डान्स हि एक कला आहे. प्रत्येकाच्या अंगात डान्स हा असतोच. प्रत्येकाची डान्स करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते. काही अप्रतिम डान्स करतात, तर काही अतरंगी डान्स करतात. अप्रतिम डान्स जितका बघायला बरं वाटतो तितकीच अतरंगी डान्सची एक वेगळी मजा आहे. आणि असे अतरंगी डान्स सोशल मीडियावर वायरल सुद्धा खूप होत असतात. ह्या अतरंगी डान्सचा किडा अनेकांच्या अंगात असतो. तो त्या त्या वेळी बाहेर येतच असतो. आजपर्यंत आपण अनेक अतरंगी डान्स पाहिले असतील. मग ते मोर डान्स असो, मुर्गा डान्स असो किंवा मग नागीण डान्स असो. परंतु आजच्या व्हिडीओ मध्ये ह्या सर्वांपेक्षाही वेगळा असा डान्स पाहायला मिळणार आहे. अर्थातच हा डान्स खूप विनोदी असणार आहे, त्यामुळे तो पाहताना मजा देखील तितकीच येणार आहे. तर मित्रांनो आजचा खास डान्स असणार आहे ‘गायछाप डान्स’.
तुम्ही नाव ऐकूनच थोडे दचकले असाल. गायछाप डान्स म्हणजे नक्की काय असेल, कसा डान्स असेल. तर थोडं थांबा, गायछाप डान्स म्हणजे नाचता नाचता गायछाप मळणे होय. आम्हांला सुद्धा हा व्हिडीओ पाहून कळलं ते. तर व्हिडीओ बद्दल म्हणायचे झालं तर, समारंभात मुलं संगीतावर नाचत असल्याचे दिसत आहे. कदाचित हळदी समारंभ वाटत आहे. स्टेजवर काही जण उभे राहून मोबाईलवरून नाचणाऱ्या मुलांचे व्हिडीओ काढत आहेत. मुलं जोशात आपापल्या पद्धतीने एकत्र नाचत आहेत. परंतु एक मुलगा मात्र ह्या सर्वांपासून थोडे बाजूला येऊन नाच करत आहे. त्याच्या डान्स स्टेप सुद्धा काहीश्या वेगळ्या आणि हटके आहेत. भाऊ अगोदर आपल्या तालात नाचत आहेत. त्यानंतर अचानक भाऊंना काय झाले काय माहिती, काही वेळातच भाऊंनी खाली वाकून गायछाप मळायला सुरुवात केली. पाहून असं वाटलं कि खरोखरच भाऊ गायछाप मळत असेल. परंतु मग थोड्याच क्षणात उभे राहून एका हटके अंदाजात एका हातांवरून दुसऱ्या हाताची बोटे फिरवू लागले. तेव्हा कळलं कि भाऊ डान्स करत आहेत. नाचणारी आजूबाजूची काही मुलं सुद्धा भाऊंचा हा अतरंगी डान्स पाहून मजा घेत होते.
मग पुढे एक दोन पाऊले चालत भाऊ हात डावी कडे तर कधी उजवीकडे करत गायछाप मळायची ऍक्टिंग करत डान्स करू लागले. त्यानंतर पुन्हा खाली वाकून मळत पुन्हा हातावर बोटं फिरवली. नंतर भाऊंनी एक हात मागे करत एका हाताने एकदाची ती काल्पनिक अशी गायछाप पूड तोंडात टाकल्याची ऍक्टिंग केली. आणि काही क्षणात तोंडातून पिचकारीसुद्धा दिल्याची ऍक्टिंग केली. त्यानंतर भाऊ छाती पुढे करत दोन हात मागे करत एका रुबाबात डान्स करत असलेल्या मुलांच्या घोळक्यात जातो. आणि मग त्यांच्यासोबत डान्स करू लागतो. हे सर्व गायछाप क्रिया ते संगीताच्या बिट्स वर करत होते, त्यामुळे गायछाप डान्स सुद्धा बघायला पाहणार्यालाही मजा येते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांना आवडला. काहीतरी नवीन त्यातही हटके स्टेप्स ह्यामुळे पाहणाऱ्यांचेसुद्धा मनोरंजन होऊन जाते. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्हांला कसा वाटलं हा डान्स नक्की कळवा. आणि मराठी गप्पाला मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद .
बघा व्हिडीओ :