Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंनी भर रस्त्यात केला अतरंगी डान्स, असा डान्स तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल

ह्या भाऊंनी भर रस्त्यात केला अतरंगी डान्स, असा डान्स तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल

सोशल मीडियावर, इंटरनेटवर दररोज ढिगाने व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही मोजके व्हिडीओ तर मोठ्या आवडीने पाहिले जातात. पुढे जाऊन हेच भन्नाट व्हायरल झालेले व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अगदी म्हाताऱ्या माणसापासून तर लहान पोरापर्यंत अनेकांचे व्हिडीओ खूप पाहिले जातात. पण विशेषतः पाहिले जातात ते व्हिडीओ एकतर कॉमेडी असतात किंवा डान्सचे असतात. पण कॉमेडी डान्सचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेत का? नसतील तर आज बघाल. आज आम्ही एक असा व्हिडीओ आणला आहे ज्यात डान्स पण आहे आणि कॉमेडी पण.

सर्वसाधारणपणे लोक देशी घेतल्यावर विचित्र नाचतात. लग्न, हळद अशा कार्यक्रमात तर विचित्रपणे नाचल्याशिवाय अनेकांना मजा येत नाही. पण आजच्या या व्हिडीओत ना या नाचणाऱ्या भाऊने देशीची नशा केली आहे. ना तो लग्नाच्या वरातीत नाचत आहे. हा भाऊ एकदम अतरंगी पद्धतीने नाचत आहे. तो चक्क एका अशा ठिकाणी नाचत आहेत, जिथे निवडणूक झाली आहे.

निवडणूक जिंकला वेगळाच माणूस… त्याचे कार्यकर्ते राहिले बाजूला… पण त्यांचा आधी याचाच आनंद गगनात मावेना… म्हणून हा नाचून मोकळा झाला. पुढचा किस्सा तर यापेक्षा भारिय… कुणीही निवडून आलं असतं तरी या भावाने डान्स करणार, हे पक्कं ठरवलेलं होतं. निवडणूका झाल्या की गुलाल उधळणे वगैरे न करता थेट वाजंत्री बोलवून या भावाने रस्त्यावरच आपल्या स्टाईलने डान्स सुरू केला. या भावाच्या असाच अफलातून डान्स स्टाईलमुळे यापूर्वी पण त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

जी जी लोकं आयुष्यात मनमोकळं वागतात, तेच त्यांच्या नाचण्यात येतं. म्हणजे तुम्ही एक निरीक्षण करा. जी लोकं खतरुड असतात, ती अकडूसारखी नाचतात. जी लोकं बिनधास्त मनमोकळं असतात ती मनसोक्तपणे नाचतात. असाच या भावाने निवडणूक झाल्यावर डान्स केला आहे. याचा डान्स बघून भले भले बाजूला झाले. न जाणो याच्या नाचण्याच्या नादात कुणाला कंबरेत लाथ बसायची. कारण या भावाने असला खतरनाक डान्स केलाय की बघणाऱ्यांची बघताना पापणी सुद्धा लावणार नाही.

यापूर्वी पण तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल पण तुमच्या जीवनामध्ये आनंदी आणि उत्साही वाटेल असा हा मस्त डान्स या भावाने केला आहे. आणि याची एनर्जी, उत्स्फूर्तपणा पाहून आपल्याला पण स्फूर्ती यावी, यासाठी हा व्हिडीओ आम्ही तुमच्यासमोर आणायचे ठरवले. मनातील सर्व विचार, टेन्शन विसरून लोक तिच्याकडे आनंदाने पाहत आहेत. हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुमच्याही मनाची मरगळ घालवा.

हटके स्टाईल डान्स करणाऱ्या या भावाचा डान्स बघून तुम्हालाही भारीच वाटणार शेठ… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *