Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भावाने आपल्या बहिणीसाठी असं काही केलं कि व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या भावाने आपल्या बहिणीसाठी असं काही केलं कि व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील कौतुक कराल

‘सोनियांच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया..’आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या गाण्यातील या ओळी आहेत हे काही वेगळं सांगायला नको ! पण तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे पण आता भर उन्हाळ्यात तुम्हाला भाऊबीज वगैरे कुठून आठवली ! तर, अचानकपणे वगैरे भाऊबीज आठवली नाही. पण एक व्हिडियो आमच्या टीमच्या बघण्यात आला. छोटासाच असला तरी हा व्हिडियो आमच्या मनाला स्पर्शून गेला. म्हंटलं याविषयी लिहायला हवं.

लिहावंसं वाटत होतं. लेखाच्या मधला मजकूर काहीसा सुचला देखील, पण सुरुवात कशी करावी हे सुचेना ! त्यावेळी या ओळी आठवल्या आणि म्हंटलं त्यांनाच उद्धृत करू. कारण या ओळींमधून एक बहीण आपल्या भाऊरायाविषयी आपलं म्हणणं मांडत असली तरी या दोघांचं प्रेमळ नातं यातून डोकावत. हेच प्रेमळ नातं आमच्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोतुन ही दिसून येतं.

हा व्हिडियो एका भावा बहिणीचा आहे हे आपण एव्हाना ओळखलं असेलच. हा व्हिडियो परदेशातील आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हाच हे कळून येतं. कारण आपल्याला या व्हिडियोत भेटणारी भाऊ बहिणीची जोडी एका तलावाजवळ खेळत असते. तिथे एक ट्रॅपोलिन ठेवलेला असतो. ट्रॅपोलिन म्हणजे ज्यावर आपण मस्त उड्या मारू शकतो असं एक साधन वा खेळणं होय. अनेक परदेशी घरांमध्ये हे दिसून येतं. आपण पाहिलेल्या अनेक परदेशी सिनेमांत ही हे असतं. असो. तर अशा या ट्रॅपोलिन वर बहीण खेळत असते. तर तिचा भाऊ हा ट्रॅपोलिनच्या खाली उभा असतो वा खेळत असतो. एव्हाना तिचं खेळून झालं असावं म्हणून तीला खाली उतरायचं असतं. पण वय कमी म्हणून उंची कमी. त्यामुळे थेट उडी मारण्याचा प्रश्न येत नाही. पण खाली तर उतरायचं असतं. अशावेळी या बहिणीचा भाऊ कामाला येतो. कदाचित त्यांना या गोष्टीची सवय असावी. कारण खेळून झाल्यावर ही बहीण तुरुतुरु ट्रॅपोलिनच्या एका बाजूने खाली उतरू पाहते.

नेमका त्याचवेळी भाऊ ती उतरत असलेल्या ठिकाणी ओणवा उभा राहतो. एरवी ओणवा उभं राहणं हा शिक्षेचा भाग असतो वा असायचा. इथे मात्र त्याचा वापर बहिणीला खाली उतरवण्यासाठी केला जाणार असतो. पण तो ओणवा झाला तरी तिची उंची किंचित कमी पडत असते. मग तो पुन्हा व्यवस्थित ओणवा उभा राहतो. यावेळी मात्र आपण खाली उतरु शकू याचा तिला विश्वास वाटतो..एकदा का खात्री पटली की मग ती ही पटकन खाली येण्यास हालचाल करते. अंदाज घेऊन बरोबर भावाचा आधार घेत ही बहिणाबाई खाली उतरते. एकदा का हे मिशन फत्ते झाल्यावर मग हे दोघेही धावायला लागतात. बहुधा कॅमेऱ्यामागून पालकांपैकी कोणीतरी त्यांना बोलावलं असावं आणि यातच हा व्हिडियो संपतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे हा व्हिडियो तसा अगदी कमी वेळेचा आहे. तसेच यात फारशा घटना समाविष्ट नाहीत. परिणामतः हा व्हिडियो साधा ही आहे. हल्ली साधे वाटणारे व्हिडियोज वायरल होणं हे कमी प्रमाणात होत असत.

कारण सहसा अतरंगी, अतर्क्य असेच व्हिडियो वायरल होत असतात. पण काही व्हिडियो मात्र साधे असूनही वायरल ठरतात कारण ते आपल्या मनाला साद घालतात. वर उल्लेख केलेला व्हिडियो तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. कारण एका छोट्याशा घटनेतून ही आपल्याला भावा बहिणीचं प्रेम अगदी नकळतपणे कळून येतं. आमच्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. मनाला स्पर्शून गेला. त्यातूनच हा लेख ही लिहिला गेलेला आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *