Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंनी भर पार्टीमध्ये केलेला बगळा डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या भाऊंनी भर पार्टीमध्ये केलेला बगळा डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

भारतात प्रत्येक जेव्हा एखादा हिरो फेमस होतो तेव्हा त्याच्या लोकप्रिय होण्यामागे त्याचा डान्सही तेवढाच कारणीभुत असतो, अशी आताची परिस्थिती आहे. म्हणजे रणबीर कपूर, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, वरून धवन, कार्तिक आर्यन या सगळ्यांना चांगलं नाचता येतं. जुन्या काळी हिरोला नाचता नाही आलं तरी चालायचं. आता मात्र सिक्स पॅक आणि डान्स यायलाच हवा.

जुन्या काळी सनी देओलने पाय आपटले तरीही लोक त्याच्यावर खुश व्हायचे, अमिताभने थोडे कमरेत वाकून एक हात पुढे करून थोडे अंग हलवले तरी पोरी खुश व्हायच्या. दरम्यानच्या काळात गोविंदा, मिथुन चक्रवर्ती अशा मोजक्या हिरोंनी स्वतःची वेगळी अशी डान्स स्टाईल शोधत हवा केली. शेवटी झालं काय तर डान्समध्ये ज्यांच्या वेगळेपणा होता, ते टिकले. असाच वेगळ्या प्रकारचे डान्स असणाऱ्या कलाकारांचे व्हिडीओ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत असतात.

 

सोशल मीडिया म्हणजे आता पुरेपूर मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म झालेला आहे. सोशल मीडियावर कित्येक एंटरटेनमेंटवाले व्हिडीओ व्हायरल रोजच होत असतात. त्यात काही कॉमेडी असतात तर काही डान्सचे असतात. तर काही एकदम ध’क्कादायक आणि गंभीरपणे विचार करायला लावणारेही असतात. पण त्यातल्या त्यात मनोरंजन करणारे व्हिडीओ जास्तच व्हायरल होतात. काही व्हिडीओ हे माणसांच्या करामतीचेही असतात. आमच्या हाती आता एका तरुण डान्सरचा व्हिडीओ लागलेला आहे. सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ तर एका अशा तरुणाचा आहे, ज्याची मान एखाद्या बगळ्यापेक्षा जास्त वेगाने आणि कोनात फिरते. त्याच्या या डान्सपेक्षा जास्त कौतुक लोकांनी त्याच्या मानेचे केले आहे. त्याने एकदम बिनधास्त होऊन डान्स केला आणि त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एकाने शूटिंग करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. बघता बघता हा व्हिडीओ लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला. आता या व्हिडीओत तरुणाने फार वेगळं काही केलं नाही. फक्त वाजणाऱ्या गाण्यावर त्याला आवडतो तसा, जमेल तसा मनसोक्तपणे धुंद होऊन त्याने डान्स केला.

आपला डान्स एखाद्याला विचित्र वाटू शकतो, असा डान्स केल्यावर लोक आपल्याला हसू शकतात, असा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. आणि याच कारणामुळे त्याच्या या अनोख्या डान्सला लोकांनी भरपूर पसंती दिलेली आहे. आम्ही कायमच म्हणत असतो की, जगात नाचणाऱ्या लोकांची कमी नाही. नाचणाऱ्या लोकांमध्ये 2 प्रकार पडतात. एक लोकांसाठी नाचणारे, टाळ्या मिळवण्यासाठी नाचणारे आणि दुसरे म्हणजे स्वतःसाठी नाचणारे, ज्यांना लोकांचं अजिबात घेणंदेणं नसतं. अनोख्या पध्दतीने नाचून सगळ्यांचे मनोरंजन करणाऱ्या या तरुणाने केले आहे.

विशेष बाब म्हणजे नाचताना हा तरुण कुठेच ऑफबिट झालेला नाही. मनमोकळं आणि बेधुंद होऊन नाचणं, नेमकं काय असतं, हे या व्हिडीओतुन कळतं. उगाचच आव आणत नाचल्यावर लोकांना कळतं. म्हणूनच मोकळं आणि बिनधास्त नाचणं कधीही भारीच… आपल्यालाही छान वाटतं आणि लोकांनाही बघावंसं वाटतं. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *