Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंची भाजी विकण्याची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी पाहून तुमचेदेखील मनोरंजन होईल, बघा व्हिडीओ

ह्या भाऊंची भाजी विकण्याची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी पाहून तुमचेदेखील मनोरंजन होईल, बघा व्हिडीओ

आपल्याकडे असणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा कधी कधी प्रत्यक्ष जीवनात प्रत्यय येतो. त्यावेळी वाटतं, आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी अगदी चपखल आणि कमीत कमी शब्दांत सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. त्याचंच एक उदाहरण आमच्या टीमला एक व्हिडियो बघताना मिळालं. हा व्हिडियो बघताना आम्हाला, ‘बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, पण न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही’ याचा प्रत्यय आला. तसेच कधी काय बोलावं, याची ही पुन्हा एकदा उजळणी झाली.

हा व्हिडियो तसा फारसा जुना नाहीये. पण आमच्या टीमने आज बघितला. म्हंटलं, याविषयी लिहायला हवं जेणेकरून आपल्या वाचकांना याविषयी कळेल. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका रस्त्यावरचं दृश्य दिसतं. तो रस्ता म्हणजे एका बाजूने भाजी मंडई असते. तसेच संध्याकाळची वेळ असते. म्हंटल्यावर थोडी माणसांची आणि थोडी वाहनांची वर्दळ ही असते. पण या सगळ्यांमध्ये एक माणूस आपलं लक्ष वेधून घेत असतो. हा माणूस म्हणजे एक भाजी विक्रेते दादा असतात. भाजी आणल्या जाणाऱ्या क्रेटवर उभे राहून, लोकांना भाजी विकत घ्यायचं आव्हान करत असतात. आता भाजीविक्रेते म्हंटले की बोलबच्चन असणार हे माहिती असतं. पण हे दादा त्याच्या एक पाऊल पुढे जाणारे असतात. ते बोलबच्चन नसतात. पण बोलता बोलता, मनोरंजन करणारे असतात.

खरं तर भर रस्त्यात उभं राहून हे असं दणदणीत बोलणं, अनेकांना जमत नाही. अनेकजण तर याचा विचार पण करू शकत नाहीत. पण हे दादा मात्र बिनधास्तपणे बोलत असतात. तसेच त्यांची देहबोली सुद्धा यात महत्वाची ठरत असते. पहिल्यांदा बघणाऱ्याला गंमत वाटावी असं हे त्यांचं वागणं असतं. हा व्हिडियो चित्रित करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्यांच्या याच वागण्यामुळे हा व्हिडियो चित्रित करावासा वाटला असणार. बरं, यात एक पाहुणा बालकलाकार ही असतो. भाजीच्या ठेल्यावर काम करणारा मुलगा अचानक या दादांच्या बाजूला येऊन उभा राहतो. त्यांना प्रतिसाद ही देतो. त्यामुळे ते ही हसायला लागतात. पण एक वेळ अशी येते की हा मुलगा ही त्यांच्या सारखं बोलयाला बघतो. पण त्याची एक चूक होते. तो भाज्यांचा भाव मोठ्याने सांगू पाहतो. नेमकी हीच गोष्ट हे दादा त्याच्या लक्षात आणून देतात आणि त्यांची हुशारी ही दिसून येते. कारण तो मुलगा जसे भाव ओरडून ओरडून सांगत असतो तसे बाकीचे भाजीवाले ही सांगतात. पण हे दादा, त्या भाज्यांविषयी बोलत असतात. पैशांविषयी नाही. तसेच या बोलण्यात मजेशीर वाक्य घालून लोकांचं लक्ष आकर्षून घेत असतात. ते त्याला एका वाक्यात हेच समजावतात. आपल्यापैकी कधी कोणी, सेल्स विभागात काम केलं असेल तर याचं महत्व कळून येईल.

कधीही सुरुवात करताना वस्तूच्या गुणांविषयी बोला, किंमतीविषयी नाही हेच तर आपण सेल्स मध्ये शिकतो. इथेही तेच होताना दिसून येतं. आमच्या टीमला नेमकं हेच आवडून गेलं. कारण यात मनोरंजन आहेच, पण सोबतच व्यवहार्य धडाही शिकायला मिळतो. किंवा त्याची उजळणी होते. बाकी या व्हिडियोत जी काही मजा आहे ती शब्दात बांधून तिला कमी करायचं नाहीये. तेव्हा आम्ही सदर व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर करतो आहोत. आपण त्याचा आनंद जरूर घ्यावा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचावेत ही विनंती.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *