मराठी गप्पाच्या माध्यमांतून आपण अनेक कलाकार, त्यांच्या कलाकृती, अनेक वायरल व्हिडियोज यांविषयी वाचत आलेले आहोत. या लेखांना आपला मिळत असलेला प्रतिसाद आम्हाला विविध विषयांवर लेख लिहिण्यास प्रोत्साहन देतो. आजचा विषयीही असाच काहीसा वेगळा आहे. आज आपण अशा एका व्यक्तीविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्या जिद्दीने आज अशक्यप्राय गोष्टही शक्य करून दाखवली आहे. त्यांना आपण टेड ए’क्स, कौन बनेगा क’रोडपती अशा कार्यक्रमांतून पाहिलं आहेच. प्रो’स्थेटीक आर्म म्हणजे कृत्रिम हात बनवण्याच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची किमया यांनी केली आहे. जगात जे कृत्रिम हात काही लाखांमध्ये उपलब्ध होतात ते हात यांच्या संशोधनामुळे अवघ्या काही हजारांत उपलब्ध होऊ शकतात.
ही सगळी किमया करून दाखवणाऱ्या किमयागराचे नाव आहे, प्रशांत गाडे. महाराष्ट्राच्या मातीत उत्तम काम करून समाजाला पूढे नेणारी अनेक माणसे जन्मली, प्रशांत यांच्या कामामुळे हा वारसा पूढे जातो आहे. त्यांच्या अनेक भाषणांतून त्यांच्या या कामाची सुरवात कशी झाली हे आपण ऐकलं असेलंच. पुण्यात एका अभ्यासक्रमादरम्यान त्यांची भेट एका अतिशय लहान मुलीशी झाली. तिला जन्मतःच दोन्ही हात नव्हते. तिची ही स्थिती पाहून आपण काही तरी करायला हवं असं प्रशांत यांना वाटलं. त्यांनी एका कंपनीस या मुलीला दोन प्रो’स्थेटीक हात देण्याबद्दल विचारणा केली. कं’पनीकडून २४ लाखांची मागणी झाली आणि प्रशांत यांना एकप्रकारे ध’क्काच बसला. या किंमती ऐकुन अनेक ग’रीब आणि आ’र्थिकदृष्ट्या ह’लाखीच्या परिस्थितीत असणारे लोक असतील तर त्यांचं कसं होत असेल. पण या जाणिवेने प्रशांत यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय मिळालं होतं.
रो’बोटिक्स ची जाण असणाऱ्या प्रशांत यांनी मग कृत्रिम हातांवर संशोधन सुरू केलं. पुढे जयपूर, अमेरिका इथल्या विविध सामाजिक संस्थांशी ते या निमित्ताने जोडले गेले. संशोधन पूढे जात होतं पण अडथळे ही अमाप येत होते. पण मनात दृढनिश्चय केलेल्या प्रशांत यांनी मागे वळून न पाहण्याचा आणि आपलं उद्दिष्ट गाठण्याचा चंग बांधला होता. प्रयत्नांती प’रमेश्वर असं आपण म्हणतोच. तसंच काहीसं झालं. संकटं येत गेली तरी त्यावर मात करत करत प्रशांत यांनी यश मिळवलंच. काही लाखांची किंमत असणाऱ्या प्रो’स्थेटीक हातांची किंमत त्यांनी काही हजारांत आणून ठेवली. तसेच त्यांच्या स्वतःच्या सं’स्थेमार्फत आजतागायत त्यांनी १५०० पेक्षा जास्त प्रो’स्थेटीक हात गरजूंना कमी किंमंतीत वा मो’फत उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचं हे कार्य अमूल्यच म्हणावं असं आहे. अवघ्या तिशीच्या वयात समाजोपयोगी आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या प्रशांत यांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. त्यांच्या आणि त्यांच्या सं’स्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
बघा व्हिडीओ :