Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंनी शो मध्ये पुढे बसून गोंधळ घालणाऱ्या मुलांचा घेतलेला क्लास पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या भाऊंनी शो मध्ये पुढे बसून गोंधळ घालणाऱ्या मुलांचा घेतलेला क्लास पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक समान कार्यक्षेत्र कोणतं असेल तर ते कलाक्षेत्र आहे. कारण मनोरंजनाच्या निमित्ताने का होईना पण या कलाक्षेत्राचा आणि आपला सहसंबंध येत असतो. अर्थात यातील गायन आणि नृत्य या कलांचा आपल्याशी सगळ्यात जास्त संबंध येताना आपण अनुभवतो. पण अजून एक कला अशी असते जी या कलांसोबत येते पण तिच्याविषयी आपण फारसं बोलताना दिसत नाही. ही कला म्हणजे निवेदन कला होय. कोणताही कार्यक्रम असो, निवेदक वा निवेदिका असल्याशिवाय कार्यक्रम पुढे सरकू शकत नाही वा त्यास गंमत अशी येत नाही.

अर्थात केवळ गंमत यावी म्हणून निवेदक काम करत नसतात. त्यांचं प्रथमकर्तव्य हे प्रेक्षक आणि कार्यक्रम यांच्यातील दुवा होणे हा असतो. हे काम करत असताना प्रेक्षकांचा वेळ आनंदात आणि समाधानकारक पणे व्यतीत व्हावा हे ही निवेदक वा निवेदिका बघत असतात. त्यामुळे अतिशय सोप्पं वाटत असलं तरी हे काम अतिशय नाजूक, नेटकेपणाने करण्याचं असतं. तसेच आपला बोलकेपणा हा वायफळ बडबड वाटता कामा नये याकडे ही लक्ष देणे आवश्यक असते.

एकूणच काय तर तारेवरची कसरत म्हणजे निवेदनाचं काम होय. पण काही जण मात्र लीलया वाटावं याप्रमाणे अतिशय सहजपणे हे काम करून जातात. आपण प्रेक्षक ही त्यांना त्यांच्या या गुणांमुळे पसंत करत असतो. याच यादीतील एक दमदार नाव म्हणजे क्रांती नाना मळेगांवकर. क्रांती साहेब हे त्यांच्या विविध स्टेज शोज साठी प्रसिद्ध आहेत. त्यातील अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर ! असंख्य अशा गावात, जिल्ह्यात, शहरांत त्यांनी या आणि अन्य कार्यक्रमांचे सादरीकरण केलेलं आहे. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम म्हणजे हास्यकल्लोळ ठरलेला. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर या कार्यक्रमाला आलेला माणूस पुढचे कित्येक दिवस या कार्यक्रमातले विनोद आठवून आठवून हसत असतो. त्यांचे अनेक वायरल व्हिडियोज ही प्रसिद्ध आहेतच. ज्यांनी ज्यांनी हे व्हिडियोज पाहिले असतील ते ही याची ग्वाही देतीलच. आपल्या टीमने ही नुकताच त्यांच्या एका कार्यक्रमाचा वायरल व्हिडियो बघितला. यात त्यांनी प्रेक्षकांमधील दोन मुलांना समोर उभं करून प्रश्नोत्तरे केलेली होती. त्यातला एक मुलगा होता चौथीत तर दुसरा होता दुसरीत. दोन वर्षांचा फरक असला तरी बाकीचे बरेच गुण जुळत होते. जसे की क्रांती सरांनी दोघांना ABCD म्हणायला सांगितली. दोघेही L,M, N या अक्षरांभोवती घोटाळले.

तरी एकाने मात्र पूर्णपणे ही इंग्रजी बाराखडी म्हणून दाखवली. क्रांती सरांनी ही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि बाकीच्यांनीही तसं करावं यासाठी प्रोत्साहन दिलं. कोणत्याही निवेदकाला या बाबतीत हुशार असावं लागतं. जिथे जिथे चांगलं काम होत असेल तिथे कौतुक केलं पाहिजेच. क्रांती सर ही तेच करताना दिसतात. अर्थात नंतर हेच पोरगं जेव्हा अतरंगी उत्तरं देतं तेव्हा त्याची मस्करी करायची संधीही सोडत नाहीत. त्यामुळे केवळ एकप्रकारे समतोल साधला जातो. तसेच दोघांना अभ्यासाचे प्रश्न आणि गाण्यांचे शब्द विचारून ते संवाद चुरचुरीत बनवतात. सोबतच एक कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांचं चौफेर लक्ष असतं आणि कुठेही बेशिस्त होणार नाही याकडे ही ते लक्ष देऊन असतात. कधी रागे भरून तर कधी प्रेमाने सगळं वातावरण ताब्यात ठेवत कार्यक्रम उत्तम चालेल हे पाहत असतात. यावरून त्यांच्याकडे उत्तम निवेदकाकडे असलेला अजून एक गुण दिसून येतो. हा गुण म्हणजे ‘प्रसंगावधान’ राखणे. तसेच हे सगळं सांभाळत असताना तेथिल आमदार साहेबांच्या एका हेल्पलाईन विषयी सुद्धा माहिती द्यायला सुद्धा ते विसरत नाहीत. त्यामुळे केवळ गंमत जंमत असा हा कार्यक्रम न राहता त्याला एक गंभीर अस परिमाण ही मिळतं.

एकूणच आपण गोळाबेरीज केली तर अस लक्षात येत की क्रांतीजी हे त्यांच्या खुसखुशीत विनोदाने आपल्याला हसवत असले तरी त्यासोबतच अनेक गोष्टी ते हाताळत असतात. त्यासाठी लागणारं व्यवहार चातुर्य त्यांच्याकडे आहे आणि जे पदोपदी जाणवत राहतं. त्यामुळे गुणग्राहक असे आपले वाचक जेव्हा क्रांतिजींचे व्हिडियोज पाहतील तेव्हा त्यांच्या विनोदाला दाद देतीलच आणि सोबतच त्यांच्या या चातुर्याला सुद्धा दाद देतील हे नक्की. वर उल्लेख केलेला व्हिडियो आपल्याला बघायला मिळाल्यास नक्की पहा. दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो आजतागायत जवळपास २२ लाख लोकांनी पाहिला आहे. आपण जर त्यांच्यापैकी असाल तर एव्हाना आपण या व्हिडियोची मजा घेतली असेलच. जर का नसेल पाहिला, तर जरूर पहा आणि आनंद लुटा.

तसेच मंडळी, आपली टीम आपल्या वाचकांना आवडेल असे लेख नेहमी आपल्या भेटीस आणत असते. आपणही आमच्या टीमला नेहमीच प्रोत्साहन देत असता आणि यापुढेही देत राहाल हा विश्वास आहे. आम्हीही उत्तमोत्तम लेखांतून आपल्या पर्यंत विविध विषय पोहोचवत राहूच याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपण आपल्या टीमचे न वाचलेले अन्य लेख जरूर वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *