‘आजकालची नवीन पिढी अगदी ऍडव्हान्स आहे हो’ हे वाक्य आता तसं घासून गुळगुळीत झालं आहे. याचं कारण सध्याची पिढी ही अतिशय वेगाने नवनवीन गोष्टी आत्मसात करताना दिसून येते. ज्या वयात आपली पिढी बालवर्ग, पहिलीत जात होती, चालताना ही अडखळत होती, त्या वयात ही चिमुकली पावलं गाण्यांवर थिरकायला शिकतात. एवढंच नव्हे तर विविध कलांमध्ये त्यांना गती असल्याचं वेळोवेळी दिसून येतं. त्यामुळे ही नवीन पिढी फार वेगाने अनेक गोष्टी शिकते आहे, आत्मसात करते आहे आणि करत राहील हे नक्की. या पिढीच्या काही प्रतिनिधींचे सोशल मीडिया अकाउंटस ही असतात. अर्थात त्यामागे असतात त्यांचे पालक आणि हे अकाउंट खासकसरून युट्युब वर असतात. या माध्यमातून या लहान मुलांमध्ये असलेल्या अनेक सुप्त कलागुणांना आपल्याला अनुभवता येतं. बरं हे जागतिक स्तरावर होत असल्याने विविध देशातील बालगोपाल काय काय करामती करत असतात हे बघायला मिळतं. यात आघाडीवर असलेलं एक नाव म्हणजे Akaisha Jirage.
भारतीय असलेली ही चिमुरडी आपल्या पालकांसोबत दुबई येथे राहते. वय अवघे पाच ते सहा वर्षे असावं. पण जेव्हा ती छोटी पावलं थिरकायला लागतात तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होतं. या वयात आपण धडपडायचो आणि आईच्या हातचा मार खायचो. त्या वयात ही चिमुकली गाजलेल्या गाण्यांवर अतिशय सहजपणे डान्स करताना दिसते. तिच्या डान्सचे अनेक व्हिडियोज आपल्याला पाहायला मिळतात. पण एक व्हिडियो मात्र खासा लक्षात राहतो. हिमेश रेशमिया यांच्या आवाजातलं ‘मुझे याद सताए तेरी’ हे गाणं या व्हिडियोत आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्यावर ह्या चिमुरडीने ताल धरलेला असतो. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हाच तिच्या मस्त अभिनयाची चुणूक बघायला मिळते. हावभाव अगदी चपखल बसणारा हा अभिनय आपलं मन जिंकून घेतो. मग गाण्यातील संगीत जसजसं पुढे सरकत जातं, तस तसा तिचा डान्स ही बहरत जातो. स्टेप्स लाजवाब असतात. त्यांच्या सोबतीला तिच्या चेहऱ्यावर असणारे निरागस भाव छान वाटतात. काही स्टेप्स मध्ये खोडकरपणा ही दिसून येतो. पण तिचं लहान वय बघता त्याची अजून गंमत वाटते.
तसेच स्टेप्स कोणत्याही असोत, तिच्या चेहऱ्यावरचं हास्य सदैव कायम असतं. त्यात कधीही खंड पडत नाही. तसेच तिला अख्खं गाणंही पाठ असलेलं दिसून येतं. एखादा कलाकार डान्स करत असताना जेव्हा गाण्याचे बोलही नकळतपणे बोलून जात असेल तेव्हा त्याने त्या डान्समध्ये स्वतःला अगदी गुंतवून घेतलं आहे असं समजावं. या चिमुरडीच्या बाबतीत ही हे दिसून येतं, जी एक कौतुकास्पद गोष्ट आहे. या सगळ्यांमुळेच की काय हा तिचा डान्स व्हिडियो अतिशय लोकप्रिय ठरला आहे. आज हा लेख लिहीत असताना जवळपास दीड कोटी लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे आणि दीड लाखांहून अधिकांनी तो लाईक ही केला आहे. तर अशी ही लोकप्रिय बाल कलाकार आपल्याला अनेक नावाजलेल्या आणि आंतरराष्ट्रीय डान्सर्स बरोबर ही डान्स करताना दिसून येते. तसेच डान्स इंडिया डान्स च्या ४ थ्या पर्वात ही तिचा सहभाग होता. एकूणच काय तर सध्या तिचं संपूर्ण जग हे डान्समय झालंय. तिचे हे डान्स व्हिडियोज वेळोवेळी आपल्याला पाहता येतातच. येत्या काळातही ही चिमुरडी विविध डान्स व्हिडियोच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहील आणि मनोरंजन करत राहील हे नक्की. आपल्या टीमकडून तिला खूप खूप आशिर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! खूप मोठी हो बाळा !!!
आपल्या या लेखातून या उदयोन्मुख बाल कलाकाराची ओळख आपल्याला व्हावी हा आमचा हेतू आहे. तेव्हा आपल्याला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा. त्यासाठी नेहमीप्रमाणे आपण कमेंट्स मधून आपल्या प्रतिक्रिया द्या. त्यातील अभिप्राय जसे अभिप्रेत आहेत तसेच अनेक सकारात्मक सूचना देखील. यातील योग्य सूचनांचा विचार करून आपली टीम येत्या काळातील लेखांतून नवनवीन विषय आपल्या भेटीस आणेलच आणि सोबत काही बदल ही करेल. तेव्हा कमेंट्स मध्ये आपले अभिप्राय नक्की कळवा. तसेच आपला हा स्नेह आमच्या टीमसोबत यापुढेही वाढत राहू दे हीच सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :