Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंनी सर्वांसमोर जी गोष्ट केली ती तुम्ही ह्याअगोदर कधी पाहिली नसेल, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाहीत

ह्या भाऊंनी सर्वांसमोर जी गोष्ट केली ती तुम्ही ह्याअगोदर कधी पाहिली नसेल, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाहीत

लोक कधी आणि कशामुळे फेमस होतील, याचा काही आता नेम राहिलेला नाही. हसण्यावरून, रडण्यावरून, झोपेवरून, ओरडण्यावरून अगदी अगदी कशावरून कोण फेमस होईल, हे सांगणं आजच्या सोशल मीडियाच्या काळात कठीण होऊन बसल आहे. अगदी खाण्या-पिण्याच्या सवयीचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात आणि लोकसुद्धा ते आनंदाने बघतात. सध्या फूड ब्लॉगर्सची चलती आहे. अनेक फूड ब्लॉगर्स वेगवेगळ्या स्पॉटवर नवनवीन हॉटेलवाले, टपरीवाले शोधत असतात आणि त्यांच्या स्पेशालिटी विषयी लोकांना सांगत असतात. मात्र अनेकदा असे होते की, ही ठिकाणी जेवण तर चांगले मिळतेच मात्र त्यासोबत तिथे मनोरंजन सुद्धा चांगले होते, अशा ठिकाणी लोक जातात.

जसे की, अहमदनगर जिल्ह्यातील समनापूरचे अन्सार चाचा, जे वडापाव विकतात पण ते विकण्याची त्यांची एक हटके स्टाईल आहे. नाशिकचा झटका पाणीपुरीवाला पण वेगळी टेस्ट देतो पण त्याची भाषा भारी आहे. तर नागपूरचा चायवाला पण आपल्या भन्नाट आणि वेगळ्या स्टाईलमुळे जबराट फेमस झाला होता. तसेच मध्यंतरी एक चहा विकणारे आजोबा पण असेच फेमस झालेले. कोलकत्त्यामधील ५६ वर्षीय चहावाले किशोर कुमारांचं गाणं गात चहा विकतात. किशोर कुमारांची गाणी गात चहा विकणारा चहावाला म्हणून ते ओळखले जातात.

असे अनेक लोक आपापल्या अंगी असलेल्या कला गुणांनी प्रसिद्ध झाले. एवढेच नाहीतर त्यांनी या गोष्टींच्या जीवावर आपला व्यवसाय पण वाढवला. असे लोक दिवसेंदिवस वाढत आहेत. बर असे अनेक कलाकार लोक जगाच्या पाठीवर सगळीकडे आहेत फक्त काही फेमस होतात, व्हायरल होतात तर काही होत नाहीत. अशाच एका भन्नाट कलाकाराचा व्हिडीओ आमच्यासमोर आला आहे. जो एकदम मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये शेफ आहे आणि तिथेही तो आपली कला लोकांना दाखवत आहे, त्यांचे मनोरंजन करत आहे. खास त्याला पाहण्यासाठी आणि त्याची कला पाहण्यासाठी या हॉटेलमध्ये गर्दी होत नसेल तर नवलच की…

तुम्ही आजवर अनेक फुटबॉल खेळाडू असे बघितले असतील, जे एका बोटावर फुटबॉल फिरवतात. बोटावरून डोक्यावर नेतात, डोक्यावर खांद्यावर नेतात आणि असे एकेक करून सगळ्या अवयवांवर फुटबॉल फिरवतात. हे करण्यासाठीही कला, मेहनत आणि आत्मविश्वास लागतो. हे एवढं सोपं असतं तर कुठलाही फुटबॉलपटू हे करू शकला असता. मात्र आजच्या व्हिडीओत दिसणारा शेफ हा यापेक्षाही जबराट कलाकार आहे. त्याने सुरुवातीला पीठ मळलं आणि त्याची लाटून छोटी चपाती बनवली. आणि मग त्याने हातावर फिरवत फिरवत ती चपाती मोठी केली आणि लोकांनी भरभरून टाळ्या वाजवल्या.

आता तुम्हाला वाटेल की, हातावर फिरवून फिरवून चपाती बनवणं, हे कौतुकास्पद असले तरी ती काही मोठी गोष्ट नाही. मात्र त्याने फक्त चपाती बनवली नाही तर ती चपाती बनवताना लोकांचं एक शब्द पण न बोलता इतकं मोठं मनोरंजन केलं की, जे लोकांना हजारो रुपये घालून पण बघायला भेटलं नसतं. फक्त याची कलाकारी बघण्यासाठी त्या हॉटेलमध्ये येणारे अनेक ग्राहक आहेत.

रोज सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओविषयी लिहीत असताना पण आम्ही ठामपणे म्हणू शकतो की, याच्याइतका महान कलाकार आजवर आम्ही बघितलेला नाही.. एवढंच काय तर कुठलाही माणूस जेव्हा जा व्हिडीओ बघायला सुरू करेल तेव्हा तो व्हिडीओ संपेपर्यंत बघतच राहील. हातावरून, खांद्यावर, मग पुन्हा पायाखालुन डोक्यावर असं करत करत त्याने ती चपाती बनवली आहे. नेमकी कशी बनवली आणि त्याची कलाकारी कशी आहे, हे तुम्हीही आवडीने जाणून घ्या. या कलाकाराच्या कॉन्फिडन्सला आपला तर सलाम बॉस… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.