भारतात टॅलेंट असणाऱ्या लोकांचा भरणा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की काही विचारू नका. बरं हे टॅलेंटे केवळ शहरात सापडतं असं नाही. ते आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात असतं. गरज असते ती एखाद्या संधीची किंवा कोणीतरी हे टॅलेंटे हुडकून काढण्याची. अशावेळी हल्लीच्या काळात सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात साहाय्य करत असतो. केवळ मोबाईल फोनचा वापर करत अनेक जण आपलं टॅलेंट मग ते एखादं सादरीकरण असो वा अजून काही कला, ही लोकांसमोर आणत असतात. काही वेळा एखादी दुसरीच व्यक्ती आपल्यासाठी हे काम करत असते.
अर्थात यातील कंटेंट लोकांना आवडला की आपोआप याविषयी चर्चा होते. म्हणजेच गोष्टी वायरल होतात. जर काम तेवढंच चांगलं असेल तर काही ठिकाणी संधी ही मिळून जाते. असंच काहीसं झालं फुलसिंग मंझवर यांच्या बाबतीत. फुलसिंग हे छत्तीसगढ राज्यातील गोधना गावचे निवासी आहेत. त्यांना डान्सची आवड लहानपणापासून होती. पण घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे डान्सची आवड असूनही त्यांना यात फारसं काम करता आलं नाही. पण तरीही डान्स करण्याची आवड स्वस्थ बसू देईना. एव्हाना त्यांनी आपल्या गावात टीव्ही रिपेअर करण्याच्या व्यवसाय सुरू केला होता. घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी हे काम सुरू केलं होतं. काही दिवसांपूर्वीपर्यंत केवळ याच्यावरच त्यांचं लक्ष केंद्रित झालं होतं. त्यांच्या डान्सच्या आवडीची कल्पना त्यांच्या आजूबाजुंच्यांना असावी.
एके दिवशी एका मुलाने फुलसिंग यांचा डान्स रेकॉर्ड केला. त्यावेळी ये कदाचित थोडी घेतली मध्ये असावेत असं काही जण म्हणतात. पण याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. ते काहीही असो. पण हा डान्स पुढे यथावकाश सोशल मीडियावर दाखल झाला. या डान्स व्हिडियोत आपल्याला फुलसिंग हे रस्त्याच्या मधोमध डान्स करताना दिसतात. ते ज्या गाण्यावर डान्स करत असतात ते मायकल जॅकसन यांचं ‘डेंजरस’ हे गाणं असतं. या गाण्याचे बिट्स पकडत फुलसिंग डान्स करत राहतात. त्यांचा डान्स वायरल झाल्यावर अनेकांनी त्यांना भारताचा मायकल जॅकसन म्हणण्यास सुरवात केली आहे. पण आपण नीट निरीक्षण केलं तर त्या डान्समध्ये मायकल जॅकसन यांचा प्रभाव दिसून येतो, पण स्टेप्स या स्वतः फुलसिंग यांच्या असतात. एवढंच काय तर त्यात भारतीयांना आवडणाऱ्या क्रिकेटशी निगडित स्टेप्स ही आहेत. या स्टेप्स मधून गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्र रक्षण असे सगळे प्रकार फुलसिंग दाखवतात. यावरून जे दिसतं ते जसंच्या तसं उचलण्यापेक्षा स्वतःच अस काही करावं हा गुण दिसून येतो. त्यांच्या याच गुणामुळे त्यांचा व्हिडियो लोकप्रिय झाला असण्याची शक्यता अधिक आहे. आता तर हा व्हिडियो प्रसिद्ध होऊन जवळपास दोन ते तीन महिने उलटून गेले आहेत. पण आजही त्यांच्या डान्सची चर्चा होते आहे. त्यात आता येत्या काळात भरच पडेल यात शंका नाही. कारण नुकतेच फुलसिंग हे मुंबईला येऊन गेले. हुनरबाज या रियालिटी शोच्या ऑडिशन साठी ते आले होते.
एवढ्या वर्षात त्यांनी डान्सवर जे प्रेम केलं त्याच फळ त्यांना आता मिळायला लागलं आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. ते मुंबईहून छत्तीसगड येथे परतल्यावर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. येत्या काळात जर त्यांचा या रियालिटी शो मध्ये सहभाग असला तर या प्रसिद्धीत वाढ होत राहील हे नक्की. किंबहुना त्यांच्यात जे टॅलेंटे आहे ते खरंच लोकांसमोर यावं ही आमच्या टीमची ही इच्छा आहे. यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. कारण उदयोन्मुख कलाकारांविषयी लिहिणं आम्हाला आवडतं. आणि आमच्या वाचकांना त्यांच्याविषयी वाचायला आवडतं. तेव्हा आपण या लेखाचा आस्वाद घेतला असेल अशी अपेक्षा आहे. सोबतच आमची टीम फुलसिंग यांचा वायरल झालेला व्हिडियो ही आपल्यासाठी शेअर करेल. तेव्हा त्याचाही आनंद घ्या.
तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :