, बोलताना हातवारे करणं यामुळे या व्हिडियो मध्ये गंमत निर्माण होते. बोलताना म्हणते, ‘हिला कोणी सांगितलं होतं भांडी घासायला?’ आणि समोरून तू भांडी घासतेस का असं म्हंटल्यावर ‘तूच घास’ असं अगदी ठसक्यात उत्तर देते. तिच्या या चुरचुरू बोलण्याने हा अगदी अर्ध्या मिनिटाचा व्हिडियो प्रचंड वायरल झाला होता.
बघा पहिला व्हिडीओ :
दुसऱ्या एका व्हिडियो मध्ये मुलगी आहे जी आपल्या आईशी भांडते आहे. तिच्या आईने तिचे केस व्यवस्थित बांधलेले असताना, ती ते सोडून देते म्हणून आई तक्रार करत असते. त्यावर चिडलेली ही मुलगी आईला नकार देते. तिला ओरडत असते आणि बोलण्याच्या नादात एके ठिकाणी मात्र गोंधळते. तिला म्हणायचं असतं, डोकं फिरलंय तर त्या ऐवजी ती म्हणते, संताप नको फिरवु. तिच्या या बोलण्याने हा व्हिडियो पाहणारा, गालातल्या गालात हसायला लागतो. व्हिडियो मध्ये तिच्या आईसोबत इतरही घरची व्यक्ती असते. ती वाक्यात बदल सुचवते, ‘तुला डोकं फिरवू नको असं म्हणायचं आहे का?’ असं विचारते. पण स्वतःच्या म्हणण्यावर ठाम असणारी ही चिमुकली मात्र नकार देत, तिचं म्हणणं कसं खरं आहे हे सांगते. शेवटी मात्र तिच्या आईला राग अनावर झाल्याने मग मात्र तिला माघार घ्यावी लागते आणि व्हिडियो संपतो.
बघा दुसरा व्हिडीओ :
या व्हिडियोजप्रमाणेच मराठी गप्पाची टीम वेळोवेळी विविध वायरल व्हिडियोजवर लेख लिहीत असते आणि ते तुमच्या भेटीस आणत असते. तुम्हाला अजूनही काही वायरल व्हिडियोज विषयी वाचायचं असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. सर्च मध्ये जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !