Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भारतीय कलाकारांनी परदेशात मॉलमध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, दोघांची जुगलबंदी पाहून तुम्हीही कौतुक कराल

ह्या भारतीय कलाकारांनी परदेशात मॉलमध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, दोघांची जुगलबंदी पाहून तुम्हीही कौतुक कराल

कोणत्याही कलाप्रकारात जेव्हा दोन कलाकार जुगलबंदी सादर करू लागतात तेव्हा त्या कलेचे विविध पैलू समोर येतात. तसेच त्या कलाकारांचा अशाप्रसंगी जो कस लागतो त्यातून त्यांचं कौशल्य ही अधोरेखित होत असतं. प्रेक्षक म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आनंददायी अशा आहेत. आज आपल्या टीमने असाच एक आनंददायी व्हिडियो पाहिला. त्यातून आम्हाला तर आनंद मिळालाच आणि तोच आनंद आपल्या सोबत शेअर करावा असं वाटलं म्हणून हा लेख लिहीत आहोत.

हा व्हिडियो आहे दोन नृत्य कलाकारांचा. एक जण भांगडा या नृत्यप्रकारात माहिर तर दुसरी व्यक्ती भरतनाट्यम ची आजन्म विद्यार्थिनी. या दोहोंची जुगलबंदी रंगते ती परदेशात. बहुतेक करून ती ऑस्ट्रेलिया येथे रंगली असावी. कारण हा व्हिडियो आपण ज्या युट्युब चॅनेल वरून पाहतो ते ऑस्ट्रेलियातील भांगडा डान्सर्स साठी बनवलेलं युट्युब चॅनेल होतं. असो. स्थळ कुठलं ही असो, ही दोन्ही भारतीय कलाकार मंडळी या व्हिडियोत धमाल आणतात.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा या दुकलीतील भरतनाट्यम डान्सर असलेल्या ताई डान्सची सुरुवात करतात. या लोकप्रिय नृत्यप्रकाराला साजेसं असं गाणं सुरू असतं. भरतनाट्यम विषयी आपल्या टीमला फारशी माहिती नसली तरीही या ताई उत्तम डान्स करताहेत हे मनोमन कळून येतं. एव्हाना उपस्थित असलेल्या मंडळींची संख्या वाढायला लागलेली असते. त्यांचा डान्स सुरू असताना पाठीमागे आपल्याला, व्हिडियोत पुढे भांगडा करणारे दादा दिसत असतात. ते त्यांच्या वेळेची वाट बघत असतात. मग पुढे येत ते ताईंच्या बाजूला उभे राहतात. जुगलबंदीचा पहिला भाग ताईंच्या बाजूने एव्हाना संपलेला असतो. आता दादांची पाळी असते. त्यांची वेळ आल्यावर मस्त असं पंजाबी म्युझिक सूरु होतं. मग काय हे दादा असे काही भन्नाट नाचत सुटतात की ज्याचं नाव ते. त्यांच्या पाठीशी बसलेल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरून त्यांना या दादांचा उत्साह आवडला हे दिसत असतं. दादा मग एकेक छान स्टेप्स करत स्वतःचा भाग पूर्ण करतात. मग पुन्हा भरतनाट्यमचं म्युझिक सुरू होतं. आता दादा थांबलेले असतात आणि ताईंनी मंचाचा ताबा घेतलेला असतो.

चेहऱ्यावरील उत्तम हावभाव, नजाकत यांतून त्या त्यांचं नृत्य फुलवतात. त्यांनी या कलेची अनेक वर्षे सेवा केलेली आहे हे कळून येत असत. जसं त्यांचं म्युझिक थांबतं तसे मग पंजाबी दादा पुढे येतात. पुन्हा त्याच जोशात वावरतात. यावेळी त्यांचा डान्स करण्याचा परीघ वाढतो. दोनदा पूर्ण चक्कर मारून ते पुन्हा जागेवर येतात. मग पुन्हा नवीन म्युझिक आपल्या कानावर पडतं. त्यावर आपल्या ताई डान्स करतात. शेवटी शेवटी भांगड्याची स्टेप करत त्या त्यांचा डान्स संपवतात. मग दादा येतात. एव्हाना दाक्षिणात्य म्युझिक चालू झालेलं असतं. या दाक्षिणात्य म्युझिक वर दादा मस्त भांगडा करतात. खरं तर ते थोडं अवघड असतं, पण दादा जमवून नेतात. जवळपास सहा विविध प्रकारच्या म्युझिक आणि गाण्यांनंतर आपण अगदी खुश झालेले असतो. कारण अर्थातच असतं ते म्हणजे या दोघांचा परफॉर्मन्स. पण मित्र मैत्रिणींनो अजून एक परफॉर्मन्स बाकी असतो. हा परफॉर्मन्स मात्र हे दोघेही एकत्र येऊन सादर करतात. निवडलेलं गाणं ही अगदी प्रसिद्ध असतं. एड शिरीन या जगप्रसिद्ध संगीतकाराचं ‘शेप ऑफ यु’ हे गाजलेलं गीत वाजत असतं. हे गाणं सादर करताना आतापर्यंत जुगलबंदी रंगवणारे हे कलाकार एकत्र आलेले असतात. पाठीस पाठ लाऊन त्यांचा डान्स सुरू होतो आणि एक उत्तम डान्स बघायला मिळतो.

हा संपूर्ण परफॉर्मन्स जेव्हा संपतो तेव्हा उपस्थित सगळी मंडळी जागेवर उभी राहिलेली दिसून येतात. जवळपास प्रत्येक जण टाळ्या वाजवत या दोघांचं कौतुक करत असतात तर काही जण हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतात. आपणही मनोमन या कौतुकाच्या क्षणांत सामील झालेले असतो.

आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला नक्की आवडला असणार. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला आवडतील, भावातील असे विषय घेऊन आपली टीम सातत्याने लिखाण करत असते. आपणही जागरूक वाचक म्हणून आम्हाला सकारात्मक सूचना करत असता, प्रोत्साहन देत असता. यातून जसे नवनवीन विषय सुचतात आणि बदल ही सुचतात. त्याचप्रमाणे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यातून उत्तमोत्तम लेख लिहिले जातात. येत्या काळातही आमचं हे लेखन उत्तमरीत्या सुरू राहील याची खात्री बाळगा. अट एकच. आपला स्नेह आणि पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम असू द्या ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *