अमुक अमुक हाडामांसाचा कलाकार आहे, असे शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकले असतील. मात्र हे शब्दप्रयोग फक्त मोठमोठ्या कलाकारांसाठी केले जातात. जे आधीच मोठे आहेत त्यांना अजून मोठं करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी अशी भली थोरली वाक्य बोलली जातात. मात्र आजही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्यात जगावेगळी कला आहे, जी फारशी लोकांसमोर येऊ शकली नाही. फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे हे कलाकार लोक समोर आले आणि लोकांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले. खरा कलाकार जो असतो ना तो अगदी म्हातारा होइपर्यंत कला जपतो. काही लोक तर असेही आहेत, ज्यांनी आयुष्यभर नोकरी केलेली असते मात्र रिटायर झाल्यावर ते आपल्यात असलेल्या कलेचा सदुपयोग करतात. काही काही कला तर इतक्या जबरदस्त असतात की, त्याशिवाय ते दुसरं कुणीच करू शकत नाहीत. अशा कला करणारे अनेक कलाकार आपल्याला गावोगावी हिंडून प्रपंच चालवताना दिसतील. डोंबाऱ्याची लहान लहान लेकरं पोटासाठी आगीतून, उंचावरून उड्या मारताना दिसतील आणि कला संपली की रुपया रुपया गोळा करताना दिसतील.
खरं तर कुठलाही कलाकार कधीच आपली कला लपवू शकत नाही, आणि कोणत्याच कलाकाराची आतली कला मा’रली जात नाही. फक्त काही लोकांना त्यावर अवलंबून राहावं लागतं एवढाच काय तो फरक… जसं प्रॅक्टिस केल्यावर माणूस जास्त परफेक्ट होत जातो, तसंच कितीही दशकं झाली तरी कला, सृजनशीलता उलट अधिक प्रभावी होत जाते. असाच एक अफलातून असणारा कलाकाराचा व्हिडीओ आमच्यासमोर आला. काही वर्षांपूर्वी हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला होता. आता तो पुन्हा नव्याने पसरत आहे.
ह्या व्हिडीओत असणारी कला कॉमन नाही. गायन, वादन, नृत्य, वक्तृत्व अशी कला किंवा कुठल्याही प्रकारच्या उड्या अथवा क्रीडा प्रकार या व्हिडीओत असणाऱ्या कलाकाराने केलेला नाही. मग या कलाकाराने नेमकं काय केलं आहे, याचा विचार तुम्हाला पडला असेल. एखाद्या सायकलच्या रिमचा तुम्ही काय उपयोग करू शकता? फार फार तर लहान मुलांना खेळायला देऊ शकता. मात्र यापलीकडे खूप वेगळा विचार करून या कलाकाराने शक्कल लढवली.
एखादा फुटबॉल खेळाडू मॅच जिंकल्यावर फुटबॉल फिरवून बोटावर धरतो किंवा डोक्यावर ठेवतो तरीही फुटबॉल फिरत राहतो, असे अनेक खेळाडूंचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र आज आम्ही जो व्हिडीओ दाखवणार आहोत, ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण या कलाकाराने चक्क सायकलची रिम फिरवून डोक्यावर ठेवली तरीही रिम फिरत राहिली… तोवर दुसरी रिम घेतली ती कंबरेवर धरली… तीही फिरत राहिली. कुठलाही आधार न देता असली अजब कला दाखवणारे कलाकार आजकाल पाहायला तरी कुठे मिळतात. या पठ्ठ्याची कला बघून आम्ही चाट पडलो भाऊ… या व्हिडीओत जे दिसेल ते खऱ्या अर्थाने भारताचं टॅलेंट आहे. इंडिया गॉट टॅलेंटमध्ये इंडियाचं टॅलेंट दिसतं. या व्हिडीओत मात्र अस्सल भारताचं रिअल टॅलेंट दिसतं.
तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच या कलाकाराचे फॅन व्हाल, असा आम्हाला विश्वास आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :