Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊंनी स्टेजवर दोन तरुणींसोबत केला अप्रतीम डान्स, शेवट पाहुन मात्र हसु आवरणार नाही

ह्या भाऊंनी स्टेजवर दोन तरुणींसोबत केला अप्रतीम डान्स, शेवट पाहुन मात्र हसु आवरणार नाही

तमाशा म्हटलं की लावणी आली, लावणी म्हटलं की एकदम नादखुळा नाचणारी ललना आली आणि दिलखेचक अदांनी घायाळ करणारी ललना आली म्हणजे तिथं स्वतःहुन घायाळ व्हायला तयार असणारं पब्लिक पण आलं. लागला का बाण, असा प्रश्न जोपर्यंत तमाशाच्या फडात विचारला जात नाही तोपर्यंत तमाम रसिक मंडळींना तमाशा झाल्यासारखं वाटत नाही. तमाशात लावणीनंतर जर काही लोकांना आवडत असेल तर ते म्हणजे तमाशात होणारे विनोद. मग ते कशाही स्वरूपात असोत. लोकांना तमाशातली कॉमेडी लै आवडत असते. आता तुम्हाला एक असा प्रसंग सांगतो, जो प्रत्येक गावच्या जत्रेतील तमाशात होतोच होतो. तसं पाहिलं तर लावणी हा एकमेव असा लोककलेचा प्रकार आहे जो लहान पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडतो, भावतो.

गावाकडे तुम्ही तमाशा बघितला असेल तर एक प्रसंग सगळीकडे घडत असतो तो म्हणजे, वरती स्टेजवर एकदम झक्कड पक्कड लावणी चाललेली असते, सगळे रंगात आलेले असतात, सगळा माहोल नाचणाऱ्या पोरींनी बनवलेला असतो आणि अशातच एकदा रंगेल बे’वडा गावकरी उठतो आणि स्टेजकडे धाव घेतो आणि स्टेजवर जाऊन नाचायला सुरुवात करतो. आणि मग पुढे एकदम धमाल उडते. गावचे सरपंच नाहीतर तमाशा फडाचा मालक त्याला फटके देऊन खाली काढून देतो. तो पुन्हा स्टेजवर चढतो आणि पोरींसोबत नाचू लागतो. आता अशा बे’वड्या पंटरला त्या पोरींना छेडायचं नसतं किंवा गोंधळ पण घालायचा नसतो. फक्त स्टेजवर जाऊन आपली हवा करायची असते. स्वतः नाचून आपल्याच 4 बे’वड्या मित्रांमध्ये वाह वाह करून घ्यायची असते. त्यासोबतच गावातल्या लोकांचे मनोरंजन होते ते वेगळेच. असो, एक भयंकर मनोरंजन करणारा आणि खूप व्हायरल झालेला एक व्हिडिओ आमच्या हाती लागला.

या व्हायरल व्हिडीओत तमाशा बोले तो लावणी चालू आहे. आणि अचानक प्रेक्षकांत बसलेला एक जास्त उत्साही रसिक स्टेजवर जातो आणि पोरींच्या सोबतीने नाचू लागतो. त्यावेळी योगायोगाने गाणं पण एकदम भारी लागलेलं असत. पोरी जरा जपून दांडा धर हे गाणं लागल्यावर हे स्टेजवर भाऊ पेटून उठले. कम्बर हलवून एकदम कातिल एक्सप्रेशन्स देऊन डान्स करू लागले. भाऊंचा डान्स स्टेप्स पाहून तर पब्लिकसुद्धा शिट्या आणि टाळ्या वाजवू लागली. आता लोक पोरींना कमी या भाऊला जास्त चिअर अप करायला लागले. पण शेवटी मात्र एक वेगळाच किस्सा घडला. या भाऊने स्वतःची अशी काही फजिती करून घेतली की ती सगळ्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील.

आता या भाऊला सरपंचाने फ’टके देऊन खाली हाकलला की तमाशा फडाच्या मालकाने झोपडवला… नेमकी फजिती कशी झाली हे समजून घेण्यासाठी व्हिडीओ तर बघावाच लागणार ना शेठ… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *