Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंनी पार्टीमध्ये सर्वांसमोर वेगळ्याच शैलीत केला अतरंगी डान्स, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

ह्या भाऊंनी पार्टीमध्ये सर्वांसमोर वेगळ्याच शैलीत केला अतरंगी डान्स, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

हल्ली कोणताही समारंभ म्हंटला की दोन गोष्टी जणू अतिशय महत्त्वाच्या झाल्या आहेत. एक म्हणजे डीजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डान्स फ्लोअर. या दोन गोष्टी असल्या की जमलेली मित्रमंडळी एकदम खुश असतात. त्यांच्यात जर एखादा अतरंगी असेल आणि तो ही डान्स करणारा असेल तर मग काय बघायलाच नको. जी धमाल येते ती काही विचारता सोय नाही. हे डान्सर मित्र सहसा सगळ्यांच्या वाट्याचा डान्स करणारे असतात आणि एकदम मस्ती करणारे असतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल. म्हणून मग हा लेखप्रपंच मांडला आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो काही काळापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या प्रसंगी लग्न होतं की कोणता समारंभ माहीत नाही. पण डीजे आणि डान्स फ्लोअर होते. अतरंगी डान्सर मित्रांना अजून काय पाहिजे. त्यामुळे दोन मित्रांनी या व्हिडियोत जो डान्स केला आहे त्यामुळे हा व्हिडियो वायरल झाला आहे. केवळ चारच महिन्यात जवळपास १३ लाख लोकांनी हा व्हिडियो पाहिला असल्याचं कळून येतं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा वर उल्लेख केलेले दोन मित्र दिसून येतात. एक असतो टीशर्ट मध्ये आणि दुसरा असतो काळ्या शर्ट मध्ये. हे सांगण्याचं कारण यातील काळ्या शर्ट मधील मित्र असा काही नाचतो की या संपूर्ण व्हिडियोभर तोच दिसत राहतो. गाणंही अगदी उडत्या चालीच असल्याने त्याचा डान्सही तसाच उडता असतो. हे गाणं असतं ‘करण अर्जुन’ चित्रपटातलं ‘गुपचूप गुपचूप’. यावर हे दोन्ही मित्र डान्स करू लागतात.

सुरुवातीला तर शब्द आणि म्युझिकवर त्यांची धमाल चालते. त्यातही ‘गुपचूप गुपचूप’ शब्दांवर काळ्या शर्टवाल्या मित्राने खांदे उडवत केलेली स्टेप लक्षात राहते. पुढे पूर्ण डान्सभर ही स्टेप या शब्दांवर पुन्हा पुन्हा होताना दिसते. गाण्यातील बाकीच्या शब्दांवर ही स्टेप्स केल्याचं जातात. त्यातही ‘पडते ही बिस्तर पे सो गयी’ या वाक्यावर तर हा मित्र सपशेल लोटांगणच घालतो. त्याने हे गाणं अगदीच मनावर घेतल्यासारखं वाटतं. आजूबाजूची बरीच मंडळी त्याचा हा डान्स पसंत करत असतात. कारण गाणं संपता संपता एक दादा येऊन त्याच्यावरून पैसे ओवाळून टाकतात. पण सगळ्यांत गंमतीचा भाग इथे बघायला मिळतो. डान्स कोण करत असतो तर काळ्या शर्टवाला मित्र. बरोबर. म्हणजे त्याला पैसे मिळायला हवेत. पण कसलं काय. एक फुटकी कवडी त्याच्या नशिबात आली नसावी. कारण त्याच्या आजूबाजूला उभे असलेले आतापर्यंत त्याला प्रोत्साहन देत असतात. पण जसे ते दादा पैसे टाकायला लागतात तसे सगळे पैसे पकडायला धावतात. एक तर पूर्ण हातच मारून घेतो. इथे हा मित्र मात्र डान्स करण्यात इतका व्यस्त असतो की तो यांकडे दुर्लक्ष करतो.

एक मात्र खरं की तोच भाव खाऊन जातो. यावेळी खरं तर त्याचा दूसरा मित्रही भाव खाऊन गेला असता. पण त्याला एक फोन येतो आणि त्याच्याकडुन डान्सही जास्त प्रमाणात होत नाही. पण तो जेव्हा नाचतो तेव्हा अगदी मनापासून नाचतो. तसेच त्याच्या मित्राचा डान्सचा अगदी मनापासून आनंद तो घेतो. या व्हिडियोचं वैशिष्ट्य अस की यात पूर्ण गाणं ऐकायला मिळतं आणि त्यावरचा डान्स ही बघायला मिळतो. अन्यथा अशा व्हिडियोज मध्ये चार गाणी, पाच मिनिटांत बघण्याची आपल्याला सवय झालेली असल्याने हे वेगळं वाटतं. असो. तर मंडळी हा होता आजचा लेख.

आपल्याला आमच्या टीमचा हा लेख आवडला असेल अशी आमची अपेक्षा आहे. आपल्या वाचकांसाठी सदैव काहीतरी नवीन आणि वेगळं असं भेटीस घेऊन येण्याकडे आमच्या टीमचा कल असतो. त्यातूनच उत्तम असे लेख लिहिले जातात आणि यापुढेही लिहिले जातील. पण हे तुमच्या सहभागाशिवाय अशक्य आहे. तेव्हा आपलं प्रोत्साहन आम्हाला सदैव मिळत राहू दे. लवकरच नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले पण आपण न वाचलेले लेख आवर्जून वाचा. त्यांचा आनंद घ्या, हे लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *