Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भाऊ बहिणीच्या जोडीने लग्नात सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, पाहून तुमचे देखील पाय थिरकतील

ह्या भाऊ बहिणीच्या जोडीने लग्नात सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, पाहून तुमचे देखील पाय थिरकतील

डान्स मग तो कोणताही असो, एकदा का रंगात आला की बघत रहावा असच वाटतं. अर्थात त्यासाठी समोर डान्स करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींनी तेवढा जीव ओतून तो करणं अपेक्षित असतं. तसेच ते ज्या गाण्यावर वा संगीतावर नाचताहेत निदान त्याला तरी न्याय देण्याइतपत डान्स करणं अपेक्षित असतं. अनेक जणं हे करण्यात यशस्वी होतात. मग तो एखादा सोलो डान्स असेल वा जोडीचा डान्स असेल वा समहू नृत्य असेल. अर्थात यातील जोडीचा डान्स करणं हे तसं जिकिरीचं काम असतं. कारण सोलो डान्स मध्ये आपण जे करू ते दिसतंच. तर समूह नृत्यात आपला डान्स व्यवस्थित झाला नाही तरी खपून जाण्याची शक्यता असते. पण डान्स जोडीचा असेल तर मात्र त्यात आपलं कसब पणाला लागतं. त्यावेळी दोघांमधील ट्युनिंग जबरदस्त असण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात आपण आपल्या डान्स जोडीदाराला ओळखत असू वा आपलं ट्युनिंग जबरदस्त जुळून आलेलं असेल मग धमाल असते. याचाच प्रत्यय आमच्या टीमला आज आला. निमित्त झालं अर्थातच एका वायरल व्हिडियोच !

हा व्हिडियो तसा अर्ध्या वर्षांपूर्वीचा आहे. पण त्यातील डान्स आजही आपल्याला आवडून जाईल असाच आहे. अर्थातच हा एका जोडीचा डान्स असणार आहे हे आपण ओळखलं असेलच. ही जोडी असते एका बहीण भावाची ! यातील बहिणीचं नाव भूमी आणि भावाचं नाव धैर्य होय. या दोघांना ही गाण्याची आणि डान्सची आवड असावी असं लक्षात येतं. या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा सुरुवातीला आपल्याला धैर्य दिसून येतो. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या, ‘नगाडा बजा’ या गाण्यावर तो थिरकायला सुरुवात करतो. मस्त डान्स करतो. मग दुसरं गाणं सुरू होतं. ‘मैंन सैय्यांजीसे ब्रेक अप कर लिया’. या गाण्यात मग त्याची बहीण सामील होते. मग धैर्य बाजूला जातो. भूमी ही जबरदस्त डान्स करते. एव्हाना हा डान्स मॅश अप परफॉम्सन आहे हे आपल्याला कळून चुकलेलं असतं. अजून बरीच गाणी वाजणार असतात आणि या दोघांचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार असतो. नक्की किती गाणी वाजतात ते कळत नाही, पण आपण अजून तीन गाणी तरी ऐकतो. म्हणजे।जवळपास पाच गाणी अडीच मिनिटांत ! खरं सांगायचं तर हे अशक्य वाटतं. पण तरुण वय, डान्सची आवड आणि सळसळता उत्साह असेल तर काहीही शक्य असतं. त्यात अर्थातच दोघांमधलं ट्युनिंग महत्वाची भूमिका बजावत हे तर आपण जाणतोच. आणि हीच बाब या बहीण भावाच्या डान्समध्ये दिसून येते. कारण पुढची तिन्ही गाणी हे दोघे एकत्र डान्स करतात. त्यातल्या त्यांच्या स्टेप्स या एकमेकांना पूरक अशाच असतात.

तसेच या दोघांनी डोकं लावून कोरिओग्राफी केलेली कळून येते. कारण उपलब्ध असलेल्या जागेचा ते पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. तसेच आधी एकाने डान्स करायचा, मग दुसऱ्याने आणि मग एकत्र हे ही चांगल्या रीतीने जमून आलेलं दिसून येतं. बाकी उत्साह आणि ऊर्जा यांच्या बाबतीत तर पैकीच्या पैकी मार्क आहेतच. एकंदर काय तर हा सदर परफॉर्मन्स आपल्याला बघताच क्षणी आवडून जातो. आमच्या टीमला ही तो तसाच आवडला. आपणही हा मॅश अप डान्स परफॉर्मन्स बघितला असेल तर आपल्याला ही आवडून गेला असेल यात शंका नाही. पण आपण अजूनही हा परफॉर्मन्स बघितला नसेल तर जरूर बघा. आतापर्यंत जवळपास १९ लक्ष लोकांनी हा व्हिडियो बघितला आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रिय लक्षात यावी. तेव्हा आपणही हा व्हिडियो बघून त्याचा आनंद घ्या. बरं त्यासाठी इतरत्र जायची गरज नाही. आपली टीम सदर व्हिडियो आपल्या वाचकांसाठी खाली शेअर करेलच. तेव्हा आपण त्याचा जरूर आनंद घ्यावा. असो.

चला तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *