रस्ता क्रॉस करणे, काही खायचे काम नाही. ही एकदम अवघड अशी आणि थोडी हुकाचूक झाल्यास थेट जीवाशी पंगा घेणारी प्रक्रिया आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील लोक आणि विशेषतः वयोवृद्ध लोक शहरात आले की त्यांचे अनेक छोटे छोटे प्रॉब्लेम सुरू होतात. मग ते रस्ता क्रॉस करण्यापासून तर कुठल्या रस्ता चालायचा, कुठून चालायचं नाही. पण काही यंगराट लोकं यावरही सोल्यूशन काढतात. फक्त ते त्यांच्या त्यांच्या अतरंगी पद्धतीने असतं. सोशल मीडियावर(Social Media) नेहमीच असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात. त्यापैकी काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. काही आश्चर्य वाटावे असे असतात. तर काही इतके विचित्र असतात की हसू आल्याशिवाय राहात नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात व्हिडिओ पाहताच आपल्याला हसू येते. हा व्हिडिओ एका रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसाचा आहे. आणि त्याने जी आयडिया वापरून रस्ता क्रॉस केला आहे ते पाहून तुम्हींही म्हणाल… भावा हे टॅलेंट देशाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे.
आता या व्हिडीओत दिसणाऱ्या एका भावाला रस्ता क्रॉस करायचा आहे. त्या भागात सिग्नल नाहीये. किंवा असला तरी बंद असेल त्यामुळे या भावाला रस्ता तातडीने क्रॉस करायचा आहे. पण लागोपाठ वाहने आणि वाहनांचा स्पीड यामुळे ते शक्य होत नाहीये. आता हा भाऊ म्हणजे एकदम जबराट डोकेलिटी असणारा माणूस. याला रस्ता क्रॉस करण्यासाठी एक खतरनाक आयडिया सुचली. आणि त्याने ती अंमलात आणायचे ठरवले.
शेवटी गाड्या थांबत नाहीयेत, हे पाहून त्याने आपली आयडिया लागू केली. हा भाऊ थेट पायावर बसला. गुडघे खाली टेकवले. आणि आता तो चार पायावर अपं’ग असल्या सारखा चालू लागला. अचानक रस्ता क्रॉस करण्यासाठी एका गाडीला तो आडवा झाला. अपं’ग रस्ता ओलांडतो आहे हे पाहून गाडीवाला सुद्धा दिलदार झाला आणि त्याने गाडीतून खाली उतरून मागच्या गाड्या थांबवल्या जेणेकरून या अपं’ग व्यक्तीला सहजपणे रस्ता ओलांडता यावा.
आता खरा किस्सा तर यापुढेच आहे. रस्ता क्रॉस केल्यावर किमान थांबलेल्या लोकांना तरी जाऊ द्यायचे ना? तर हा भाऊ लगेच उठला आणि चालू लागला हे बघताच तो गाडीवाला त्याला हाणायला मागे पळाला. आता पुढे डोकेलिटी असणाऱ्या या भावाचं काय झालं असेल? हे कल्पना न केलेली बरी. आता मजा म्हणून हा व्हिडीओ भारी आहे पण या आयडियाचे काही तोटेही आहेत. जेव्हा एखादा खराखुरा अपं’ग व्यक्ती रस्ता क्रॉस करत असेल तेव्हा लोक त्याला मदत करणार नाहीत. कारण याआधी काही लोकांनी अपं’ग असल्याचा गैरसमज करून फायदा उचलला असेल.
हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अजून नेमकी माहिती मिळू शकली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या वेगाने व्हायरल होतो आहे. व्हिडिओ पाहून काही यूजर्सनी हसू आणणाऱ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :