Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भारतीय महिलेने अमेरिकेत बर्थडे पार्टीमध्ये केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

ह्या भारतीय महिलेने अमेरिकेत बर्थडे पार्टीमध्ये केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

प्रत्येक कलाकार, त्यांची कला सादर करण्याची संधी सातत्याने शोधत असतात. मग ती अभिनय कला असो, नृत्य कला असो, लेखन कला असो वा इतर कला असोत. त्यामुळे कलाकारांना जेव्हा जेव्हा स्वतःची कला सादर करण्याची उत्तम संधी मिळते तेव्हा तेव्हा ते या संधीचा फायदा उठवताना दिसून येतात. प्रत्येक संधीतून स्वतःला प्रेक्षकांसमोर सादर करत ही मंडळी आपला प्रवास चालू ठेवतात आणि नावारूपास येतात. हल्ली सोशल मीडियामुळे अनेक गुणी कलाकारांची ओळख आपल्याला सहज होते ती याचमुळे. कारण त्यांनी सादर केलेल्या कलाकृतींचं चित्रीकरण आपल्याला कुठूनही केव्हाही बघता येतं. त्यांच्या प्रवासातील काही कलाकृती तर नक्कीच पाहता येतात. अश्याच एक लोकप्रिय कलाकार आहेत ज्यांचं नृत्य बघण्याचा योग आला. त्यांनी केलेलं हे नृत्य एका व्हिडियोच्या माध्यमातून पाहता आलं. हे नृत्य वायरल झालं होतं आणि जवळपास दशलक्ष लोकांनी ते पाहिलेलं आहे. तेव्हा त्याविषयी लिहावं असं ठरलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी अधिक जाणून घेऊयात.

वर उल्लेख झालेल्या लोकप्रिय कलाकार म्हणजे नृत्यांगना साग्निका मुखर्जी या होत. भरतनाट्यम, ओडिसी, बॉलिवूड अशा विविध नृत्यप्रकारांत त्यांना रुची, गती आणि प्राविण्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल आहेच. सोबतच त्यांच्या चाहत्यांनी ही एक युट्युब चॅनेल सुरू केलेलं आहे. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. तर अशा या लोकप्रिय नृत्यांगना राहतात अमेरिकेत. विविध समारंभ, स्पर्धा यांतून त्या स्वतःची कला नित्यनेमाने सादर करत असतात. असंच एकदा एका वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांची नृत्य कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं. त्यासाठी जिथे वाढदिवस साजरा केला जाणार होता त्या जागेत त्यांना परफॉर्मन्स करायचा होता. खरं तर बसण्यास जागा जास्त आणि वावरण्यास जागा कमी. त्यामुळे डान्स करताना अडचणी येणं सहज शक्य होतं. पण कसलेला कलाकार मात्र समोर आलेल्या अडचणींवर मार्ग काढत मार्गक्रमण करत राहतो.साग्निका यांचा हा व्हिडिओ म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण. व्हिडियो सुरू होतो तेव्हा साग्निका परफॉर्मन्स करण्याच्या जागेत प्रवेश करतात. नखशिखांत भारतीय पोशाखात असलेल्या साग्निका सुंदर दिसत असतात. जवळच बसलेले सगळी मंडळी ही भारतीय वेषात बसलेली असतात हे विशेष.

गाण्यातील धून वाजायला सुरुवात होते आणि साग्निका नृत्य सुरू करतात. कॅमेरामन जवळपास एक मिनिटभर त्याच जागेतून शूटिंग सुरू ठेवतो. त्यामुळे प्रेक्षकांना असलेली उत्सुकता आणि होत असलेला आनंद आपल्याला सहज दिसून येते. मग मात्र जागा बदलत साग्निका समोर दिसतील या पद्धतीने चित्रीकरण सुरू होतं. त्यामुळे आपण हा डान्स लाईव्ह बघतो आहोत असंच वाटतं. पुढे पूर्ण व्हिडियोभर आपण जे उत्तम नृत्य पाहतो त्यास तोड नाही. गाणं सुरवातीस थोडं हळूवार गतीने उलगडत जात असतं. साग्निका यांची नृत्याची गतीही तेवढीच असते. त्यातून त्यांनी नजाकतीने केलेल्या स्टेप्स आपल्याला आवडून जातात. मग जस जसा गाण्याचा वेग वाढत जातो तस तसा साग्निका यांचाही वेग वाढतो. पण असं असलं तरीही त्यांचा नृत्यावरचा ताबा सुटत नाही. त्या ज्या स्टेप्स करतात त्यांच्यावर त्यांचा ताबा आहे हे जाणवतं. कारण वर उल्लेख केलेली जी नजाकत आहे ती त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये दिसून येते. खासकरून त्यांनी केलेल्या हस्तमुद्रा या भावतात. उपस्थितांनाही त्यांचं हे नृत्य आवडल्याचं दिसून येतं.

एकंदरच त्या एक परिपूर्ण नृत्य सादर करतात. त्यातील गिरक्या घेण्याची स्टेप तर अफलातून. तसेच उपलब्ध असलेल्या जागेचा परिपूर्ण वापर त्या करतात याचं कौतुक वाटतं. साग्निका यांचं हे नृत्य आपल्या टीमला तर प्रचंड आवडलं. अर्थात आपणही हा व्हिडियो पहिला असल्यास त्यातील अनेक बारकावे आपणही निरखले असतील. तेव्हा आपल्यालाही साग्निका यांचा परफॉर्मन्स आवडला असेल हे नक्की. या लेखाच्या निमित्ताने साग्निका यांचं खूप कौतुक आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

या परफॉर्मन्स विषयी जसं आपल्या टीमने लेखन केलं, त्याप्रमाणे आपली टीम विविध विषयांवर लेखन करत आली आहे. यापुढेही करत राहील. आपणही आजपर्यंत आपल्या टीमला सदैव प्रोत्साहन देत आलेले आहात आणि यापुढेही देत राहाल हे नक्की. आपल्या सकारात्मक कमेंट्स, आपण आपल्या टीमचे लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करणं यातून आम्हाल एक वेगळीच ऊर्जा मिळते. तेव्हा आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम राहू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *