Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शाळेतल्या मुलाने सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, स्टेप्स तर खूपच भारी केल्या आहेत… बघा व्हिडीओ

ह्या शाळेतल्या मुलाने सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, स्टेप्स तर खूपच भारी केल्या आहेत… बघा व्हिडीओ

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राणी तर कधी पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तर कधी छोट्या आणि गोड मुलांच्या व्हिडीओमुळे समाजमाध्यमावरील वातावरण गमर असतं. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदी खास आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल. कारण विषय मनसोक्तपणे जगण्याचा आहे…

सध्या सोशल मीडियावर झळकणाऱ्या टॅलेंटची कमी नाही. सोशल मीडियामुळे हे टॅलेंज जगासमोर येत आहे. याच सोशल मीडियावर कधी कोण फेमस होईल सांगता येत नाही. दररोज काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, ट्रेंडिंगमध्ये येतात. आधी टिकटॉक, मग आता इन्स्टा रिल्सवर अनेकजण शॉर्ट व्हिडीओ करत आहेत. त्यातील काहींचे व्हिडीओ जाणीवपूर्वक केले जात आहेत आणि त्यानंतर ते सोशल मीडियावर टाकले जात आहेत. एखाद्या व्हिडीओत थोडेसे वेगळेपण दिसले तरीही तो व्हिडीओ आपोआप व्हायरल होतो. असाच एका अतरंगी मुलाचा व्हिडीओ आमच्यासमोर आला आहे. हा मुलगा जगावेगळा काही करत नाही… या मुलाने फक्त डान्स केला आहे तोही त्याच्या पध्दतीने… मात्र तरीही या छोट्या मुलाच्या व्हिडीओला लाखो विव्हज मिळाले आहेत.

तसं गाणं लागलं, बँडचा आवाज कानावर पडलं की काही नाही तर किमान पाय तरी थिरकतातच. काहींच्या तर अंगातच संचारतं. नीटनेटकं नाचता येत नसलं तरी नागिण डान्स, गणपती डान्स तर सर्वांनाच येतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

काहीजण कोठेही बँड वाजताना दिसला की, लगेच त्या ठिकाणी जाऊन इतरांसोबत नाचायला लागतात. त्यांना काहीही फरक पडत नाही. कोणाचं लग्न आहे की लोक काय म्हणतील. त्यांना फक्त नाचण्याचा आनंद घ्यायचा असतो. ते सर्वांसोबत मनमुराद नाचतात आणि नाचल्यानंतर प्रसन्न होऊन निघूनही जातात. अशी लोकं प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक क्षणी आनंद शोधतात. ज्या ठिकाणी आनंद मिळेल त्या ठिकाणी जावून इतरांशी समरस होण्याचा प्रयत्न करतात. यालाच तर आनंद मिळवणे म्हणतात, आयुष्य खऱ्या अर्थाने जगणे, हेच असतं. हेच या मुलाच्या नाचातुन दिसतं.

हा मुलगा एका लग्नाच्या वरातीत नाचत आहे. महत्वाची बाब म्हणजे तो थेट शाळेतून लग्नात गेलेला आहे. कारण त्याच्या अंगावर शाळेचा युनिफॉर्म आहे. आणि तो इतक्या बिनधास्त आणि मनसोक्तपणे नाचत आहे की आपल्यालाही त्याला पाहून नाचावेसे वाटते. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत अनेक मुले डान्स करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये हा एक पोरगा त्याच्या अतरंगी स्टाईल डान्समुळे उठून दिसतोय.

मागे एक गाणे तसेच म्यूझिक सुरु असल्याचे समजते आहे. याच गाण्याच्या तालावर या भावाने ठेका धरला आहे. एखाद्या प्रोफेशनल डान्सर मनोरंजन करू शकणार असला भारी आणि अस्खलीतपणे डान्स करून या छोट्याशा भावाने हवा केली आहे. या चिमुकल्याने बसल्या बसल्याच जबरदस्त डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरू शकणार नाही. आऊट ऑफ कंट्रोल होऊन तुम्हीही नाचू लागाल. या चिमुकल्यावरून तुमची नजर एका क्षणासाठीही हटणार नाही. पुन्हा पुन्हा पाहत राहावा असा हा व्हिडीओ आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *