Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंनी आपल्या वेगळ्या शैलीत केलेला डान्स होतोय लोकप्रिय, बघा व्हिडीओ

ह्या भाऊंनी आपल्या वेगळ्या शैलीत केलेला डान्स होतोय लोकप्रिय, बघा व्हिडीओ

आता लग्नाचा सुकाळ आहे असं म्हंटल्यावर वावगं ठरू नये. जवळपास प्रत्येकाच्या व्हाट्सएपच्या स्टेटसवर विविध ठिकाणी लग्नाला जाऊन आल्याचे फोटोज आणि व्हिडियोज एव्हाना प्रसिद्ध व्हायला लागलेले आहेत. त्यातही या लग्नात जर कोणी डान्स केला असेल तर त्याचे व्हिडियोज तर अगदी आठवणीने अपलोड केले जात असतील. शेवटी लग्न म्हंटलं की थोडा बहुत तो डान्स बनता ही हैं. मग हा डान्स वरातीत केलेला असो वा मंडपातील जागेवर. खरं तर डान्स हा कलाप्रकारच मुळात आपल्या इतक्या आवडीचा आहे की जवळपास प्रत्येक समारंभात आपण डान्सचा अंतर्भाव केलेला असतो.

त्यातही जर डान्स करणारी व्यक्ती एकदम जबरदस्त डान्सर असेल तर मग काय विचारू नका. अनेक वेळेस तर अशा होतकरू व्यक्तींना डान्स करण्यास विनंती केली जाते. बरं यातील काही जण हे डान्सचं प्रशिक्षण घेतलेले असतात तर काहींनी याचं प्रशिक्षण घेतलेलं नसतं. पण खरं तर अशा समारंभात प्रशिक्षण घेतलं नसेल तरीही चालतं. कारण उपस्थितांना समोरच्या व्यक्तिने मनापासून डान्स करणं अपेक्षित असतं. त्यामुळे होतं काय तर डान्स करणारा डान्स करता करता मजा घेतो आणि हीच मजा उपस्थितांना ही घेता येते.

बरं आपल्या प्रत्येकाच्या ओळखीची एखादी तरी अशी व्यक्ती असतेच असते ज्यांना डान्सची प्रचंड आवड असते आणि त्यांचा डान्स बघणं ही पर्वणी असते. सोशल मीडियावर तर अशा विविध होतकरू कलाकारांचे व्हिडियोज कित्येक पटीत पाहायला मिळतात. पण तरीही काही व्हिडियोज हे लक्ष वेधून घेतातच. यातीलच एक आघाडीचं नाव म्हणजे बॉबी डान्सर हे होय. खरं तर या दादांचं नाव काय आहे याची कल्पना नाही. पण युट्युबवर त्यांचे जे व्हिडियोज प्रसिद्ध झाले आहेत त्यात त्यांचं नाव बॉबी डान्सर असल्याचं कळून येतं. असो. तर या दादांचे जवळपास तीन ते चार व्हिडियोज प्रसिद्ध झाले आहेत. पण व्हिडियोजची एवढी कमी संख्या असूनही हे दादा प्रत्येक व्हिडियोत आपली छाप पाडून जातात. त्यामुळे पूढे कधी त्यांचा एखादा नवीन व्हिडियो जरी पाहण्यात आला तरी आपल्याला त्यांचे जुने परफॉर्मन्स बघितल्याचं आठवेल. पण हे असं का? तर उत्तर आहे या दादांच्या डान्स स्टाईल मध्ये. या दादांची डान्स स्टाईल ही कोणत्याही ठराविक डान्स प्रकारात बसत नाही. ते केवळ मनापासून नाचतात. त्यात कोणताही अभिनिवेश नसतो. त्यामुळे बघणाऱ्याला आपल्याला पण अस नाचता यायला पाहिजे असं वाटत राहतं. त्यात त्यांच्या डान्समध्ये एकप्रकारची लय आहे. जी त्यांच्या प्रत्येक डान्स परफॉर्मन्स मध्ये दिसून येते.

तसेच ज्याला आपण सिग्नेचर डान्स मुव्ह्ज म्हणू अशा पण काही डान्स स्टेप्स ते करतात. त्यातील एक म्हणजे पोटाजवळ हात नेत पोटाची हालचाल करणं. कदाचित आपल्याला आता वाचून कळणार नाही. पण आपण त्यांचे व्हिडियोज बघा. त्यात त्यांचा डान्स चालू असताना वर उल्लेख केलेली डान्स स्टेप दिसून येऊ शकते. तसेच दुसरी डान्स स्टेप म्हणजे हातांचा काटकोन करत पंजा डोक्याला लावत बायसेप्स उडवणे. ही स्टेप ही बघताना मजा येते. या त्यांच्या डान्स स्टेप्स सोबतच आपल्याला आनंद मिळतो तो त्यांच्या सकारात्मक ऊर्जेने. त्यांचे व्हिडियोज बघताना असा एकही क्षण जात नाही जिथे आपण कंटाळू वगैरे. त्यांच्या परफॉर्मन्स मधील प्रत्येक स्टेप, प्रत्येक बिट ही उत्साहाने भरलेली असते. बरं एकाच जागेवर उभं राहून नाचतात अस नाही. जेवढी जागा त्यांना डान्स करण्यासाठी उपलब्ध असेल त्या सगळ्या जागेचा वापर ते करतात. अगदी आनंदाने संपूर्ण वेळ वावरतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक परफॉर्मन्स हा आपल्याला ही आनंद देऊन जातो. आपल्या टीमचा तर हा अनुभव आला आहेच.

आपणही त्यांचे परफॉर्मन्स बघितले असतील तर आपल्याला ही हे जाणवलं असेल. पण आपण त्यांचे परफॉर्मन्स बघितले नसतील तर जरूर बघा. आपल्याला ते परफॉर्मन्स खुप आवडतील आणि पसंत पडतील हे नक्की. आपली टीम नेहमीच होतकरू आणि ऊर्जेने परिपूर्ण कलाकारांविषयी लिहित असते. त्याचाच एक भाग म्हणजे हा लेख होय.

तर मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *