Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत खूपच यशस्वी, बघा काय काम करतात

ह्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत खूपच यशस्वी, बघा काय काम करतात

क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल सर्व काही जणू इच्छितात. मग ते त्यांच्या खेळाविषयी रेकॉर्ड्स असू द्या किंवा मग त्यांच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी असू द्या. आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेटर्सच्या अश्या पत्नीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपआपल्या क्षेत्रात खूप नाव कमावले आहे. भारतीय क्रिकेटर्सना नेहमी मैदानाबाहेर आणि स्टेडियममध्ये येऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पत्नीविषयी खूपच कमी चाहत्यांना माहिती असते. अश्या मध्ये आम्ही ह्या एका खास स्टोरीमध्ये भारतीय क्रिकेटर्सच्या यशस्वी पत्नीबद्दल सांगणार आहोत.

भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे चाहते संपूर्ण देशभर आहेत. अनुष्का शर्मा बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ३४ मिलियन्स पेक्षा सुद्धा जास्त आहे. अनुष्काने शाहरुख खान सोबत ‘रब ने बना दी जोडी’ ह्या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. अनुष्का शर्माचे स्वतःचे कपड्याचे ब्रँड आहे, ज्याचे नाव ‘नश’ आहे.

रोहित शर्माची पत्नी रितिका साजदेह

भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने आपली पत्नी आणि मुली सोबत सोशिअल मीडियावर अनेकदा फोटोज शेअर केले आहेत. हि गोष्ट खूपच कमी लोकं जाणतात कि, रितिका स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर आहे आणि ती रोहित शर्माची क्रिकेट मॅनेजर म्हणून सुद्धा काम करत होती. रोहित आणि रितिकचे लग्न १३ डिसेंबर २०१५ मध्ये झाले होते. आज दोघांना एक सुंदर कन्या असून तिचे नाव समायरा आहे.

रवींद्र जडेजाची पत्नी रिवा सोळंकी

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तर त्याची पत्नी रिवा सोळंकीची लोकप्रियता सुद्धा काही कमी नाही आहे. रिवा सोळंकी आणि जडेजा ह्यांची भेट एका पार्टी दरम्यान झाली होती. रिवा राजकोट येथील एक कॉन्ट्रॅक्टर आणि करोडपती उद्योगपती हरदेवसिंग सोळंकी ह्यांची मुलगी आहे. तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले आहे. रिवा सोळंकी-जडेजाने काही काळापूर्वी भारतीय ज नता पार्टी जॉईन केली होती. ह्याअगोदर रिवा सोळंकीने गुजरातमध्ये कर णी सेनामध्ये एक मुख्य पदाधिकाराची भूमिका निभावलेली आहे.

हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा

भारतीय क्रिकेट संघातील सर्वश्रेष्ठ फिरकीपटू गोलंदाजांपैकी एक हरभजन सिंग ने बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा सोबत लग्न केले आहे. गीता पंजाबी चित्रपटांत एक खूप मोठं नाव आहे. लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर हरभजन आणि गीताच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. गीता बसरा पंजाबची लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने ‘द ट्रेन’, ‘सेकंड हॅन्ड हसबँड’, ‘जिला गाजियाबाद’ सारख्या वेगवेगळ्या चित्रपटात काम केले आहे, इतकंच नाही तर गीता ने लोकप्रिय गायक राहत फतेह अली खान सोबत काही म्युजिक व्हिडीओजमध्ये सुद्धा दिसून आलेली आहे. लग्न केल्यानंतर गीता बसराने चित्रपटात काम केलेले नाही आहे.

राधिका रहाणे

भारतीय क्रिकेटसंघातील मध्यम क्रमांकावरील फलंदाज अजिंक्य राहणेने २०१४ मध्ये पत्नी राधिका सोबत लग्न केले आहे. अजिंक्य आणि राधिका एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. अजिंक्य रहाणेची बायको राधिकाला इंटिरियर डिझायनिंगमध्ये आपले करियर करायचे आहे आणि ती ह्यासंबंधित काही कोर्स सुद्धा करत आहे. राधिकाचे वडील पर्यटन क्षेत्रात येण्याअगोदर भारतीय नौसेनेमध्ये काम करत होते. तिची आई सुद्धा ह्याच फिल्ड काम करत आहे.

स्नेहल जाधव

खूपच कमी भारतीय क्रिकेटपटूंनी एका महिला क्रिकेटर सोबत लग्न केले आहे, त्यात केदार जाधव ह्याचे सुद्धा नाव आहे. केदार जाधवची पत्नी स्नेहल जाधव एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे. जिने महाराष्ट्र आणि वेस्ट झोन साठी राज्यस्तरावर क्रिकेट खेळली आहे. परंतु ती इंटरनॅशनल स्तरावर आपले स्थान निश्चित करू शकली नाही. करियरच्या दरम्यान तिने हैद्राबाद आणि ओडिशा सारख्या अन्य राज्यांकडून सुद्धा ती क्रिकेट खेळली आहे. तिने ३२ प्रथम क्ष्रेणी आणि २१ टी-२० सामने खेळले आहेत. केदार आणि स्नेहल ह्या दोघांना एक मुलगी असून तिचा जन्म २०१५ मध्ये झाला होता.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *